अगाशिव लेणी
अगाशिव लेणी | |
---|---|
जखीणवाडी लेणी | |
जखीणवाडी लेणी | |
स्थान | कराड सातारा |
17°14′7.393″N 74°9′5.904″E / 17.23538694°N 74.15164000°E[१] | |
प्रवेश | ६४ |
गुहा दर्शवा | ६४ बौद्धलेणी |
आगाशिव लेणी किंवा जखीणवाडी लेणी ही महाराष्ट्राच्या कराड शहराजवळची लेणी आहेत. कराडच्या सभोवती असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासासाठी खोदलेली दिसतात. पावसाळ्यात चार महिन्यात एका ठिकाणी विश्रांतीसाठी स्थिर राहणे याला वर्षावास (पाली वस्सावात) म्हणतात. ही लेणी पावसाळ्यातील विश्रांतीसाठी खोदलेली आहेत.[२] कराडपासून २ किमी अंतरावर जखीणवाडी गाव आहे. ही लेणी अगाशिवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यांस 'अगाशिवची लेणी' असेही म्हणतात.
स्वरूप
[संपादन]कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या अगाशिव डोंगराच्या परिसरातील डोंगरात एकूण १०१ लेणी कोरलेली आहेत, त्यांपैकी ६४ सुस्थितीत आहेत. या लेण्यांत सहा चैत्यगृहे व इतर विहार आहेत.
या लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्रात रस असलेले अनेक लोक येतात व लेण्यांविषयी माहिती मिळवतात.
कसे जाल ?
[संपादन]१. कऱ्हाडपासून
२. मलकापूरमधूनही या लेण्यांकडे जाणारा रस्ता आहे. तो बऱ्यापैकी चांगला आहे.
३, रेल्वेमार्ग-
येथून जवळचे रेल्वे स्थानक हे कराड-ओगलेवाडी येथे आहे.हे सुमारे लेण्यांपासून ८ किमी वर् आहे.
४. बसमार्ग-
महाराष्ट्र राज्य शासनाच्या एस.टी बसेस कराडला जातात.त्यामुळे बसने लेण्यांपर्यंत येणे सोईस्कर पडते.
५, विमानमार्ग-
येथे जवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथे आहे.तेथून बसने, रेल्वेने वा खाजगी वाहनाने लेण्यांपर्यंत येता येते. कराड येथे असणाला विमानतळ हा फक्त राजकीय वापरासाठी आहे. लहान व मध्यम आकाराची खाजगी विमाने येथे क्वचित उतरवली जातात.
संदर्भ
[संपादन]- सह्याद्री बाणावरील लेख Archived 2013-05-28 at the Wayback Machine.
- जोशी सु.ह.-महाराष्ट्रातील लेणी
- ^ https://goo.gl/maps/yT4QNxMBjvz
- ^ जोशी सु.ह., महाराष्ट्राची लेणी