महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[१]युनेस्कोने महाराष्ट्रातील ५ ऐतिहासिक स्थाने, लेणी, वास्तू आणि निसर्गरम्य स्थळांना जागतिक वारसा स्थाने म्हणून घोषित केले आहे.[ संदर्भ हवा ]

अजिंठा लेणी[संपादन]

अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरापासून जवळपास ९० कि.मी.अंतरावर आहेत. अजिंठा लेणी विशेषतः चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत. बौद्ध धर्मातील हीनयान व महायान पंथीयांची लेणी या ठिकाणी आहेत. बौद्ध जातक कथेवरील चित्रे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक अजिंठ्याला येतात.

वेरूळ लेणी[संपादन]

औरंगाबाद शहरापासून २७ कि.मी. अंतरावर वेरूळची लेणी आहेत. वेरूळ येथे हिंदू, बौद्ध आणि जैन लेणी एकाच ठिकाणी पहावयास मिळतात.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस[संपादन]

मुंबईचे सर्वात मोठे व शेवटचे रेल्वे स्थानक. ब्रिटिश स्थापत्य व गॉथिक शैलीत चे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही वास्तू महत्त्वाची आहे .

घारापुरी लेणी[संपादन]

मुंबई जवळ अरबी समुद्रात घारापुरी किंवा एलिफंटा लेणी एका बेटावर खोदलेल्या आहेत. येथील त्रिमूर्ती शिव व कल्याण सुंदर शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी याठिकाणी पर्यटन महोत्सव भरविण्यात येतो.

कासचे पठार[संपादन]

कासचे पठार हे सातारा जिल्ह्यातील हे एक निसर्गरम्य ठिकाण असून ते रंगीबेरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे.

  1. ^ महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ