माहूरची पांडवलेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माहूरची पांडवलेणी महाराष्ट्राच्या माहूर शहराजवळ असलेली लेणी आहेत.

माहूरच्या बसस्थानकाजवळ एका टेकडीत ही लेणी कोरलेली आहेत. राष्ट्रकूटकालीन या लेण्यात असंख्य खांबानी युक्त असे १५ मीटर उंचीचे मोठे दालन व त्याला जोडून गर्भगृह कोरले आहे. गर्भगृहाच्या द्वारपट्टीवरील द्वारपालाचे भव्य शिल्प लक्ष वेधून घेते. खांबावरील शंकर, पार्वती, दुर्गा, महिषासुरमर्दिनी आदी शिल्पे आणि एका दालनातील नागराज ही शिल्पे महत्त्वाची आहेत.

गाभाऱ्यात सध्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केलेली आढळते. या लेण्यांना' पांडवलेणी " म्हणतात.[१]

शहराचे नाव[संपादन]

माहूर म्हणजे पूर्वीचे मातापूर. ही माता म्हणजे जमदग्नीची भार्या रेणुका होय. माहूरचे रेणुकेचे देऊळ प्रसिद्ध आहे. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी ते एक मूळ जागृत पीठ आहे. अनेक लोकगीतांमध्ये आणि भक्तिगीतांमध्ये माहूरच्या रेणुकेचे नाव येते. त्यांपैकी कवी विष्णूदासरचित ‘माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची साउली’ हे उषा मंगेशकरांनी गायलेले आणि यशवंत देव यांनी दिग्दर्शित केलेले गाणे विशेष लोकप्रिय आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ जोशी सु.ह., महाराष्ट्रातील लेणी