"कल्याण (शहर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sumedh Tayade (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ २४: | ओळ २४: | ||
==थोडक्यात ओळख== |
==थोडक्यात ओळख== |
||
इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख दिसतात. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदरातच केली होती. |
इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख दिसतात. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदरातच केली होती. याच कल्याणच्या मुसलमान सुभेदाराची सून शिवाजीच्या सैन्याच्या हातात सापडली असताना शिवाजीने तिला मानसन्मानासहित परत धाडले होते. |
||
कल्याण व [[डोंबिवली]] या शेजारी शहरांना जोडणारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (कडोंमपा) ०१ ऑक्टोबर १९८३ रोजी अस्तित्वात आली. महापालिका क्षेत्र ५१.९८ चौरस किमी{{संदर्भ हवा}} असून महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ११, ९३,२६६{{संदर्भ हवा}} असून (२००१च्या जनगणने प्रमाणे) शहरातील रस्त्यांची लांबी ४९१.७३{{संदर्भ हवा}} किमी आहे. शहरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५५ सेमी{{संदर्भ हवा}} आहे. |
कल्याण व [[डोंबिवली]] या शेजारी शहरांना जोडणारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (कडोंमपा) ०१ ऑक्टोबर १९८३ रोजी अस्तित्वात आली. महापालिका क्षेत्र ५१.९८ चौरस किमी{{संदर्भ हवा}} असून महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ११, ९३,२६६{{संदर्भ हवा}} असून (२००१च्या जनगणने प्रमाणे) शहरातील रस्त्यांची लांबी ४९१.७३{{संदर्भ हवा}} किमी आहे. शहरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५५ सेमी{{संदर्भ हवा}} आहे. |
||
१३:२८, १२ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
?कल्याण महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | ठाणे |
लोकसंख्या | त्रुटि: "१.१९४ दशलक्ष" अयोग्य अंक आहे (२००१) |
महापौर | सौ.कल्याणी पाटील |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२१३०१ • +०२५१ • एम एच - ०५ |
कल्याण हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोबिंवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ३० किमी अंतरावर आहे.
थोडक्यात ओळख
इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख दिसतात. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण बंदरातच केली होती. याच कल्याणच्या मुसलमान सुभेदाराची सून शिवाजीच्या सैन्याच्या हातात सापडली असताना शिवाजीने तिला मानसन्मानासहित परत धाडले होते.
कल्याण व डोंबिवली या शेजारी शहरांना जोडणारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (कडोंमपा) ०१ ऑक्टोबर १९८३ रोजी अस्तित्वात आली. महापालिका क्षेत्र ५१.९८ चौरस किमी[ संदर्भ हवा ] असून महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ११, ९३,२६६[ संदर्भ हवा ] असून (२००१च्या जनगणने प्रमाणे) शहरातील रस्त्यांची लांबी ४९१.७३[ संदर्भ हवा ] किमी आहे. शहरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५५ सेमी[ संदर्भ हवा ] आहे.
कल्याण शहराचा भूगोल
कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण शहर मुंबई शहराच्या ४८ किमी ईशान्येला स्थित आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे ऒद्यॊगिक क्षेत्रे आणि उद्योजक कल्याण शहराकडे प्रचंड आकर्षित होत आहेत.
मुंबई शहरापासून जवळ आणि त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी कमी आहॆ.
कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतूकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरु होणारी मध्य रेल्वेची लाईन कल्याण जंक्शन येथे दोन भागांमध्ये विभाजित होते. कल्याण हून कर्जत आणि कसारा या दोन भागात रेलवे लाइन विभागली गेल्याने कल्याण स्थानकाला फार महत्त्व आहे. मध्य रेल्वे वरील सर्व जलद आणि धीम्या लोकल्स कल्याणला थांबतात. कल्याण हे नाव फार पूर्वी पासून आहे. नजीकच्या इतिहासात हे नाव बदलेले गेले नाही. उलट इ.स. १०५० मधे सुद्धा कल्याण हेच नाव प्रचलित असल्याचे पुरावे सापडले आहेत. कल्याण हे नाव शिवरायांच्या बाबतीत "कल्याणच्या सुभेदाराची सून" या गाजलेल्या गोष्टीने जोडलेले आहे.
कल्याण शहराची माहिती
कल्याण शहर प्रामुख्याने पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभाजित होते. कल्याण पश्चिमे मध्ये पूर्वे पेक्षा अधिक शहरीकरण झाल्याचे दिसून येते.
कल्याण परिसरातील आकर्षक ठिकाणे
- गणेश घाट.
- दुर्गाडी किल्ला.
- लोणाड लेणी.
- गणेशमंदिर, टिटवाळा.
- शिवमंदिर, अंबरनाथ.
- शिवमंदिर, खिडकाळी.
- विठ्ठल मंदिर, शहाड.
- काळा तलाव
- कोंडेश्वर, बदलापूर.
- मलंगगड.
- मेट्रो जंक्शन मॉल.
शाळा आणी महाविद्यालय
शाळा
- मॉडेल इंग्लिश हाय स्कुल
- गणेश विद्या मंदिर
- आयडियल इंग्लिश हाय स्कुल
- बिर्ला स्कूल
- रॉयल इंग्लिश स्कुल
- गायत्री विद्यालय
- सेन्ट्रल रेल्वे स्कूल आंड ज्युनियर कॉलेज
- साई इंग्लिश हाय स्कुल, कल्याण (पूर्व)
महाविद्यालय
- बिर्ला कॉलेज, कल्याण (पश्चिम)
- के.एम्.अग्ग्रवाल कॉलेज
- शेठ हीराचंद कॉलेज
- सोनावणे कॉलेज, कल्याण (पश्चिम)
- मॉडेल कॉलेज, कल्याण (पूर्व)
- साकेत कॉलेज, कल्याण (पूर्व)
- हिंदी जूनियर कॉलेज
- आर.के.जूनियर कॉलेज