कल्याण (शहर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कल्याण

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° १५′ ००″ N, ७३° ०९′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा ठाणे
लोकसंख्या ११,९४,००० (२००१)
महापौर सौ.विनिता विश्वनाथ राणे
उपमहापौर सौ. उपेक्षा भोईर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 421301
• +०२५१
• एम एच - ०५

कल्याण हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर, कल्याण-डोंबिवली महानगराचा एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे.

थोडक्यात ओळख[संपादन]

Crowd outside Kalyan Junction..jpg

इतिहासात मौर्य काळापासून कल्याण शहराचे उल्लेख दिसतात. कल्याण हे नाव फार पूर्वीपासून आहे. नजीकच्या इतिहासात हे नाव बदलेले गेले नाही. इ.स. १०५० मधे सुद्धा कल्याण हेच नाव प्रचलित असल्याचे पुरावे सापडले आहेत. स्वराज्याच्या आरमाराची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी इ.स.१६५७ साली कल्याण बंदरातच केली होती. याच कल्याणच्या मुसलमान सुभेदाराची सून शिवाजी महाराजाच्या सैन्याच्या हातात सापडली असताना श्री शिवाजी महाराजांनी तिला मानसन्मानासहित परत धाडले होते.

कल्याण व डोंबिवली या शेजारी शहरांना जोडणारी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका (कडोंमपा) ०१ ऑक्टोबर १९८३ रोजी अस्तित्वात आली. महापालिका क्षेत्र ५१.९८ चौरस किमी[ संदर्भ हवा ] असून महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या ११, ९३,२६६[ संदर्भ हवा ] असून (२००१ च्या जनगणने प्रमाणे) शहरातील रस्त्यांची लांबी ४९१.७३[ संदर्भ हवा ] किमी आहे. शहरातील वार्षिक पर्जन्यमान सरासरी २५५ सेमी[ संदर्भ हवा ] आहे.

कल्याण शहराचा भूगोल[संपादन]

कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे. कल्याण शहर मुंबई शहराच्या ५३ किमी ईशान्येला आहे. मुंबईत वाढणारी प्रचंड गर्दी व तसेच शासनाचे अनुकूल धोरण या सर्व घटनांमुळे ओद्योगिक क्षेत्रे आणि उद्योजक कल्याण शहराकडे आकर्षित होत आहेत.मुंबई शहरापासून जवळ असून प्रदूषणाची पातळी कमी आहे.

कल्याण जंक्शन हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणारी मध्य रेल्वेला कल्याण जंक्शन येथे कसाऱ्यामार्फत उत्तर भारतात आणि कर्जतमार्फत दक्षिण भारतात जाणारा फाटा फुटतो. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाला फार महत्त्व आहे. चेन्नईहून, तसेच उत्तर भारतातून येणाऱ्या मध्य रेल्वेवरील सर्व आगगाड्या व जलद आणि धीम्या उपनगरी गाड्या कल्याणला थांबतात.

कल्याण शहराची माहिती[संपादन]

कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत. पश्चिम कल्याणचे पूर्व कल्याणपेक्षा अधिक शहरीकरण झाले आहे.

कल्याण परिसरातील आकर्षक ठिकाणे[संपादन]

  1. काळा तलाव ( भगवा तलाव), कल्याण
  2. सुभेदार वाडा शाळा, 🏫, कल्याण, (१२०+ वर्षात पदार्पण)
  3. हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक, काळा तलाव , कल्याण(प)
  4. कोंडेश्वर धबधबा, बदलापूर
  5. गणेश घाट, डोंबिवली
  6. गणेश मंदिर, डोंबिवली
  7. गणेश मंदिर (महागणपती), टिटवाळा
  8. दुर्गाडी किल्ला,कल्याण
  9. शिवमंदिर, अंबरनाथ
  10. शिवमंदिर, खिडकाळी
  11. विठ्ठल मंदिर, शहाड
  12. मलंगगड, अंबरनाथ

शाळा[संपादन]

  • सुभेदार वाडा (शिवाजी महाराजांच्या वेळची ऐतिहासिक पार्श्वभूमी)
  • बालक मंदिर इंग्रजी माध्यम स्कूल
  • कॅप्टन रवींद्र माधव ओक हायस्कूल
  • आयडियल इंग्लिश हायस्कूल
  • गणेश विद्या मंदिर
  • गायत्री विद्यालय
  • बिर्ला स्कूल
  • मॉडेल इंग्लिश हायस्कूल
  • रॉयल हायस्कूल
  • साई इंग्लिश हायस्कूल
  • सेंट्रल रेल्वे स्कूल
  • न्यू हायस्कूल (सुभेदारवाडा)
  • सम्राट अशोक स्कूल
  • श्री गजानन विद्यालय
  • नुतन विद्यालय, कल्याण
  • Rita Memorial Schoolhouse
  • हॉलिक्रॉस हाय स्कुल
  • श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर ( मराठी / इंग्रजी )
  • आर्या गुरुकुल स्कुल
  • शारदा मंदिर हायस्कूल

महाविद्यालये[संपादन]

  • आर.के. ज्युनियर कॉलेज
  • के.एम. अग्रवाल कॉलेज
  • मॉडेल कॉलेज
  • बिर्ला कॉलेज
  • शेठ हिराचंद कॉलेज
  • साकेत कॉलेज
  • सोनावणे कॉलेज
  • हिंदी ज्युनियर कॉलेज
  • सेंट्रल रेल्वे ज्युनियर कॉलेज

लोकसंख्या विश्लेषण[संपादन]

कल्याण मधील धर्म
धर्म टक्केवारी
हिंदू
  
73.2%
मुस्लिम
  
14.8%
बौद्ध
  
8.7%
ख्रिस्ती
  
1.4%
जैन
  
1.7%
इतर†
  
0.2%
धर्माचे विभाजन
†<लहान>समावेश शीख (0.2%), बौद्ध (<0.2%).</लहान>

काही रोचक तथ्ये[संपादन]

१. असे म्हटले जाते की कल्याणची निर्मिती परशुरामांनी केली. अपरान्त प्रदेशाच्या निर्मितीचा कल्याणकारी प्रारंभ व त्या प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून त्यांनी या भागाचे नामकरण कल्याण असे केले.

२. जगातल्या जवळजवळ प्रत्येक प्राचीन ठिकाणांचे नावे त्या त्या कालानुरूप बदलली गेली, पण कल्याण हे गेल्या ७००० वर्षांपासून कल्याणच आहे. पौराणिक काळ, सातवाहन, क्षात्रप, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब, यादव, मुघल, मराठे, इंग्रज आमदनी इतके शासक येऊन गेले पण कल्याणचे नाव कोणीही बदलेले नाही.

३. मुंबई अस्तित्वात येण्याआधी भारताचे पश्चिमेकडील प्रवेशद्वार हे कल्याणच होते.

४. दुर्गाडी किल्ल्याचे बांधकाम सर्वप्रथम कोणी केले हे अज्ञात आहे पण त्याची दुरुस्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी करून, दुर्गाभवानीची मूर्ती स्थापित करून भारतातील पहिले आरमार कल्याण येथे उभे केले. स्वतः शिवाजी महाराज कल्याणमध्ये सध्या दूधनाका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात ४ महिने वास्तव्यास होते.

६. कल्याणजवळील लोणाडच्या गुहा व मंदिर हे इ. स. ५ ते ८ व्या शतकातील आहे.

७. मलंगगड अथवा हाजी मलंग येथील दर्ग्याची देखरेख पेशवेकाळापासून केतकर नावाचे ब्राम्हण कुटुंब करते आहे.

८. टिटवाळ्याची गणेश मूर्ती ही दुष्यंत व शकुंतला यांची ताटातूट झाल्यावर, ती तिथल्या कणव ऋषींच्या आश्रमात आल्यावर त्यांनी तिला पूजनासाठी दिली होती. पुढे काळाच्या प्रवाहात ती तलावात गेली. श्रीमंत माधवराव पेशवे या भागात विश्रांतीसाठी आले असता त्यांना दृष्टांत होऊन त्यांनी ती बाहेर काढून तिची स्थापना केली.

९. 'काळी मशीद'ची निर्मिती इ. स. १६४३ मध्ये झाली. ती पूर्णपणे काळ्या दगडात बांधलेली आहे. मशिदीच्या बांधकामामध्ये ५ ठिकाणी लहान असे चौकोनी दगड आहेत. जे हलविले असता त्या बांधकामाची जशीच्या तशी घडी घालता येईल.

८. प्रसिद्ध सुभेदार वाडा इ. स. १७६९ साली बांधला गेला.

९. सुभेदाराच्या सुनेला पाहून 'अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती । आम्हीही सुंदर झालो असतो" वदले छत्रपती !' सुंदर असती तर ..." हे वाक्य महाराजांनी ज्या सरकारवाड्यात उच्चारले तो वाडा पारनाक्याजवळ होता.

१०. चित्रपटांचे प्रारंभिक स्वरूप म्हणता येईल असे 'मॅजिक लँटर्न' पद्धतीने भारतातील पहिला शो इ स. १८८५ साली कल्याणच्या पटवर्धन बंधूंनी सादर केला. त्या चित्रपटाचे नाव 'शाम्बरीक खरोलिका'.

११. कल्याणमधले पहिले हॉटेल ' आनंदाश्रम ' १९३० मध्ये सुरू झाले. त्याचे आजचे नाव - हॉटेल पुष्पराज

१२. असे म्हटले जाते की जन. रँडच्या वधानंतर चाफेकर बंधू काही दिवस नेतिवलीच्या टेकडीवरच्या (होमबाबा टेकडीवरच्या) जंगलात होते.

१३. कल्याणचा उल्लेख पेरिप्लस, मनुची निकोलिओ, कॉसमॉस इंडिकॉप्लुस्टस, ह्युएन श्वांग, फ्रेयर, इत्यादी पुरातन विदेशी प्रवासी व लेखकांच्या ग्रंथांमध्ये आढळतो.