Jump to content

"माणिक वर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४: ओळ १४:
* माणिक वर्मा यांना भारत सरकारकडून १९७४साली पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला.
* माणिक वर्मा यांना भारत सरकारकडून १९७४साली पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला.
* पुणे भारत गायन समाज हा माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ माणिक वर्मा हा पुरस्कार देतो. २०१३साली सुनीता खाडिलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
* पुणे भारत गायन समाज हा माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ माणिक वर्मा हा पुरस्कार देतो. २०१३साली सुनीता खाडिलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
* २००३साली, हॉकी खेळाडू धराज पिल्ले यांना माणिक वर्मा पुरस्काराने सन्मानित केले होते.
* २००३साली, हॉकी खेळाडू धनराज पिल्ले यांना माणिक वर्मा पुरस्काराने सन्मानित केले होते.
* २००२साली संगीत दिग्दर्शक नौशाद यांना माणिक वर्मा पुरस्कार दिला गेला.
* २००२साली संगीत दिग्दर्शक नौशाद यांना माणिक वर्मा पुरस्कार दिला गेला.
* [[स्वरानंद प्रतिष्ठान]] हे शास्त्रीय किवा सुगम संगीताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'बहुस्पर्शी गायिका माणिक वर्मा' पुरस्कार देते.


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==

१८:५२, २३ मे २०१३ ची आवृत्ती

माणिक वर्मा, पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर (१६ मे, इ.स. १९२६ - १० नोव्हेंबर, इ.स. १९९६) या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल इ.स. १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.

सांगीतिक कारकीर्द

गजानन दिगंबर माडगूळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी चाली बांधलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मांच्या आवाजात होती. पुणे आकाशवाणी केंद्रावरून इ.स. १९५५ साली प्रसारित झालेल्या या साप्ताहिक संगीतकार्यक्रमात त्यांच्यासह सुधीर फडके, बबनराव नावडीकर, योगिनी जोगळेकर इत्यादी गायकांचा सहभाग होता.

वैयक्तिक जीवन

माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट-अभिनेत्री भारती आचरेकर व नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या चार कन्या होत. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.

संस्था

माणिक वर्मा यांच्या प्रेरणेतून कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेले रसिक मंडळ होते. त्याचे पुनरुज्जीवन सुनीता खाडिलकर यांच्याकडून होणे अपेक्षित आहे.

पुरस्कार

माणिक वर्मा यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात.

  • माणिक वर्मा यांना भारत सरकारकडून १९७४साली पद्मश्री पुरस्कार प्रदान झाला.
  • पुणे भारत गायन समाज हा माणिक वर्मा यांच्या स्मरणार्थ माणिक वर्मा हा पुरस्कार देतो. २०१३साली सुनीता खाडिलकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
  • २००३साली, हॉकी खेळाडू धनराज पिल्ले यांना माणिक वर्मा पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • २००२साली संगीत दिग्दर्शक नौशाद यांना माणिक वर्मा पुरस्कार दिला गेला.
  • स्वरानंद प्रतिष्ठान हे शास्त्रीय किवा सुगम संगीताच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 'बहुस्पर्शी गायिका माणिक वर्मा' पुरस्कार देते.

बाह्य दुवे

  • http://www.aathavanitli-gani.com/Swar/Manik_Varma. Missing or empty |title= (सहाय्य)