वंदना गुप्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वंदना गुप्ते
वंदना गुप्ते
जन्म वंदना गुप्ते
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी)
भाषा मराठी
पुरस्कार जीवनगौरव
वडील अमर वर्मा
आई माणिक वर्मा

वंदना गुप्ते (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठी नाटके, चित्रपट व मराठी-हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. मराठी गायिका माणिक वर्मा तिच्या आई होत.

मराठी नाटके[संपादन]

  • अखेरचा सवाल
  • आणि काही ओली पाने
  • गगनभेदी
  • चारचौघी
  • चार दिवस प्रेमाचे
  • चार दिन प्यार के (हिंदी)
  • झुंज
  • पद्मश्री धुंडिराज
  • प्रेमा तुझ्या गावा जावे
  • मदनबाधा
  • रंग उमलले मनाचे
  • रमले मी
  • वाडा चिरेबंदी
  • शूऽऽ कुठं बोलायचं नाही
  • श्री तशी सौ
  • संध्याछाया
  • सातव्या मुलीची सातवी मुलगी
  • सुंदर मी होणार
  • सेलिब्रेशन
  • सोनचाफा
  • हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

मराठी चित्रपट[संपादन]

  • आंधळी कोशिंबीर (२०१४)
  • टाईम प्लीज (२०१३)
  • दिवसेंदिवस (२००६)
  • पछाडलेला (२००४)
  • बाप रे बाप डोक्याला ताप (२००८)
  • बे दुणे साडेचार (२००९)
  • मणी मंगळसूत्र (२०१०)
  • मातीच्या चुली (२००६)
  • मीराबाई नॉट आऊट (हिंदी - २००८)
  • लपंडाव (१९९३)
  • समांतर (२००९)
  • The Other End of the Line (हिंदी व इंग्रजी - २००८)

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • आंबट गोड (मराठी)
  • करीना करीना (हिंदी)
  • पाण्डे और पाण्डे (हिंदी)
  • बंधन सात जन्मोंका (हिंदी)
  • सजन रे झूठ मत बोलो (हिंदी)
  • ह्या गोजिरवाण्या घरात (मराठी)
  • सुखाच्या सरींनी हे मन बावरे (मराठी)

पुरस्कार[संपादन]

बेळगावात झालेल्या ९५व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात गोगटे फाउंडेशनच्या वतीने वंदना गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]