अंजनी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अंजनी नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश जळगाव जिल्हा, महाराष्ट्र

अंजनी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे.या नदीवर अंजनी धरण बांधण्यात आले आहे. या नदीवर शासनातर्फे नदीजोडणी प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. या जिल्ह्यातील गिरणा नदीवर असलेल्या गिरणा जलाशयातून, जामदा डाव्या कालव्यामार्फत पाणी या नदीत सोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यायोगे या परिसरात पडणारे पावसाचे पाणीही वाहून जाणार नाही.व त्याचा योग्य वापर करता येईल. हा जोडणी प्रकल्प सुमारे १२७किमी लांबीचा आहे.जळगाव जिल्ह्यातील नद्याजोडणी प्रकल्पांना महाराष्ट्र शासनाने सुमारे २ कोटी रुपये मंजूर केले आहेत.[१]