मुक्ताईनगर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मुक्ताईनगर तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २२९ मी
हवामान
तापमान
• उन्हाळा


• ४६[१] °C ( °F)
जवळचे शहर जळगाव
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२५३०६
• +०२५८३
• एम एच - १९

गुणक: 21°02′09″N 76°03′39″E / 21.03583°N 76.06083°E / 21.03583; 76.06083

मुक्ताईनगर तालुका हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे.हा तालुका उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे[२].मुक्ताईनगर शहर हे मुक्ताईनगर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

इतिहास[संपादन]

१९०६ नंंतर पूर्व खानदेश निर्माण झाला. इ.स. १९०६ पूर्वी पूर्व खानदेश हा खान्देश जिल्ह्यातील एक भाग होता. मुक्ताईनगर मधील क्षेत्र त्याकाळी या विभागांचा भाग होते.

हवामान[संपादन]

मुक्ताईनगर तालुक्यामध्ये उन्हाळ्यात तापमान ४६° सेल्सियस पर्यंत होते[३]

राजकारण[संपादन]

मुक्ताईनगर तालुका हा मुक्ताईनगर तालुका मतदारसंघ भाग आहे. मुक्ताईनगर तालुक्या बरोबरच बोदवड तालुकासुद्धा या मतदार संघाचा भाग आहे. हा तालुका रावेर लोकसभा मतदारसंघ एक भाग आहे.

१९८९ पासून तर २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे येथील आमदार होते[४] माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील १९६८ ला येेेेथूनठी आमदारकी साठी निवळून आल्या होत्या. ती निवळणुक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील दुसरी नीवळणुक होती ; पहिल्यांदा त्या जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या खासदार रक्षा खडसे ह्या मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत.२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार येथून निवळून आला[५]

भूगोल[संपादन]

पूर्णा नदी या तालुक्यातून पूर्व ते पश्चिम दिशेला वाहते. तालुक्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. या तालुक्याच्या पूर्व सीमेवर बुलढाणा जिल्हा आहे तर उत्तरेस मध्य प्रदेश राज्य आहे. मुक्ताईनगर तालुक्याच्या पश्चिमेस भुसावळ तालुका आहे आणि मुक्ताईनगरची दक्षिण सीमा बोदवड तालुक्याला लागून आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मुक्ताईनगर मध्ये तापमान ४६°से". जळगाव, महाराष्ट्र.: लोकमत पेपर. २०२०. pp. १.
  2. ^ "लोकमत जळगाव - मुक्ताईनगर तालुक्याच्या दाराशी कोरोणा". जळगाव: लोकमत बातमीपत्र. २०२०. pp. १.
  3. ^ "मुक्ताईनगर मध्ये तापमान ४६°से". जळगाव, महाराष्ट्र.: लोकमत पेपर. २०२०. pp. १.
  4. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/what-eknath-khadse-said-after-defeat-of-daughter-rohini-on-muktainagar-vidhan-sabha-seat/articleshow/71741189.cms
  5. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/what-eknath-khadse-said-after-defeat-of-daughter-rohini-on-muktainagar-vidhan-sabha-seat/articleshow/71741189.cms