तापी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
तापी
Tapi River Surat Thani.jpg
सुरत जवळील तापी नदी
इतर नावे ताप्ती
उगम मुलताईजवळ
मुख अरबी समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देश मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात
लांबी ६७० किमी (४२० मैल)
उगम स्थान उंची ७४९ मी (२,४५७ फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६५,१४५
उपनद्या पूर्णा, गिरणा नदी, वाघूर
धरणे उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्रगुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश, व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे. तापी नदी मुख्य उपनदी पूर्णा

उगम[संपादन]

तापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव मूळतापी" आहे.

मुख[संपादन]

७२४ कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.

उपनद्या[संपादन]

पूर्णा नदी शिवा नदी गोमाई नदी पेंढी नदी
अरुणावती नदी वाकी नदी अनेर नदी खंडू नदी
मोसम नदी बुराई नदी उमा नदी गाडगा नदी
गिरणा नदी आस नदी वाण नदी चंद्रभागा नदी
निर्गुण नदी गांधारी नदी मोरणा नदी भुलेश्वरी नदी
शाहनूर नदी भावखुरी नदी काटेपूर्ण नदी आरणा नदी
मास नदी उतवळी नदी विश्वामैत्री नदी सिपना नदी
नळगंगा नदी निपाणी नदी विश्वगंगा नदी कापरा नदी
गिमा नदी तितुर नदी वाघुर नदी तिगरी नदी
पांझरा नदी वाघूर नदी कान नदी सुरखी नदी
बुरशी नदी गंजल नदी आंभोरा नदी नेसू नदी

इतर[संपादन]

पौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते.
या नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे 'तापी' असे नामकरण केले गेले.

हेही वाचा[संपादन]

  • तापी नदी, थायलंड