गुलाबराव रघुनाथ पाटील
गुलाबराव रघुनाथ पाटील | |
विद्यमान | |
पदग्रहण ३० डिसेंबर २०१९ | |
राज्यपाल | भगतसिंग कोश्यारी |
---|---|
विद्यमान | |
पदग्रहण २०१९ | |
मतदारसंघ | जळगाव ग्रामीण |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | बाळासाहेबांची शिवसेना |
व्यवसाय | राजकारण |
गुलाबराव पाटील (गुर्जर), गुलाब भाऊ म्हणून प्रसिद्ध, (५ जून, १९६६:जळगाव, महाराष्ट्र - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता या विभागाचे विद्यमान मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२] हे भाजपा पक्षातर्फे एरंडोल मतदारसंघातून १०व्या आणि ११व्या[३][४] तर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून १३व्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात जलपुरवठा आणि निःसारणमंत्री होते. या आधी ते २०१६-१९ दरम्यान देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सहकारमंत्री होते.[५]
आपल्या तोंडाळ भाषणशैलीमुळे त्यांना खानदेशातील मुलुखमैदान तोफ असेही म्हणतात.[६][७][८][९][१०][११]
पदे भूषवली[संपादन]
- १९९९: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले (पहिल्यांदा)
- २००४: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (दुसऱ्यांदा)
- २००९: शिवसेना उपनेते
- २०१४: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (तिसऱ्यांदा)
- २०१५: आश्वसन समिती प्रमुख महाराष्ट्र विधान मंडळ
- २०१६ - २०१९: महाराष्ट्र राज्य सरकारचे सहकार राज्यमंत्री
- २०१६ - २०१९: परभणीचे पालकमंत्री (महाराष्ट्र राज्य)
- २०१९: महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले (चौथ्यांदा)
- २०१९: महाराष्ट्र राज्य सरकारमधील पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री.
- २०२०: जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त
संदर्भ[संपादन]
- ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
- ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.
- ^ "Erandol Assembly Election results". Archived from the original on 2019-12-26. 2022-06-18 रोजी पाहिले.
- ^ Jalgaon News
- ^ Sanjay Jog (5 January 2020). "Uddhav Thackeray allocates portfolios to his ministers, here is the complete list". Free Press Journal. 2 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Maharashtra Assembly : MLAs condemn 'offensive' editorial on farmers". DNA. PTI. 18 December 2014. 20 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "Sena legislators take on govt on farmer issue". hindustantimes.com. 21 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Shiv Sena MLAs 2014". Archived from the original on 12 September 2015. 22 November 2015 रोजी पाहिले.
- ^ "Jalgaon Rural (Maharashtra) Election Results 2014, Current and Previous MLA". Archived from the original on 2022-05-22. 21 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Archived copy". Archived from the original on 2 April 2015. 13 March 2015 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Jalgaon Rural Assembly Results".
वर्ग:
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- CS1 maint: archived copy as title
- शिवसेनेतील राजकारणी
- महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य
- मराठी राजकारणी
- महाराष्ट्रातील आमदार
- एरंडोलचे आमदार
- जळगाव ग्रामीणचे आमदार
- इ.स. १९६६ मधील जन्म
- महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १० व्या विधानसभेचे सदस्य
- महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य