चर्चा:कुर्ला
Appearance
कुर्ले नावाची अनेक गावे महाराष्ट्र-कर्नाटकांत आहेत. या नावाचा शोध ईस्ट इंडीजमध्ये करायची गरज नाही. विले (मुळात विर्ले), पार्ले, वेंगुर्ले, कार्ले, मार्ले या गावांप्रमाणेच कुर्ले हे अस्सल मराठी नाव आहे.
ही पाहा कुर्ले किंवा तत्सदृश्य नाव असलेली गावे :-
- कुर्ले (महाड)
- कुर्ले (वाडा)
- कुर्लेकरवाडी (महाड)
- कुर्लेतिमारू (कर्नाटक)
- कुर्लेभातळे (मालवण)
- कुर्लेवाडी (गंगाखेड)
- कुर्लेवाडी (वेंगुर्ले)
- राजाचे कुर्ले (सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील पुसेसावळी या प्रसिद्ध गावाशेजारचे गाव)
.... ज (चर्चा) २२:११, ५ एप्रिल २०१८ (IST)
कुर्ले व कुर्ला यात फरक आहे. कुर्ला याचे नाव इथले कुर्ली नावाचे खेकड्यानी पडले. व हे ईस्ट इंडीजमध्ये नाही तर ईस्ट इंडियन बोलीभाषा मध्ये आहे. मी स्वतः कुर्ला इथे राहतो आणि त्याचे नाव बदलण्यास योग्य वाटत नाही --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१९, ५ एप्रिल २०१८ (IST)
- मला वाटते सदस्य ज यांनी नाव बदलण्याचे सुचविले नाही तर कुर्ला नाव मराठी असल्याचे सांगितले आहे. जर हे ईस्ट इंडियन भाषेतून आले असेल तर त्याचे संदर्भ द्यावे.
- मूळ नाव कुर्ले असल्याचा उल्लेख लेखात करावा. कुर्ले --> कुर्ला हे पुनर्निर्देशन पान मी तयार केले आहे.
- अभय नातू (चर्चा) २२:१२, ६ एप्रिल २०१८ (IST)
- सद्या इंग्लिश विकिपीडियावर याची माहिती आहे. मराठीत लवकर विस्तार करेल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:५२, ६ एप्रिल २०१८ (IST)