जुलै १४
Appearance
जुलै १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९५ वा किंवा लीप वर्षात १९६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]तेरावे शतक
[संपादन]- १२२३ - लुई आठवा फ्रांसच्या राजेपदी.
अठरावे शतक
[संपादन]- १७८९ - पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिह्न असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहुर्तमेढ होती.
- १७८९ - अलेक्झांडर मॅकेन्झी मॅकेन्झी नदीच्या मुखाशी पोचला.
- १७९१ - फ्रेंच क्रांतीपासून पळून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेल्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टलीची बर्मिंगहॅम शहरातून हकालपट्टी.
विसावे शतक
[संपादन]- १९२५ - जर्मनीत नाझी पक्षाव्यतिरिक्त सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी.
- १९४३ - अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले.
- १९५८ - इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
- १९६६ - अमरिकेतील शिकागो शहरात रिचर्ड स्पेकने आठ परिचारिका-विद्यार्थिनींची हत्या केली.
- १९६६ - ग्वाटेमाला सिटीतील मनोरुग्णालयात आग. २२५ ठार.
- १९८४ - डेव्हिड लॅंग न्यू झीलंडच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.
- २०१६ - फ्रांसच्या नीस शहरात दहशतवाद्याने लोकांच्या जमावात मोठा ट्रक घालून ८०पेक्षा अधिक लोकांना ठार केले.
जन्म
[संपादन]- १८५६ - गोपाळ गणेश आगरकर, समाजसुधारक.
- १८६२ - गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.
- १८७४ - अब्बास दुसरा, इजिप्तचा राजा.
- १८८५ - सिसावांग वॉॅंग, लाओसचा राजा.
- १९१० - विल्यम हॅना, अमेरिकन चित्रकार, टॉम अँड जेरी चित्रकथेसाठी चित्रे काढली.
- १९१३ - जेरी फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- १९२० - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री.
- १९६७ - हशन तिलकरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - जरैंट जोन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- १२२३ - फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.
- १२७४ - संत बोनाव्हेंचर.
- १८८१ - बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
- १८८७ - आल्फ्रेड क्रुप, जर्मन उद्योगपती.
- १९०४ - पॉल क्रुगर, दक्षिण आफ्रिकेचा क्रांतीकारी.
- २००२ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- २००८ - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर जुलै १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - जुलै १५ - जुलै १६ - (जुलै महिना)