"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८०: ओळ ८०:
* सौभाग्यलक्ष्मी (?)
* सौभाग्यलक्ष्मी (?)


==गाजलेली पदे==
==गाजलेली पदे (नाटक)==
* बहुत दिन नच भेटलो
* चंद्रिका ही जणू
* माता दिसली
* प्रिये पहा
* आनंदे नटती
* आनंदे नटती
* कोण तुजसंग सांग गुरुराया (सौभद्र)
* चंद्रिका ही जणू
* चांद माझा हा हासरा (देवमाणूस)
* छळि जीवा दैवगती (देवमाणूस)
* तू माझी माउली (तुकारामाचा अभंग)
* दिलरुबा दिलाचा हा(देवमाणूस)
* दे हाता शरणागता (मानापमान)
* नच सुंदरी करु कोपा (सौभद्र)
* प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि (सौभद्र)
* बघुनी वाटे
* बघुनी वाटे
* बहुत दिन नच भेटलो
* या नव नवल नयनोत्सवा
* माता दिसली
* या नव नवल नयनोत्सवा (मानापमान)
* रजनिनाथ हा नभी उगवला (मृच्छकटिक)

हेही पहा :


==संदर्भ आणि नोंदी==
==संदर्भ आणि नोंदी==

१५:५६, ९ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

सौदागर नागनाथ गोरे

छोटा गंधर्व
उपाख्य छोटा गंधर्व
आयुष्य
जन्म १० मार्च इ.स. १९१८
जन्म स्थान कोरेगाव, सातारा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ३१ डिसेंबर इ.स. १९९७
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गुरू शेंदे खान (आग्रा घराणे)
उस्ताद भुर्जी खान (जयपूर घराणे)
गायन प्रकार मराठी नाट्यसंगीत
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

सौदागर नागनाथ गोरे, ऊर्फ छोटा गंधर्व, (१० मार्च, इ.स. १९१८ - ३१ डिसेंबर, इ.स. १९९७) हे हिंदुस्तानी गायक व मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार होते. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती.

अल्प परिचय

सौदागर नागनाथ गोरे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगावात १० मार्च, इ.स. १९१८ रोजी झाला. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. उण्यापुर्‍या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला[१]. अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला[२]. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातदेखील छोटा गंधर्वांनी मोलाची कामगिरी केली. गुनरंग ह्या नावाने त्यांनी रचलेल्या बंदिशी आणि नंदकिशोर, बसंतीकोश, नंदबसंत, बसंतीशंकरा, गुणिकंस ह्या नवीन रागांची निर्मिती ही त्यांच्या योगदानाची उदाहरणे आहेत[३].

१९४३ मधे त्यांनी काही कलाकारांसह 'कलाविकास' ही स्वत:ची नाट्यसंस्था काढली. त्या संस्थेचे 'देवमाणूस' हे खूप गाजले. या नाटकातून छोटा गंधर्व हे गीतकार म्हणूनही पुढे आले. कलाविकास आथिर्कदृष्ट्या यशस्वी होऊ शकली नाहीत. तिच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आणि ती बंद पडली.

आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. १९७९ मधे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे भाषण केल्यावर झालेल्या एका प्रयोगासाठी त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. त्यानंतर १९८०-१९८१ मधे काही प्रयोगांत आग्रहाखातर भूमिका करून रसिकांना आनंद दिला.

वयाची पासष्ठी उलटलेल्या या स्वरमहर्षीला १९८४ मध्ये, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत असलेल्या शिवप्रसाद या त्यांच्या एकुलत्या मुलाच्या अपघाती निधनाचा धक्का बसला. तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा सौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला. संगीतावरील जुन्या ग्रंथांचे वाचन, ज्योतिष तसेच आध्यात्म्याचा अभ्यास व क्रिकेटसारख्या छंदांसोबत ते 'दुसरे बालपण' जगत होते. पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये ३१ डिसेंबर १९९७ रोजी छोट्या गंधर्व यांचे निधन झाले.

संगीत नाटकांतील वाटचाल

संगीत सौभद्रातील तसेच 'सुवर्णतुले'तला कृष्ण, 'संगीत मानापमाना'तील 'धैर्यधर', 'मृच्छकटिका'तील 'चारुदत्त', 'संशयकल्लोळ'मधला अश्विनशेठ ह्यांसारख्या भूमिकांमधून छोटा गंधर्व ह्यांनी मराठी संगीत रंगभूमी गाजवली.

छोटा गंधर्व यांनी भूमिका केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका

  • उद्याचा संसार (शेखर)
  • कर्दनकाळ (नायिकेची स्त्रीभूमिका)
  • घराबाहेर (पद्मनाभ)
  • देवमाणूस (अण्णा व अनिल)
  • पराचा कावळा (कल्याण)
  • प्राणप्रतिष्ठा (वारणेची स्त्रीभूमिका)
  • फुलपाखरे (नाटकाचा नायक)
  • भावबंधन(प्रभाकर)
  • भ्रमाचा भोपळा (अरविंद)
  • मानापमान (धैर्यधर)
  • माझा देश(शेवंता-स्त्रीभूमिका)
  • मृच्छकटिक (चारुदत्त)
  • लग्नाची बेडी (पराग)
  • विद्याहरण (कच)
  • शारदा (कोदंड)
  • संशय कल्लोळ (अश्विनशेठ आणि रेवती-स्त्रीभूमिका)
  • साष्टांग नमस्कार (त्रिपुरी-स्त्रीभूमिका)
  • सुवर्णतुला (नारद)
  • सौभद्र (कृष्ण)
  • स्वर्गावर स्वारी (मीनाक्षी-स्त्रीभूमिका)
  • सौभाग्यलक्ष्मी (?)

गाजलेली पदे (नाटक)

  • आनंदे नटती
  • कोण तुजसंग सांग गुरुराया (सौभद्र)
  • चंद्रिका ही जणू
  • चांद माझा हा हासरा (देवमाणूस)
  • छळि जीवा दैवगती (देवमाणूस)
  • तू माझी माउली (तुकारामाचा अभंग)
  • दिलरुबा दिलाचा हा(देवमाणूस)
  • दे हाता शरणागता (मानापमान)
  • नच सुंदरी करु कोपा (सौभद्र)
  • प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि (सौभद्र)
  • बघुनी वाटे
  • बहुत दिन नच भेटलो
  • माता दिसली
  • या नव नवल नयनोत्सवा (मानापमान)
  • रजनिनाथ हा नभी उगवला (मृच्छकटिक)

हेही पहा :

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.mumbaimirror.com/printarticle.aspx?page=comments&action=translate&sectid=135&contentid=20090605200906050209319779e238541&subsite=. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-3720192,prtpage-1.cms. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे