"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ३८६: | ओळ ३८६: | ||
|} |
|} |
||
== डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस == |
|||
[[महाराष्ट्र सरकार]]च्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवलेली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस]] ([[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]]) या नावाने [[इंग्रजी]] भाषेत २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी [[१४ एप्रिल]] [[इ.स. १९७९|१९७९]] रोजी झाले होते. |
|||
महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन [[भारत सरकार]]च्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा [[हिंदी]] अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.<ref>[http://velivada.com/2017/05/01/pdf-21-volumes-of-dr-ambedkar-books-in-hindi/ डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण वाड्मय, २१ खंड पीएफ में]</ref> या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत यांच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. |
|||
== पत्रकारिता == |
== पत्रकारिता == |
||
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला [[इ.स. १९२०]] मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. [[इ.स. १९१७]] साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ''“पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.”'' हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले. |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला [[इ.स. १९२०]] मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. [[इ.स. १९१७]] साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. ''“पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.”'' हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले. |
१४:५१, २७ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले काही ग्रंथ त्यांच्या हयातीच प्रकाशित झाले तर काही त्यांच्या परिनिर्वाणानंतर प्रकाशित होऊ शकले, ज्यांचे वर्षानुसार विवरण पुढिलप्रमाणे आहे -
- हिस्ट्री ऑफ इंडियन करंसी अँड बॅंकिंग (१९४७)
- बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलीजन (१९५०)
- फ्युचर ऑफ पार्लियामेन्ट्री डेमोक्रेसी (१९५१)
- बुद्धिझम अँड कम्यूनिझम (१९५६)
ग्रंथ-पुस्तके आणि प्रबंध
अ.क्र. | मूळ शीर्षक | मराठी लेखन | मराठी भाषांतर | लेखन/ प्रकाशन वर्ष | पृष्ठ संख्या | बीएडब्ल्युएस खंड | टीप |
---|---|---|---|---|---|---|---|
०१ | Administration and Finance of the East India Company | ॲडमिनीस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी | मे १९१५ | ४१ | खंड ६ | एम.ए.चा प्रबंध | |
०२ | The Evolution of Provincial Finance in British India | दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया | लेखन: १९१७; प्रकाशन: १९२५ | २४९ | खंड ६ | पीएच.डी.चा प्रबंध | |
०३ | The Problem of the Rupees: Its Origin and Its Solution | द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन | रुपयाची समस्या: त्याचा उगम व त्याचे निरसन | १९२३ | २७९ | खंड ६ | डी.एस.सी.चा प्रबंध |
०४ | Annihilation of Caste | ॲन्हिलेशन ऑफ कास्ट | जातिव्यवस्थेचे निर्मूलन | मे १९३६ | ५३ | खंड १ | |
०५ | Which Way to Emancipation? | व्हिच वे टू इमॉन्सिपेशन | मे १९३६ | ४३ | खंड १८ | शाषण-शोधप्रबंध | |
०६ | Federation versus Freedom | फेडरेशन वर्सेस फ्रिडम | १९३९ | ७२ | खंड १ | २९ जानेवारी १९३९ रोजी दिलेल्या भाषणावर आधारित पुस्तक | |
०७ | Pakistan or the Partition of India | पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया | पाकिस्तान अथवा भारताची फाळणी | डिसेंबर १९४० | ४७८ | खंड ८ | ग्रंथ सुरुवातीला "थॉट्स ऑफ पाकिस्तान" नावाने प्रकाशित केला होता. |
०८ | Rande, Gandhi and Jinaah | रानडे, गांधी अँड जिन्नाह | रानडे, गांधी आणि जीना | १९४३ | ३३ | खंड १ | १८ जानेवारी १९४३ रोजी दिलेल्या भाषणावर आधारित पुस्तक |
०९ | Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables | मीस्टर गांधी अँड द इमॉन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स | सप्टेंबर १९४३ | ९० पृष्ठ | ९ | शोधपेपरवर आधारित प्रंबध | |
१० | What Congress and Gandhi Have Done to the Untouchables | व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव्ह डन टू द अनटचेबल्स | काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले | जून १९४५ | ३८३ पृष्ठ | ९ | |
११ | Communal Deadlock and a Way to Solve It | कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट | मे १९४६ | २२ पृष्ठ | १ | एका भाषणावर आधारित शोधप्रंबंध | |
१२ | Who Were the Shudras? How They Came to be the Forth Varna in the Indo-Aryan Society |
व्हू वर द शुद्राज? हाऊ दे केम टू बी द फोर्थ वर्णा इन दि इन्डो-आर्यन सोसायटी | शूद्र पूर्वी कोण होते? | ऑक्टोबर १९४६ | १९५ पृष्ठ | ७ | |
१३ | A Critique of The Proposals of Cabinet Mission for Indian Constitutional changes in so far as they affect the Scheduled Castes (Untouchable) | अ क्रिटीक ऑप द प्रोपोझल्स ऑफ कॅबिनेट मिशन फॉर इंडियन कोन्स्टिट्युशनल चेन्जेस इन सो फार ॲस दे अफेक्ट द शेड्युल्ड कास्ट्स (अनटचेबल्स) | १९४६ | शोधप्रबंध | |||
१४ | The Cabinet Mission and the Untouchables | द कॅबिनेट मिशन अँड दी अनटचेबल्स | १९४६ | ||||
१५ | States and Minorities | स्टेट्स अँड माइनॉरिटीज | राज्य आणि अल्पसंख्यक | मार्च १९४७ | ६६ पृष्ठ | १ | भारतीय संविधान सभेत सादर केलेल्या निवेदनावर आधारित शोधप्रबंध |
१६ | Maharashtra as a Linguistic Province | महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स | १९४८ | ३७ | १ | लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशनला सादर केलेल्या निवेदनावर आधारित शोधप्रबंध | |
१७ | The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables | द अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दी बिकेम अनटचेबल्स | अस्पृश्य: ते कोण होते व ते अस्पृश्य का बनले | ऑक्टोबर १९४८ | १३० | ७ | |
१८ | Thoughts on Linguistic States: A Critique of the Report of the States Reorganization Commission | थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स: अ क्रिटीक ऑफ द रिपोर्ट ऑफ द स्टेट्स रिकग्नाईझेशन कमिशन | १९५५ | ||||
१९ | The Buddha and His Dhamma | द बुद्धा अँड हिज धम्मा | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | लेखन: मार्च १९५६; प्रकाशन: १९५७ | ५९९ | ११ | |
२० | Riddles in Hinduism | रिडल्स इन हिंदुइझम | हिंदू धर्मातील कोडे | १९८७ | ३३९ | ४ | |
२१ | Dictionary of the Pali Language (Pali-English) | डिक्शनरी ऑफ द पाली लँग्वेज (पाली-इंग्लिश) | पाली भाषेचा शब्दकोश (पाली-इंग्रजी) | १९९८ | ४३५ | १६ | |
२२ | The Pali Grammar | द पाली ग्रामर | पाली व्याकरण | १९९८ | ८८ | १६ | |
२३ | Waiting for a Visa | वेटिंग फॉर अ व्हिझा | वेटिंग फॉर अ व्हिझा | लेखन: १९३५–३६ | २० | हे डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र आहे. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक आहे. | |
२४ | A People at Bay | अ पिपल ॲट बाय | |||||
२५ | Untouchables or the Children of India's Ghetto | अनटचेबल्स ऑर द चिल्ड्रेन ऑफ इंडियाज गेटो | |||||
२६ | Can I be a Hindu? | कॅन आय बी अ हिंदू? | |||||
२७ | What the Brahmins Have Done to the Hindus | व्हॉट द ब्राह्मिन्स हॅव डन टू द हिंदुज | |||||
२८ | Essays of Bhagwat Gita | एसे ऑफ भगवद् गिता | |||||
२९ | India and Communism | इंडिया अँड कम्युनिझम | |||||
३० | Revolution and Counter-revolution in Ancient India | रिव्हॉल्युशन अँड काउंटर-रिव्हॉल्युशन इन एन्शण्ट इंडिया | प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती | ||||
३१ | Buddha and Karl Marx | बुद्धा अँड कार्ल मार्क्स | बुद्ध आणि कार्ल मार्क्स | गौतम बुद्ध व कार्ल मार्क्स यांची तुलना | |||
३२ | Constitution and Constitutionalism | कोन्स्टिट्युशन अँड कोन्स्टिट्युशनालिझम | संविधान आणि संविधानवाद |
टाचणे, पुरावे आणि निवेदने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा
क्र. | मूळ शीर्षक | मराठी लेखन | मराठी भाषांतर | प्रकाशन वर्ष | बीएडब्ल्युएस खंड | टीप |
---|---|---|---|---|---|---|
१ | On Franchise and Framing Constituencies | ऑन फ्रँचाईझ अँड फ्रेमिंग कॉन्स्टिट्युअन्सीझ | १९१९ | ६ | ||
२ | Statement of Evidence to the Royal Commission of Indian Currency | स्टेटमेंट ऑफ ऐव्हीडेंस टू द रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी | १९२६ | ६ | ||
३ | Protection of the Interests of the Depressed Classes | प्रोटेक्शन ऑफ दी इंटरेस्ट्स ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस | २९ मे १९२८ | २ | ||
४ | State of Education of the Depressed Classes in the Bombay Presidency | स्टेट ऑफ एज्युकेशन ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी | २९ मे १९२८ | २ | ||
५ | Constitution of the Government of Bombay Presidency | कॉन्स्टिट्युशन ऑफ द गव्हर्मेंट ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी | १७ मे १९२९ | २ | ||
६ | A Scheme of Political Safeguards for the protection of the Depressed Classes in the Future Constitution of a Self- governing India | अ स्किम ऑफ पॉलिटिकल सेफगार्ड्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस इन द फ्युचर कॉन्स्टिट्युशन ऑफ अ सेल्फ-गव्हर्निंग इंडिया | १९३० | २ | गोजमेज परिषदेत सादर केलेला शोधलेख | |
७ | The Claims of the Depressed Classes for Special Representation | द क्लेम्स ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस फॉर स्पेशल रिप्रेझेन्टेशन | १९३१ | २ | गोजमेज परिषदेत सादर केलेला शोधलेख | |
८ | Franchise and Tests of Untouchability | फ्रँचाईझ अँड टेस्ट्स ऑफ अनटचॅबिलीटी | १ मे १९३२ | २ | ||
९ | The Cripps Proposals on Constitutional Advancement | द क्रिप्स प्रोपोझल्स ऑन कॉन्स्टिट्युशनल अडवान्समेंट | १८ जुलै १९४२ | १० | ||
१० | Grievances of the Scheduled Castes | ग्रीवेन्सेझ ऑफ द शेड्युल्ड कास्ट्स | २९ ऑक्टोबर १९४२ | १० |
शोधपत्रे, लेख, पुस्तकांची पुनरावलोकने
क्र. | मूळ शीर्षक | मराठी लेखन | मराठी भाषांतर | प्रकाशन व वर्ष | पृष्ठ | बीएडब्ल्युएस खंड | टीप |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | Castes in India: Their Genesis, Mechanism and Development | कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट | भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी | इंडियन अँटीक्वेरी (मासिक), १९१८ | १५ | १ | ९ मे, १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात डॉ. आंबेडकरांनी हा शोधलेख वाचला होता. शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे, १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते. |
२ | Mr. Russel and the Reconstruction of Society | मीस्टर रसेल अँड रिकन्ट्रक्शन ऑफ सोसायटी | Journal of the Indian Economic Society, १९१८ | १० | १ | ||
३ | Small Holdings in India and Their Remedies | स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज | Journal of the Indian Economic Society, १९१८ | २४ | १ | ||
४ | Currency and Exchanges | करन्सी अँड एक्सचेंजेस | The Servant of India, १९२५ | ५ | ६ | ||
५ | The Present Problem of Indian Currency | द प्रेझेंट प्रोब्लम ऑफ इंडियन करेन्सी | एप्रिल १९२५ | १२ | ६ | दोन भागांमधील शोधलेख | |
६ | Report of Taxation Enquiry Committee | रिपोर्ट ऑफ टॅक्सेशन इनक्वायरी कमिटी | The Servant of India, एप्रिल १९२६ | ३ | ६ | ||
७ | Thoughts on the Reform of Legal Education in the Bombay Presidency | थॉट्स ऑन द रिफोर्म ऑफ लिगल एज्युकेशन इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी | गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे मॅकझिन, १९३६ | १४ | १७(२) | ||
८ | The Rise and Fall of Hindu Women | द राईज अँड फाल ऑफ हिंदू वुमेन | १९५० | समाविष्ठ नाही | |||
९ | Need for Checks and Balances | नीड फॉर चिक्स अँड बॅलन्सेस | २३ एप्रिल १९५३ | ५ | १ | ||
१० | Buddha Pooja Path (Marathi) | बुद्ध पूजा पाठ | बुद्ध पूजा पाठ | नोव्हेंबर १९५६ | १२ | १६ | मूळ पुस्तक मराठीत लिहिले गेले आहे |
प्रस्ताविक आणि अग्रलेख
क्र. | मूळ शीर्षक | मराठी लेखन | मराठी भाषांतर | प्रकाशन वर्ष | पृष्ठ संख्या | बीएडब्ल्युएस खंड | टीप |
---|---|---|---|---|---|---|---|
१ | Forward to Untouchable Workers of Bombay City | फॉरवर्ड टू अनटचेबल्स वर्कर्स ऑफ बॉम्बे सिटी | "बॉम्बे शहराचे अस्पृश्य कामगार" वर अग्रलेख | फेब्रुवारी १९३८ | २ | १७ (३) | डॉ. जी.आर. प्रधान यांचे पुस्तक |
२ | Forward to Commodity Exchange | फॉरवर्ड टू कॉमोडिटी एक्सचेंज | १९४७ | १ | ६ | पी.जी. साळवी यांचे पुस्तक | |
३ | Preface to the Essence of Buddhism | प्रेफेस टू दी इसेन्स ऑफ बुद्धिझम | मार्च १९४८ | ३ | १७ (२) | प्रो. पी. लक्ष्मी नरसु यांचे पुस्तक (तृतीय आवृत्ती) | |
४ | Forward to Social Insurance and India | फॉरवर्ड टू सोशल इन्शुरन्स अँड इंडिया | १९४८ | २ | ६ | ए.आर. इडगुंजी यांचे पुस्तक | |
५ | Preface to Rashtra Rakshake Vaidik Sadhan | प्रेफेस टू राष्ट्र रक्षते वैदिक सधन | १९४८ | १ | १७ (२) | स्वामी वेदान्ततीर्थ यांचे पुस्तक |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस
महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवलेली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने इंग्रजी भाषेत २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल १९७९ रोजी झाले होते.
महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.[१] या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत यांच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
पत्रकारिता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला इ.स. १९२० मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. इ.स. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. “पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.” हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.
पत्रकार व संपादक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली वृत्तपत्रे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वतःला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
स्फूट लेखन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने 'बहिष्कृत भारतात' आढळते. 'जनता' आणि 'प्रबुद्ध भारतात' स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते. बहिष्कृत भारताच्या इ.स. १९२७ सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात आजकालचे प्रश्न या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी 'प्रासंगिक विचार' या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे. विषयांचे वैविध्य हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.
बालविवाहाचे फलित, ब्राम्हण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्यसमाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ती, सायमन कमिशन इत्यादी अशा अनेक विषयावर बाबासाहेबांनी लेखन केले.
बाबासाहेब हे एक उत्तम व प्रभावी वक्ते होते, त्यांची भाषणे नेहमी तर्कशुद्ध व विद्वत्तापूर्ण असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवरील केलेली शेकडो भाषणे सुद्धा त्यांच्या साहित्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ५३७ पेक्षाही अधिक भाषणे केलेली आहेत यातूनही त्यांचे विचार स्पष्ट होतात. सामाजिक भाषणे, राजकिय भाषणे, आर्थिक विषयावर भाषणे, धार्मिक भाषणे, संविधान सभेतील भाषणे, शेतकरी-कामगारांविषयीची भाषणे, स्त्रियांविषयी भाषणे अशाप्रकारच्या अनेक विषयांवर त्यांनी प्रभावी भाषणे केलेली आहेत.
पत्रे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली पत्रे सुद्धा त्यांचा साहित्याचा एक भाग आहेत. त्यांनी लिहिलेल्या हजारों पत्रांतून त्याचे विचार स्पष्ट झालेले आहेत. बाबासाहेबांची पत्रे इंग्रजी, मराठी व काही इतर भाषेत आहेत.
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- आंबेडकरांचे तत्त्वज्ञान
बाह्य दुवे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची संकेतस्थळे
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण वाड्मय- २१ खंडांचे पीडिएफ
- आंबेडकरांच्या निवडक साहित्यकृती
- लेख व भाषणे - परराष्ट्र व्यवहार खात्याचे संकेतस्थळ
- इंग्रजीतील संपूर्ण साहित्य (पीडीएफ,ओपन सोर्स)
- ग्रंथाली प्रकाशन उपक्रम[२]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सृजनात्मक साहित्य (हिंदी लेख)
संदर्भ
- ^ डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण वाड्मय, २१ खंड पीएफ में
- ^ "साहित्य सांस्कृतिक : आंबेडकर साहित्य वाडय़ा-वस्तींकडे." Loksatta. 2019-03-13 रोजी पाहिले.