रिडल्स इन हिंदुइझम
Appearance
(हिंदू धर्मातील कोडे या पानावरून पुनर्निर्देशित)
रिडल्स इन हिंदुइझम | |
लेखक | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
भाषा | इंग्रजी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | धर्मशास्त्र |
प्रकाशन संस्था | महाराष्ट्र शासन |
प्रथमावृत्ती | इ.स. १९८७ |
विषय | हिंदू धर्माचे विवेचन |
रिडल्स इन हिंदुइझम (मराठी: हिंदू धर्मातील कोडे) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक इंग्लिश ग्रंथ आहे. इ.स. १९५६च्या सप्टेंबर महिन्यात आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला होता. त्यांना त्या ग्रंथात काही फेरफार करायचे होते, मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.[१] पहिल्यांदा इ.स. १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे' या श्रृंखलेखालील खंड चौथा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला होता. या ग्रंथात ग्रंथकाराने हिंदू धर्मातील अतार्किक बाबींवर प्रकाश टाकलेला आहे. मात्र त्यांनी राम-कृष्णादी पौराणिक देवतांवर केलेले विवेचन विवादास्पद ठरले होते. मराठी, हिंदीसह अनेक भारतीय व विदेशी भाषांमध्ये ग्रंथ अनुवादित झालेला आहे.[२]
ग्रंथ प्रकाशनावरून वाद व रिडल्स आंदोलन
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. २९८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "'रिडल्स इन हिंदुइझम'चा मराठी अनुवाद प्रकाशनाच्या मार्गावर". 2 जाने, 2015.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)