"राग मालकंस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २२: | ओळ २२: | ||
* मोरी लागी लटक गुरू-चरननकी ।। चरन बिना मुझे कछु नहीं भावे, झूठ माया सब सपननकी ।। १ ।। भवसागर सब सूख गया है, फिकर नहीं मुझे तरननकी ।। २ ।। मीरां कहे प्रभु गिरिधर नागर ! उलट भई मोरे नयननकी (तीन तालातील चीज) |
* मोरी लागी लटक गुरू-चरननकी ।। चरन बिना मुझे कछु नहीं भावे, झूठ माया सब सपननकी ।। १ ।। भवसागर सब सूख गया है, फिकर नहीं मुझे तरननकी ।। २ ।। मीरां कहे प्रभु गिरिधर नागर ! उलट भई मोरे नयननकी (तीन तालातील चीज) |
||
* विठ्ठल आवडी प्रेमभावो (कवी - संत [[नामदेव]], गायक - [[सुरेश वाडकर]]) |
* विठ्ठल आवडी प्रेमभावो (कवी - संत [[नामदेव]], गायक - [[सुरेश वाडकर]]) |
||
* सावळे सुंदर रूप मनोहर (कवी - संत [[तुकाराम]], गायक - [[भीमसेन जोशी]], संगीत - [[श्रीनिवास खळे]]) |
|||
१५:०८, २६ जुलै २०१५ ची आवृत्ती
राग मालकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. मालकंस रागाला सर्व रागांचा राजा मानले जाते. हा राग गायची वेळ रात्री १२ ते ३ ची आहे. हा काही वेळा मालकौश नावानेही ओळखला जातो. कर्नाटकी गायकीत या सदृष हिंदोलम हा राग असू शकतो. मालकंस साधारणपणे मंद्र सप्तकात गायला आणि विलंबित तालात असतो.
इतिहास
हा सर्वात पुरातन रागांपैकी एक राग आहे. संगीतकार नौशाद यांच्यासह एक वर्ग असे मानतो की या रागाची रचना भगवान शिव यांनी केली आहे. तर काही लोक मानतात की याची रचना पार्वतीने केली. शिव तांडव करत असताना बेभान झाले असता त्यांना शांत करण्यासाठी हा मालकंस राग पार्वतीने गायला.
स्वरूप
आरोह: नि स ग म ध नि सा
अवरोह:स नि ध म ग म ग सा अथवा सा नि ध म ग सा
वादी व संवादी
वादी स्वर मध्यम (म) आणि संवादी स्वर षड्ज (सा)
लक्षणगीत
मालकंस गावत गुनिजन रि प वर्जित सूर गधनी कोमल अत गंभीर रस सोहत सुंदर || अंतरा || वादी मध्यम जनको संमत संवादी सूर षड्जही मानत वेळा रजनी मध्य सुहावत
मालकंस रागातील काही गीते
- अणुरेणियां थोकडा, तुका आकाशाएवढा (कवी - संत तुकाराम, गायक - भीमसेन जोशी, संगीत - राम फाटक)
- बन बोलत कोयलिया सूर पंचम लागत अतही मधुर || अंतरा || आयी ऋत केसरी फूली फुलबेलरी तरू तरू न पल्लवित सोहत अत || १ || (त्रितालातील चीज, गायक भीमसेन जोशी व अनेक)
- मन तड़पत हरि दरशन को आज (कवी - शकील बदायुनी, गायक - मोहम्मद रफी, संगीत - नौशाद, चित्रपट - बैजू बावरा)
- मोरी लागी लटक गुरू-चरननकी ।। चरन बिना मुझे कछु नहीं भावे, झूठ माया सब सपननकी ।। १ ।। भवसागर सब सूख गया है, फिकर नहीं मुझे तरननकी ।। २ ।। मीरां कहे प्रभु गिरिधर नागर ! उलट भई मोरे नयननकी (तीन तालातील चीज)
- विठ्ठल आवडी प्रेमभावो (कवी - संत नामदेव, गायक - सुरेश वाडकर)
- सावळे सुंदर रूप मनोहर (कवी - संत तुकाराम, गायक - भीमसेन जोशी, संगीत - श्रीनिवास खळे)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |