बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२
Appearance
बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१–२२ | |||||
न्यू झीलंड | बांगलादेश | ||||
तारीख | १ – १३ जानेवारी २०२२ | ||||
संघनायक | टॉम लॅथम | मोमिनुल हक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | टॉम लॅथम (२६७) | लिटन दास (१९६) | |||
सर्वाधिक बळी | ट्रेंट बोल्ट (९) | एबादोत होसेन (९) | |||
मालिकावीर | डेव्हन कॉन्वे (न्यू झीलंड) |
बांगलादेश क्रिकेट संघाने जानेवारी २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. कसोटी सामन्यांआधी बांगलादेश संघाने एक सराव सामना खेळला. मूलत: वेळापत्रकात तीन ट्वेंटी२० सामन्यांचाही समावेश होता. परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यू झीलंड बोर्डाने ट्वेंटी२० सामने वगळून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले.
बांगलादेशने पहिला कसोटी सामना जिंकत इतिहास रचला. न्यू झीलंडविरुद्ध बांगलादेशने प्रथमच कसोटी विजय प्राप्त केला होता. परंतु हा विजयरथ बांगलादेशला चालु ठेवता आला नाही. दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करत न्यू झीलंडने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेनंतर न्यू झीलंडचा खेळाडू रॉस टेलर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.
सराव सामने
[संपादन]दोन-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि बांगलादेशी
[संपादन]२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- बांगलादेशचा कसोटीमध्ये न्यू झीलंडवरील हा पहिला वहिला विजय.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : बांगलादेश - १२, न्यू झीलंड - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- मोहम्मद नयीम (बां) याने कसोटी पदार्पण केले.
- रॉस टेलर (न्यू) याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : न्यू झीलंड - १२, बांगलादेश - ०.