ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८९-९०
Flag of New Zealand.svg
न्यू झीलंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १५ – १९ मार्च १९९०
संघनायक जॉन राइट ॲलन बॉर्डर
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मार्च १९९० मध्ये एक कसोटी सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका न्यू झीलंडने १-० ने जिंकली. कसोटी सामन्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंड आणि भारतासोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत भाग घेतला. ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिका जिंकली.

याआधी नोव्हेंबर १९८९ मध्येच या दोन देशांनी ऑस्ट्रेलियात एक कसोटी खेळली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडचा दौरा केला. तिरंगी मालिकेनंतर हा कसोटी सामना खेळविण्यात आला. वेलिंग्टन मधील बेसिन रिझर्व या स्थळावर सामना झाला. न्यू झीलंडने एकमेव कसोटी सामना ९ गडी राखून जिंकत ट्रान्स-टास्मन चषक पुन्हा मिळवला.

कसोटी मालिका[संपादन]

एकमेव कसोटी[संपादन]

वि
११० (४५.२ षटके)
पीटर टेलर २९ (७३)
रिचर्ड हॅडली ५/३९ (१६.२ षटके)
२०२ (१२१ षटके)
जॉन राइट ३६ (१४९)
टेरी आल्डरमन ४/४६ (२९ षटके)
२६९ (१०९.२ षटके)
पीटर टेलर ८७ (१५३)
जॉन ब्रेसवेल ६/८५ (३४.२ षटके)
१८१/१ (६३.४ षटके)
जॉन राइट ११७* (१९७)
ग्रेग कॅम्पबेल १/२३ (७ षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.