नोव्हेंबर ६
Appearance
नोव्हेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१० वा किंवा लीप वर्षात ३११ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
- १८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला
- १८६१ - जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला
- १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या सी.एस.एस. शेनान्डोआह या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले
विसावे शतक
[संपादन]- १९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसऱ्यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला
- १९४३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली
- १९६५ - क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले
- १९८५ - कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले
- १९८६ - ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार
एकविसावे शतक
[संपादन]- २००२ - पॅरिसहून व्हियेनाला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार
- २००४ - इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी
- २००५ - अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार
- २००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली
जन्म
[संपादन]- १४९४ - सुलेमान, ऑट्टोमन सम्राट
- १६६१ - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा
- १८४१ - आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष
- १८६० - इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष
- १८७६ - अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १८९३ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती
- १८९७ - जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १९१९ - ऍलन लिसेट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९२१ - जॉफ राबोन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
- १९२७ - एरिक ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
- १९४६ - सॅली फील्ड, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री
- १९४८ - ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार
- १९५६ - ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
मृत्यू
[संपादन]- १२३१ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट
- १४०६ - पोप इनोसंट सातवा
- १६३२ - गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा
- १६५६ - होआव चौथा, पोर्तुगालचा राजा
- १७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी
- १८३६ - चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा
- १८९३ - पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार
- १९२५ - खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा
- १९२९ - मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर
- १९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- संविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
- गुस्ताफस ऍडोल्फस दिन - स्वीडन.
नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)