अर्नी हेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्नी हेस 1912

अर्नी हेस तथा अर्नेस्ट जॉर्ज हेस ( ६ नोव्हेंबर १८७६ पॅकहॅम,लंडन - मृत्यू: २ डिसेंबर १९५३,वेस्ट डल्विच, लंडन) हा एक क्रिकेट खेळाडू होता जो सरे,लिसेस्टरशायरइंग्लंडसाठी खेळत होता.अर्नी हेस हा उजखोरा फलंदाज होता, जो साधारणपणे तिसऱ्या क्रमांकावर खेळत असे. तो फटके मारण्यात व पुलिंगमध्ये निष्णात होता.तसेच तो लेग ब्रेक गोलंदाजही होता. तो फाईन स्लिपमध्ये फिल्डिंग करीत असे.दुसरे विश्व युद्ध सुरू होईपर्यंत, तो सरेमार्फत सुमारे १५ वर्षे खेळला. सन १८९९ते १९१४ या दरम्यानच्या प्रत्येक मोसमात त्याने १००० व त्याअधिक धावा कमाविल्या. सन १९१६ हे त्याचे सर्वात चांगले वर्ष होते.त्या मोसमात त्याने दर इनिंग ४५ पेक्षा जास्त धावांच्या सरासरीने २३०९ धावा केल्यात. त्याला त्यामुळे सन १९०७ मध्ये 'विस्डन क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर' असे नाव देण्यात आले.त्याने सन १९०९ मध्ये हॅम्पशायर विरुद्ध ओव्हल मैदानावर २७६ ही सर्वोच्च धावसंख्या कमाविली.यातच त्याने जॅक हॉब्ज सोबत, दुसऱ्या विकेटसाठी ३७१ धावांची भागिदारी केली जी आजतागायत सरेमधील अत्युच्च आहे. हेसची गोलंदाजी ही अधून मधून फायदेशीर राहिली.सन १९०५ मध्ये त्याने ७६ बळी घेतले व १९१२ मध्ये ६०. पण इतर मोसमात फारच कमी बळी घेतले व तो पुष्कळ धावा देणारा गोलंदाज राहिला.सर्व सामन्यात मिळुन त्याने स्लिपचा फिल्डर म्हणून ६०० झेल घेतले.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.