सॅली फील्ड
ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री. | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Sally Field |
---|---|
जन्म तारीख | नोव्हेंबर ६, इ.स. १९४६ पसादेना Sally Margaret Field |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
सदस्यता |
|
राजकीय पक्षाचा सभासद | |
मातृभाषा | |
वडील |
|
आई |
|
अपत्य |
|
पुरस्कार |
|
सॅली मार्गारेट फील्ड (६ नोव्हेंबर १९४६)[१] ही अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. पडद्यावर आणि रंगमंचावर तिच्या विस्तृत कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या, तिला तिच्या पाच दशकांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ह्या पुरस्कारांमध्ये दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि तीन प्राइमटाइम एम्मी पुरस्कारांचा समावेश आहे, आणि एक टोनी पुरस्कार आणि दोन ब्रिटिश अकादमी (बाफ्टा) पुरस्कारांसाठी नामांकन देखील मिळाले आहे. तिला २०१४ मध्ये हॉलीवूड वॉक ऑफ फेम,[२] २०१४ मध्ये नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स, २०१९ मध्ये केनेडी सेंटर ऑनर आणि २०२३ मध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड[३] देण्यात आला आहे.
फील्डने दूरचित्रवाणीवर तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली ज्यात कॉमेडी मालिका गिजेट (१९६५-१९६६), द फ्लाइंग नन (१९६७-१९७०), आणि द गर्ल विथ समथिंग एक्स्ट्रा (१९७३-१९७४) मध्ये अभिनय केला.[४] तिला एनबीसी दूरचित्रवाणी चित्रपट सिबिल (१९७६) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार मिळाला.[५] तिचे चित्रपट पदार्पण मून पायलट (१९६२) मध्ये अतिरिक्त भूमीकेत झाले होते. त्यानंतर द वे वेस्ट (१९६७), स्टे हंग्री (१९७६), स्मोकी अँड द बँडिट (१९७७), हीरोज (१९७७), द एंड (१९७८), आणि हूपर (१९७८) मध्ये तिने काम केले होते. तिने नॉर्मा रे (१९७९)[६] आणि प्लेसेस इन द हार्ट (१९८४) साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे दोन अकादमी पुरस्कार जिंकले.[७] स्मोकी अँड द बँडिट २ (१९८०), अब्सेन्स ऑफ मॅलिस (१९८१), किस मी गुडबाय (१९८२), मर्फीज रोमान्स (१९८५), स्टील मॅग्नोलियास (१९८९), सोपडीश (१९९१), मिसेस डाउटफायर (१९९३) आणि फॉरेस्ट गंप (१९९४) या तिच्या उल्लेखनीय भूमिकांचा समावेश आहे.
२००० च्या दशकात, फील्ड एनबीसी वैद्यकीय नाटक ईआर मध्ये भूमिका घेऊन दूरचित्रवाणीवर परतली, ज्यासाठी तिने २००१ मध्ये ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीचा प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. एबीसी नाटक मालिका ब्रदर्स अँड सिस्टर्स (२००६-२०११) मधील नोरा वॉकरच्या भूमिकेसाठी, फील्डने ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[८] तिने लिंकन (२०१२) मध्ये मेरी टॉड लिंकन (अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनची पत्नी) यांची भूमिका साकारली, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अकादमी पुरस्काराचे नामांकन मिळाला होते. द अमेझिंग स्पायडर-मॅन (२०१२) आणि त्याच्या २०१४ च्या पुढील भागामध्ये तिने आंट मेची भूमिका साकारली होती. तिच्या इतर भूमिकांमध्ये हेलॉ, माय नेम इज डॉरीस (२०१५) आणि ८० फॅर ब्रॅडी (२०२३), तसेच नेटफ्लिक्स मर्यादित मालिका मॅनियाक (२०१८) मधील चित्रपटांचा समावेश आहे.
एडवर्ड अल्बीच्या मूळ ब्रॉडवे प्रॉडक्शनमध्ये मर्सिडीज रुहेलची जागा घेऊन तिने व्यावसायिक रंगमंचावर द गोट ऑर हू इज सिल्व्हिया? (२००२) या नाटकातून पदार्पण केले. फिल्ड १५ वर्षांच्या अनुपस्थितीनंतर २०१७ मध्ये टेनेसी विल्यम्सच्या द ग्लास मेनेजरी या नाटकाच्या पुनरुज्जीवनासह रंगमंचावर परतली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[९] २०१९ मध्ये आर्थर मिलरच्या ऑल माय सन्स या नाटकाच्या पुनरुज्जीवनातून तिने वेस्ट एंड थिएटरमध्ये पदार्पण केले.
वैयक्तिक जीवन
[संपादन]सॅली फील्डचा जन्म कॅलिफोर्नियामधील पासाडेना येथे ६ नोव्हेंबर १९४६ रोजी अभिनेत्री मार्गारेट फील्ड आणि द्वितीय विश्वयुद्धातील सैनिक रिचर्ड ड्रायडेन फील्ड यांच्या पोटी झाला. तिचा भाऊ रिचर्ड डी. फील्ड, एक भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक व्यवसायात आहे. १९५० मध्ये तिच्या पालकांचा घटस्फोट झाला होता; आणि २१ जानेवारी १९५२ रोजी तिजुआना मेक्सिकोमध्ये, तिच्या आईने जॉक महोनी, एक अभिनेता आणि स्टंटमॅनशी लग्न केले.[१०] फील्डने तिच्या २०१८ च्या "इन पिसेस" या संस्मरणात म्हणले आहे की तिच्या बालपणी महोनीने तिचे लैंगिक शोषण केले होते.[११][१२] किशोरवयात, फील्डने व्हॅन नुईसमधील पोर्टोला मिडल स्कूल आणि बर्मिंगहॅम हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, जिथे ती एक चीअरलीडर होती. तिच्या वर्गमित्रांमध्ये फायनान्सर मायकेल मिल्कन, अभिनेत्री सिंडी विल्यम्स आणि टॅलेंट एजंट मायकेल ओविट्झ यांचा समावेश होता.
फील्डने १९६८ ते १९७५ या काळात स्टीव्हन क्रेगशी लग्न केले होते. ते १९७३ मध्ये वेगळे झाले होते.[१३] या जोडप्याला दोन मुलगे होते: पीटर क्रेग, जो एक कादंबरीकार आणि पटकथा लेखक आहे; आणि एली क्रेग, जो एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. १९७६ ते १९८० पर्यंत, फील्डचे सह-कलाकार बर्ट रेनॉल्ड्सशी संबंध होता, त्या काळात त्यांनी स्मोकी अँड द बँडिट, स्मोकी अँड द बँडिट २, द एंड आणि हूपर या चार चित्रपटांमध्ये एकत्र काम केला.[१४] त्यांचे संबंध १९८० मध्ये संपले, व १९८२ मध्ये कायमचे विभक्त झाले.[१५][१६] फील्डने १९८४ मध्ये तिचा दुसरा पती ॲलन ग्रीझमन याच्याशी विवाह केला. एकत्रितपणे, त्यांना एक मुलगा, सॅम (जन्म १९८७) होता. फील्ड आणि ग्रीझमन यांचा १९९४ मध्ये घटस्फोट झाला.[१७]
संदर्भ
[संपादन]- ^ "Bio.com, Sally Field Biography Actress (1946–)". Biography.com. August 27, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 28, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Sally Field's Hollywood Walk of Fame star unveiled". 3 News. मे 7, 2014. मे 8, 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. मे 7, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Sally Field To Receive 2023 SAG Life Achievement Award". January 17, 2023. January 17, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. January 17, 2023 रोजी पाहिले.
- ^ "Gidget". TV.com. CBS Interactive. August 22, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 28, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Sally Field Emmy Winner". Emmys.com. November 25, 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2012-03-30 रोजी पाहिले.
- ^ Canby, Vincent (March 2, 1979). "Film: 'Norma Rae', Mill-Town Story: Unionism in the South". The New York Times. October 29, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 12, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Academy Award 1984" oscars.org, accessed October 3, 2016.
- ^ "Sally Field Emmy Awards and Nominations" Archived September 24, 2015, at the Wayback Machine., Emmys.com, accessed October 3, 2016.
- ^ Paulson, Michael (May 2, 2017). "2017 Tony Awards: 'Great Comet' Leads With 12 Nominations". The New York Times}. ISSN 0362-4331. May 30, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Sally Field Biography and Interview". Achievement.org. American Academy of Achievement. January 15, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 12, 2019 रोजी पाहिले.
- ^ Itzkoff, Dave (September 11, 2018). "Sally Field Talks About Her Life 'In Pieces'". The New York Times. October 15, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 29, 2018 रोजी पाहिले.
- ^ Labrecque, Jeff (November 7, 2011). "Sally Field's mother died". Entertainment Weekly. November 12, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 28, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Actress Pregnant With Third Child". apnews.com. May 6, 1987. March 19, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 28, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Burt & Sally In Love". People. August 12, 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 28, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Burt and Sally patch things up". The Spokesman-Review. April 3, 1981. March 19, 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 28, 2020 रोजी पाहिले.
- ^ "Sally Field- Biography". Yahoo! Movies. January 17, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 29, 2012 रोजी पाहिले.
- ^ Richard E. Burgheim (1995). People Weekly Yearbook: The Year in Review, 1994. Time Inc. p. 77. ISBN 9781883013042.