नाटक
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मकती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य किंवा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा०. ब्रेथ) बारा तासांपर्यंत (उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे.
नाटकाची व्याप्ती
[संपादन]नाट्य हे "सर्वकर्मांनुदर्शक आहे". कर्म हे संचित असते आणि त्याचे दर्शन कृती द्वारा होणारे असते . त्याचे अनुसंधान म्हणजे नाट्य म्हणता येईल .नाट्य हे त्रैलोक्याचे 'भावानुकीर्तन' असते. सर्व प्रकारच्या वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन असते. संपूर्ण विश्वातील सर्व जीवन व्यवहारातील भावांच्या श्रनुकीर्तनातून नाट्य प्रकट होते असे म्हणले की नाट्याची ही व्याप्ती लक्षात येईल .भावकीर्तनात जे जे असेल त्याचा परस्पर अन्वय, संबंध येथे प्रकट असतो असे म्हणले तर, नाट्य हा "सर्वभावान्वयापेक्षी वेद" आहे.
संदर्भ:- (संपा) आनंद वास्कर,वाङमयप्रकार: संकल्पना व स्वरूप, अन्वय प्रकाशन, पुणे.२००४, पृ.क्र.६७-६८
महाराष्ट्र हा नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे.
मराठीतील नाटकांपेक्षा हिंदीत आणि बंगालीत जास्त नाटके होतात. फरक एवढाच आहे की, एखादे मराठी नाटक दशकानुदशके रंगमंचावर येत राहते, आणि हिंदी नाटकाचे एक-दोन प्रयोग झाले की ते रंगमंचावर येणे बंद होते.
अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम नाटक :- नाटकासारखे जिवंत माध्यम जेथे असते, तेथे जिवंत माणसे जिवंत माणसांशी संवाद साधत असतात. जिवंत माणसे एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणे, त्यांचे विचार, त्यांना काय वाटते हे लोकांसमोर मांडणे हा एक त्यांतला महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप मोठा आनंद असतो. नाटकाचा झालेला कुठलाही प्रयोग हा परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नवीनच होत असतो, म्हणून नाटकाला प्रयोग म्हणतात. प्रत्येक वेळी त्याच्यात प्रेक्षकाला काहीतरी नवीन सापडते. आता सापडणे हेच जर तत्त्व मान्य केले तर ते सापडण्यासाठी प्रेक्षकाच्या फुटपट्ट्या काय असाव्यात, हा केवळ त्याचा व्यक्तिगत मुद्दा असतो. त्याला काय आवडते, काय वाटते, त्याच्या स्वतःच्या आजच्या सामाजिक धारणा काय आहेत, संवेदना काय आहेत, त्याला समाजकारण - राजकारणाविषयी काय वाटते, माणूस म्हणून जगत असताना त्याचे अत्यंत कळीचे, अत्यंत टोकाचे प्रश्न काय आहेत, की ज्यामुळे त्याला कोंडीत पकडल्यासारखे वाटते, हे महत्त्वाचे असते. अभिव्यक्त कशातूनही होणे याला मराठीतून माध्यम असे म्हंटले जाते. म्हणूनच नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.
नाटक आणि प्रयोगानुभव :-
माणूस जेव्हा एखादे नाटक पाहायला जातो, तेव्हा तो अनुभव कसा असतो?
एकतर त्याने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते, किंवा कोणीतरी त्याला नाटकाविषयी सांगितलेले असते. मग तो नाटक पाहायला जायचे ठरवतो, कोणासोबत किंवा एकटेच. कदाचित त्या नाटकाचा भाग असलेल्या कोणीतरी त्याला नाटक पाहायचे आमंत्रण दिलेले असते, नाहीतर मग तो तिकिट काढतो.
प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला माणूस नाटकघरात पोचतो. त्याच्याप्रमाणेच इतरही लोक नाटक पाहायला आलेले असतात. नाटकघराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या तसेच काही आगामी नाटकांची माहिती लावलेली असते. या माहितीमध्ये प्रामुख्याने नाटक कधी, किती वाजता आणि कुठे सादर होणार आहे, नाटकाचे नाव काय आहे, नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार कोण आहेत हे लिहिलेले असते. क्वचित प्रसंगी नाटकाचा प्रकार (संगीत, कौटुंबिक, सामाजिक, वगनाट्य, विनोदी, फार्स, इत्यादी) किंवा नाटकाचा विषय (महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे, भ्रष्टाचारावर भाष्य करणारे, इत्यादी) देखील नोंदविलेले असते. कधीकधी नाटकातील कलावंतांची किंवा नाट्यप्रसंगांची छायाचित्रे असतात. ते वाचत, बघत असतानाच माणसाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झालेली असते.
त्यानंतर माणूस तिकिट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर अनेक खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. तो त्याच्या आसनावर जाऊन बसतो. त्याच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतात. मग तो पण ह्या प्रेक्षकसमूहाचा एक भाग होतो. थोड्या थोड्या कालावधीने तीन घंटा होतात, प्रेक्षागृहातील दिवे मंद होऊ लागतात. आता, सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितले जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.
रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि प्रेक्षक नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात, त्यावरून त्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. एखादे घर किंवा कार्यालय, महाल, रस्ता किंवा जंगल असे काहीही. मंचावर असलेले किंवा प्रवेश केलेले नट-नट्या त्याला व्यक्तिरेखांची प्रचिती देतात. या व्यक्तिरेखा त्याच्याच समाजातील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांसारख्या असू शकतात किंवा परक्या देशातल्या, इतिहासातल्या किंवा काल्पनिकदेखील असू शकतात. त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे चालणे बोलणे असे काही असते की, ते ज्या जगात राहतात त्याची प्रेक्षकाला कल्पना येऊ शकते.
हळूहळू नाटक पुढे सरकते. प्रेक्षकाला नाटकातील व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध लक्षात यायला लागतात. कोणकोणत्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या जवळ येता आहेत, कोणकोणत्या एकमेकांशी फटकून वागताहेत. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय होऊ लागतो. काही व्यक्तिरेखा त्याला आपल्या अगदी जवळच्या वाटतात, तर काहींचा त्याला राग येतो. मंचावर जे काही घडते आहे त्यामुळे कधी त्याला गंमत वाटते तर कधी तो गंभीर होतो. व्यक्तिरेखा जेव्हा स्वतःचीच चेष्टा करतात, तेव्हा तो पण त्यांच्यावर हसतो. जेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतात, तेव्हा त्याला त्यांची काळजी वाटायला लागते. त्यांच्या वेदनेने तो ही दुःखी होतो. कधी नाटकातील थरार आणि रहस्य वाढत जाते, प्रेक्षक श्वास रोखून पहात राहतो. नाटक त्याच्या अत्युच्च बिंदुपाशी पोचते. हळूहळू प्रसंगांची उकल होते, आणि शेवटी त्याला हायसे वाटते.
पडदा पडतो. नाटक संपते. प्रेक्षाघरातील दिवे उजळतात.नाटक बघायला आलेली माणस टाळ्या वाजवतात. लोक हळूहळू प्रेक्षाघराबाहेर पडून काल्पनिका विश्वातून वस्तुनिष्ठ विश्वात प्रवेश करतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षाकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. अर्थात प्रत्येक वेळी हा अनुभव असाच असेल असे मात्र नाही; कधी ते जास्त हसले असतील तर कधी जास्त दुःखी झाले असतील. नाटकाचा हाच अनुभव अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवता येऊ शकतो. कधी एका मोठ्या प्रेक्षाघरात हजारो लोकांसोबत हा अनुभव घेता येतो, तर कधी समीपमंच घरात अगदी साठ-सत्तर प्रेक्षकांसोबत हा अनुभव घेता येतो. कधी नाटकातल्या गोष्टीत प्रेक्षक गुंगून जातो, तर कधी नाटकातील गोष्टीमुळे त्याला सभोवतालची जाणीव होते. कधी त्याला स्वतःसारख्याच व्यक्तिरेखा दिसतात, तर कधी आदर्श व्यक्तिरेखा दिसतात. काही नाटकांमधून त्याच्या भोतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके त्याला त्रिकालबाधित सत्याची जाणीव करून देतात; काही विचार करायला लावतात, तर काही केवळ केवळ अनुभव देतात. असे जरी असले, तरी एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे.
नाटकाचा इतिहास
[संपादन]भारतीय रंगभूमीचा इतिहास बराच प्राचीन आहे.
भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता, असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा जन्म झाला, आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. त्याचप्रमाणे. प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत.
इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.
संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्याची नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. परंतु ती त्रुटित स्वरूपात मिळालेली असल्याने कथानकाची पूर्ण कल्पना करता येत नाही. सन १९१२मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले स्वप्नवासवदत्ता हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. कर्णभार आणि ऊरुभंग या एकांकी नाटकांमध्ये महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातील कालिदास या नाटककाराची मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. ती शृंगाररसप्रधान आहेत. शूद्रकाने रचलेले मृच्छकटिक हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. यात चारुदत्त आणि वसंतसंनेच्या प्रणयकथेला समांतर अशी राज्यक्रांतीची कथा आहे. इतर संस्कृत नाटककारांमध्ये भवभूती (नाटक - उत्तररामचरित), विशाखादत्त (नाटक - मुद्राराक्षस), इत्यादींचा समावेश होतो.
भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवीही नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत असत.
नाट्यकोश
[संपादन]मुख्यत्वे मराठी भाषेतील नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा ’मराठी नाट्यकोश’, मराठी लेखक डॉ. वि.भा. देशपांडे यांनी संपादित केला आहे. १२००हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अमेय इन्स्पायरिंग बुक्सतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.
नाटकांचे लांबीनुसार वर्गीकरण
[संपादन]- नाट्यछटा (प्रयोग कालावधी काही मिनिटे)
- एकांकिका (३० ते ४५ मिनिटे)
- दीर्घांक (सव्वा ते दीड तास)
- लघुनाटक/नाटिका (सव्वा ते दीड तास)
- नाटक (तीन ते सहा तास)
- दीर्घ नाटक (प्रयोग कालावधी ९ तास)
- नाट्यत्रयी (३ नाटकांना लागणारा कालावधी)
नाट्यांतर्गत काळावरून वर्गीकरण
[संपादन]- पौराणिक (उदा० सौभद्र)
- मिथकाधारित (ययाति)
- ऐतिहासिक (उदा० भाऊबंदकी, भंगले स्वप्न महाराष्ट्रा, वेडात मराठे वीर दौडले सात)
- अनैतिहासिक-ऐतिहासिक (उदा० घाशीराम कोतवाल)
- सामाजिक (उदा० भावबंधन)
- कौटुंबिक (बाळ कोल्हटकरांची नाटके)
- भविष्य-नाटक (फ्युचरिस्ट प्ले, उदा० चारशे कोटी विसरभोळे)
- फॅंटसी (अद्भुतरम्य नाटक, उदा० जादूचा शंंख))
- विशिष्ट काळ नाट्य/प्रासंगिक नाटक (उदा० शारदा; डॉक्टर लागू; तो मी नव्हेच)
- राजकीय नाटक (स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर नाटक) (उदा० कीचकवध; संन्यस्त खड्ग; मी नथूराम बोलतोय)
- शोकात्मिका (उदा० सवाई माधवरावांचा मृत्यू)
- सुखात्मिका (उदा० तुझे आहे तुजपाशी)
नाट्यलेखन काळावरून वर्गीकरण
[संपादन]- अभिजात नाटक (क्लासिक)
- मॉडर्न (आधुनिक) नाटक
- मॉडर्न-क्लासिक स्थल-कालातीत नाटक (उदा० तमाशा, लोकनाट्य, दशावतार)
- अलिखित तत्कालस्फूर्ती नाटक (सोंगाड्याची बतावणी)
नाट्यस्थळावरून वर्गीकरण
[संपादन]- पथनाट्य
- परिसर रंगभूमी
- रिंगण नाट्य
- रंगमंच नाटक
- निकट-मंच नाटक
- देवळात, पटांगणात, जत्रेत, झाडाच्या पारावर वा तंबूत होणारी लोकनाट्ये
नाट्यसंगीत
[संपादन]मराठी संगीत नाटकांच्या उत्कर्षकाळात मराठी नाट्यसंगीत या नावाचा एक नवाच गीतप्रकार उदयास आला. मराठी नाट्यसृष्टीची शताब्दी झाली तरी संगीताचा हा प्रकार महाराष्ट्रात अजूनही लोकप्रिय आहे. मराठीत नाट्यसंगीताचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत.
मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक
[संपादन]ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.
संगीत मराठी नाटके
[संपादन]विष्णूदास भावे हे आद्य संगीत नाटककार होते.
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली. नाटके बंद झाली तरी त्यांतील पदे अनेकदा अन्य गायकांकडून गायली जातात.
प्रायोगिक रंगभूमी
[संपादन]मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे. नाटकांमधील नावीन्य आणि प्रयोग हे प्रायोगिकमध्ये पाहायला मिळतात. प्रायोगिक नाटक काही वेळा सामान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. प्रायोगिक नाटकात नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा आदींचा वापर अत्यंत कमी असतो. यात नेपथ्य “सूचक’ आणि प्रतिकात्मक असते. संगीत मर्यादित असू शकते किंवा अजिबात नसू शकते. यामध्ये संहिता आणि संहितेचा आशय मांडण्यावर अधिक भर दिलेला असतो; परंतु व्यावसायिक नाटकात या सगळ्याचा वापर आणि भर हा कलाकृती आकर्षक करण्यावर दिलेला असतो. संहिता आणि संहितेचा आशय याचा विचार व्यावसायिक दृष्टिकोनातून कलाकृती आकर्षक करण्यावर अधिक असतो. यामध्ये असणाऱ्या स्पर्धा आणि प्रेक्षकांचा विचार केला, तर प्रेक्षक वर्ग दोन्ही ठिकाणी भिन्न किंवा एकसारखा असू शकतो. आर्थिक गणिते मात्र, सर्वस्वी संहिता कोणत्या प्रकारची आहे?, तिचे किती प्रयोग करायचे आहेत?, प्रायोगिक का व्यावसायिक? यावरूनच मांडावी लागतात. विविध रुची संपन्न प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकसंख्या नेहमीच कमी-जास्त होत असतात.
नटसम्राट
[संपादन]मराठी नाटकांमध्ये गाजलेल्या नाटकांत नटसम्राट हे नाटक खूप चर्चिले जाते. हे नाटक शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणे हे एक आव्हान समजले जाते. फारच थोड्या नटांनी ते स्वीकारले आणि यशस्वीरीत्या पार पाडले. श्रीराम लागू, दत्ता भट, दत्ता मयेकर, मोहन जोशी, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हे त्यांपैकी काही अभिनेते होत. ह्या नाटकावर एक मोठा चित्रपटही झाला. त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारली होती. नटसम्राट नाटकाचे हिंदी रूपांतरही झाले आहे. त्यात अप्पा बेलवलकरांची भूमिका आलोक चटर्जी करतात.
नाटकांचे प्रकार
[संपादन]- अतिनाट्य (मेलोड्रामा)
- अभिजात नाटक
- असंगत नाट्य (न-नाट्य)
- आधुनिक अभिजात नाटक
- एकपात्री नाटक
- एकांकिका
- ऐतिहासिक नाटक
- कलावादी नाटक
- गद्यनाटक
- चर्चानाट्य
- चित्रनाट्य
- जीवनवादी नाटक
- तमाशा
- त्रिनाट्यधारा (नाट्यत्रयी)
- दशावतार
- दूरचित्रवाणी मालिका
- दीर्घनाटक
- दीर्घांकिका
- न-नाट्य (असंगत नाट्य)
- नभोनाट्य (श्रुतिका)
- नाटिका
- नाट्यछटा
- नाट्यत्रयी (त्रिनाट्यधारा)
- नाट्यवाचन
- नुक्कड नाटक
- नृत्यनाटिका (बॅले)
- पथनाट्य
- पुरुषपात्रविरहित नाटक
- पौराणिक नाटक
- प्रहसन (फार्स)
- प्रायोगिक नाटक
- फिजिकल नाटक
- बालनाट्य
- बाहुली नाट्य (कठपुतळी)
- बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)
- भक्तिनाट्य
- भयनाट्य
- भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले)
- भाण किंवा मिश्र भाण : एक प्रकारचे संस्कृत एकपात्री नाटक
- भारूड
- महानाट्य : रंगमंचावर सादर न करता येण्यासारखे मैदानावर करायचे नाटक
- मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड)
- मुक्तनाट्य
- मूकनाट्य
- रिंगणनाट्य
- लघुनाटक
- लळीत
- लोकनाट्य
- वास्तववादी नाटक
- विधिनाट्य
- विनोदी नाटक
- विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले)
- विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी)
- व्यक्तिकेंद्री नाटक
- शोकात्मिका
- स्त्रीपात्रविरहित नाटक
- श्रुतिका (नभोनाट्य)
- संगीत नाटक
- संगीतिका (ऑपेरा)
- समस्याप्रधान नाटक
- समूहकेंद्री नाटक
- साभिनय नाट्यवाचन
- सामाजिक नाटक
- सुखात्मिका
- सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)
- क्षोभ नाट्य
बहुभूमिका नाटके
[संपादन]नाटक, आणि त्या नाटकात एकाच व्यक्तीची अनेक रूपे सादर करणारे अभिनेते: -
- गंमत जंमत (अरुण नलावडे + रसिका ओक + सोनाली चेऊलकर(?))
- चार दिवस प्रेमाचे (दहा भूमिका, सविता प्रभुणे + प्रशांत दामले)
- चूक भूल द्यावी घ्यावी (तीन भूमिका, निर्मिती सावंत)
- जस्ट हलकंफुलकं (५ भूमिका, विजय कदम + रसिका ओक); (सागर कारंडे + अनिता दाते)
- तू तू मी मी (१४ भूमिका, विजय चव्हाण); (संतोष पवार)
- तो मी नव्हेच (प्रभाकर पणशीकर)
- प्यार किया तो डरना क्या (३ भूमिका)
- थरार (दोन भूमिका, सतीश पुळेकर)
- बहुरूपी प्रशांत दामले (२ भूमिका, प्रशांत दामले)
- बे दुणे पाच (पाच भूमिका, प्रशांत दामले)
- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (२ भूमिका)
- श्रीमंत दामोदर पंत (२ भूमिका)
- सही रे सही (४ भूमिका, भरत जाधव)
- हसवाफसवी (सहा भूमिका, दिलीप प्रभावळकर); (पुष्कर श्रोत्री)
रंगभूमीचे प्रकार आणि शाखा
[संपादन]- आसामी रंगभूमी
- उर्दू रंगभूमी
- एलिचपूरची नाट्यपरंपरा
- ओरिसा रंगभूमी
- कानडी रंगनभूमी
- कामगार रंगभूमी
- गुजराती रंगभूमी
- ग्रिप्स थिएटर
- ग्रीक रंगभूमी
- झाडीपट्टीची रंगभूमी
- तंजावरी रंगभूमी
- तामीळ रंगभूमी
- तिसरी रंगभूमी
- तेलगू रंगभूमी
- दलित रंगभूमी
- निमव्यावसायिक रंगभूमी
- नुक्कड नाट्य
- पंजाबी रंगभूमी
- पथनाट्य
- परिसर रंगभूमी
- पारसी रंगभूमी
- प्रचार रंगभूमी
- प्रसार रंगभूमी
- प्रायोगिक रंगभूमी
- प्रौढ रंगभूमी
- बंगाली रंगभूमी
- बाल रंगभूमी
- ब्लॅक रंगभूमी
- भक्तिनाट्य
- मल्याळी रंगभूमी
- रिंगणनाट्य
- लोककला रंगभूमी
- विधिनाट्य
- विद्यार्थी रंगभूमी
- व्यस्ततावादी रंगभूमी
- व्यावसायिक रंगभूमी
- शालेय रंगभूमी
- संस्कृत रंगभूमी
- समांतर रंगभूमी
- सिंधी रंगभूमी
- स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी]])
- हिंदी रंगभूमी
- हौशी रंगभूमी
नाट्यशास्त्र अध्यापन संस्था
[संपादन]- ॲकॅडमी ऑफ़ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नाट्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, नाट्यशास्त्र विभाग (महाराष्ट्र)
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, औरंगाबाद (महाराष्ट्र).
- इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च (IAPAR), पुणे. (२०१७ सालचे संचालक - प्रसाद वनारसे)
- चतुरंग प्रतिष्ठान, पुणे
- नाट्यसंस्कार कला अकादमी
- भरत नाट्यसंशोधन मंदिर, पुणे
- मॉडर्न महाविद्यालय, पुणे
- ललितकला केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे
- शिक्षकांसाठी अभ्यासनाट्य शिबीर : ही शिबिरे हे अनेक संस्था भरवतात. असे एक शिबीर, पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त भरवले होते.
- विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान : नाट्यसंगीतातली पदवी आणि पदविका देणारी संस्था
- रंगशाळा, कोकणाचे सिने- नाट्य विद्यालय रत्नागिरी.
- रमेश कीर कला अकादमी, रत्नागिरी
नाट्य महोत्सव
[संपादन]महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. असे काही नाट्य महोत्सव --
- अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे इ.स. १९०५ पासून भरत आले आहे.
- औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचा वार्षिक नाट्यमहोत्सव (इ.स. १९७३पासून)
- सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय , औरंगाबाद येथील नाट्यशास्त्र विभाग आयोजित वार्षिक नाट्य महोत्सव.
- पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव
- पु.ना. गाडगीळ ज्युवेलर्स पुरस्कृत नाट्यमहोत्सव
- पुणे नाट्यसत्ताक महोत्सव (इ.स. २०१६पासून)
- पृथ्वी थिएटर्सचा आंतरराष्ट्रीय थेप्सो नाट्य महोत्सव
- झी युवा (दूरचित्रवाणी) वाहिनीचा (गाजलेल्या एकांकिकांचा) प्रयोगोत्सव (इ.स. २०१७पासून)
- प्रेरणायन (पुण्यातील 'प्रेरणा – एक कलामंच' या संस्थेचा नाट्यमहोत्सव) (इ.स. २००८पासून)
- महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव (इ.स.. १९६१पासून)
- मुंबई विद्यापीठाच्या "ॲकॅडमी ऑफ़ थिएटर आर्ट्स "या नाट्यप्रशिक्षण संस्थेचा दरवर्षी होणारा "राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव" (इ .स. २००४पासून)
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजलेला कणकवली नाट्योत्सव (इ.स. १९९२पासून)
- भरत नाट्य मंदिराचा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव
- विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), (२०१९ सालापसून 'सारंग थिएटर नाट्यमहोत्सव' या नवीन नावाने), पुणे.
- दैनिक सकाळ आयोजित नाट्यमहोत्सव
नाट्यस्पर्धा
[संपादन]- अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
- कांकरिया करंडक बालनाट्य स्पर्धा, अहमदनगर
- चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा
- दादा कोंडके करंडक नाट्य एकांकिका आणि एकपात्री स्पर्धा
- दीर्घांक स्पर्धा
- दैनिक लोकसत्तातर्फे चालणाऱ्या लोकांकिका नावाच्या एकांकिका स्पर्धा
- दैनिक सकाळ सोशल फाउंडेशनच्या ’आंतरशालेय सकाळ नाट्यवाचन स्पर्धा’ आणि शिक्षकांसाठी ’सकाळ नाट्यलेखन स्पर्धा’
- नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (२०२० सालापासून)
- नवी मुंबई महापौर राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा (२०२० सालापासून)
- फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा
- पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धा
- पुणे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संघ घेत असलेली आंतरशालेय (यशवंतराव चव्हाण) बालनाट्य स्पर्धा (इ.स. १९६०पासून)
- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वार्षिक राज्य नाट्य स्पर्धा (इ.स. १९६१पासून)
- महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी संस्कृत नाट्य स्पर्धा (इ.स. १९६२पासून)
- रंगवैखरी : आंतरमहाविद्यालयीन नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य स्पर्धा. या वार्षिक स्पर्धा राज्य मराठी विकास संस्थेतर्फे सन २०१७ पासून भरवल्या जातात.
- रंगसंगीत एकांकिका स्पर्धा : संगीत नाटकांची परंपरा अबाधित राहावी, या उद्देशाने 'थिएटर ॲकॅडमी'तर्फे इ.स. २०११ सालापासून आयोजित केली जाणारी स्पर्धा.
- राजा परांजपे प्रॉडक्शन्सतर्फे राजा परांजपे करंडक (महाराष्ट्र) राज्यस्तरीय दीर्घांक (नाट्य) स्पर्धा
- रोटरी क्लबतर्फे विनोदी एकांकिका स्पर्धा
- विजय फौंडेशन, अकलूज आयोजित पु.ल.देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (सन २००५ पासून) राज्यातील ५ विभागांमध्ये : नाशिक, मुंबई, औरंगाबाद, अमरावती व पुणे.
- विनोद दोशी नाट्यस्पर्धा
- शाहू मोडक स्मृती करंडक स्पर्धा, अहमदनगर
- श्रीरामपूरला महाराष्ट्र शुगर फॅक्टरीतर्फे चालणाऱ्या नाट्यस्पर्धा (आता बंद झाल्या असाव्यात).
- सोलापूरची हरिभाऊ देवकरण प्रशाला आंतरशालेय नाट्यस्पर्धा
नाट्य पुरस्कार
[संपादन]- संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
- झी नाट्य गौरव पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार
- पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पुरस्कार
- पु.श्री. काळे स्मृती पुरस्कार
- नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
- उत्कृष्ट एकांकिेसाठी पुरुषोत्तम करंडक
- भार्गवराम आचरेकर स्मृती पुरस्कार
- एकपात्री कलाकारांसाठी मधुकर टिल्लू स्मृती पुरस्कार
- लोकनाट्यातील कलाकारांसाठी मधू कडू स्मृती पुरस्कार
- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुरस्कार
- विनोदी एकांकिकेसाठी विनोदोत्तम करंडक
- विष्णूदास भावे पुरस्कार
- सुनील तारे स्मृती पुरस्कार
रंगभूषाकार
[संपादन]नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते. मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --
- कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३)
- नारायण देशपांडे (मृत्यू डिसेंबर २०१७)
- पंढरीनाथ जूकर
- प्रा. रवी कुलकर्णी ( औरंगाबाद )
प्रकाशयोजनाकार
[संपादन]- शीतल तळपदे
- प्रा. गजानन दांडगे डाॅ. बा आं. म. विद्यापीठ (नाट्यशास्त्र विभाग) महाराष्ट्र 431001
- प्रा. कैलास पुपुलवाड , भिसिकर.( महाराष्ट्र )
नाट्यसमीक्षक
[संपादन]- अरुण धाडीगावकर
- जयंत पवार
- दिवाकर दत्तात्रय गंधे
- वि.भा. देशपांडे
आधुनिक मराठी नाटके
[संपादन]१९७० च्या दशकात, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित दोन ऐतिहासिक नाटके लोकप्रिय झाली ज्यात 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे छत्रपती राजाराम भोसले त्यांच्या नेतृत्वाखाली संताजी-धनाजी यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी मुघल साम्राज्या विरुद्ध केलेल्या संघर्षावर आधारित[१] तर 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती प्रतापराव गुजर यांनी केवळ सहा सरदारांना बरोबर घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यावर आधारित होते[२] . यानंतर, १९८४ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे 'जाणता राजा' हे महानाट्य रंगमंचावर आले आणि अफाट लोकप्रिय झाले.
१९९० च्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकाकडे मराठी प्रेक्षकांनी काही प्रमाणात पाठ फिरवली होती. या काळातील उत्तम नाटकांना नोंद घेण्याइतपत प्रेक्षक प्रतिसाद मिळत नव्हता. टीव्ही मालिकांच्या सस्त्या करमणुकीशी स्पर्धा करत व्यावसायिकांनी विनोदी नाटके देऊन प्रेक्षकांना वश करून पाहण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीत जागतिकीकरणोत्तर बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने तोवर टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. या बदलांत मराठी माणसाच्या करमणुकीच्या यादीतले नाटकाचे अग्रस्थान घसरत घसरत खूप खाली गेले. तशात मराठी चित्रपटांनी आश्चर्यकारकरीत्या उचल खाल्ली आणि नाटकांना आणखी एक धक्का बसला. असे असले तरी एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठी नाटकांना परत ऊर्जितावस्था आली. या काळात रंगभूमीवर नवीनच किंवा नव्याने येऊन प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेली नाटके अशी :
‘अबीर गुलाल’, ‘अ फेअर डील’, ‘ऑल दि बेस्ट, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘इंदिरा’, ‘कळत नकळत’, ‘कहानी में ट्विस्ट’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘गोष्ट तशी गमतीची’, जन्मरहस्य’, ‘ठष्ट’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’, ‘ढोलताशे’, ’दी दोघं’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’ ‘लगीनघाई’, 'वाडा चिरेबंदी’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘श्री बाई समर्थ’, ’सही रे सही’, ‘स्पिरीट’, ‘सुस्साट’, ‘सेल्फी’, ‘हा शेखर खोसला कोण आहे’, वगैरे. (अपूर्ण यादी)
आधुनिक मराठी नाटककार (व त्यांचे एखादे नाटक)
[संपादन]अतुल पेठे, अनिल दांडेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, आशुतोष पोतदार, इरफान मुजावर (नंगी आवाजे), किरण यज्ञोपवीत, केदार शिंदे, चैतन्य सरदेशपांडे, तुषार भद्रे (लादेनच्या शोधात), दिलीप जगताप, धर्मकीर्ती सुमंत ('गेली एकवीस वर्षे', 'पाणी चारु आरो इत्यादी...', ‘नाटक नको’ ), डॉ. निलेश माने, प्रदीप वैद्य, प्राजक्त देशमुख, मनस्विनी लता रवींद्र, महेश एलकुंचवार, बशीर मोमीन (भंगले स्वप्न महाराष्ट्रा, वेडात मराठे वीर दौडले सात), मिहिर राजदा (मराठी नाटक - Don't Worry Be Happy), युगंधर देशपांडे (दीर्घांक- अगदीच शून्य प्रयोग), राजकुमार तांगडे (शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला), राजन देऊसकर, राजीव मुळे (बैल-अ-बोलबाला), विद्यासागर अध्यापक (दर्द-ए-डिस्को), संतोष गुर्जर, सौरभ पाटील, प्रा. हिमांशु स्मार्त (ढेकर आख्यान, परफेक्ट मिसमॅच)
पुरस्कार प्राप्त लेखक:
- बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१५ चा 'महाराष्ट्र भूषण' देऊन गौरविले आहे.
- धर्मकीर्ती सुमंत यांना २०१२ या वर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित केले गेले.
- बशीर मोमीन (कवठेकर) यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८ चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरविले आहे.[३][४]
- संपदा जोगळेकर कुळकर्णी लिखित ' सोबत संगत ' २०१२ मधील ऐश्वर्या आर्ट्स अँड एन्टरटेन्मेंट निर्मित नाटक.
- संपदा जोगळेकर कुळकर्णी लिखित " चि. सौ. कां.रंगभूमी " हे नाटक नाट्यसंपदा कलामंच निर्मित नाटक.
नाट्यगृहे
[संपादन]नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
‘ॲड. नाना लिमये रंगमंच’ हे अलिबाग शहरात पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्त्वावर उभारलेले महाराष्ट्र राज्यातील पहिले नाट्यगृह आहे. ह्याचे उद्घाटन ७-७-२०१७ रोजी झाले.
- प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृह, चंद्रपूर (विदर्भ) आसन संख्या 830
बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :
- अण्णा भाऊ साठे रंगमंच, बिबवेवाडी, पुणे (आसनसंख्या ८५०)
- अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृह, राणीचा बाग प्रांगण, भायखळा, मुंबई
- अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर (नाट्यगृह), येरवडा (पुणे). (आसनसंख्या ७००)
- अण्णा भाऊ साठे स्मारक नाट्यगृह (पद्मावती-पुणे)
- आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
- प्र.के. अत्रे नाट्यगृह, संत तुकारामनगर, पिंपरी (पुणे); (आसनसंख्या ८००)
- अनंतफंदी खुले नाट्यगृह, संगमनेर (अहमदनगर जिल्हा)
- अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
- अल्फोन्सो, मुंबई
- अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी (पिंपरी-चिंचवड) (आसनसंख्या १०००)
- अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई
- अनंतराव ठाकुर नाट्यगृह (वसई पारनाका)
- डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
- आनंदी विधान, अहमदनगर (बंद झाले)
- आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे (आसनसंख्या ४००)
- आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
- इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
- इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पूल, दत्तवाडी चौक (पुणे)
- इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
- उद्यान प्रसाद, पुणे
- एकनाथ नाट्यगृह (संत एकनाथ रंगमंदिर), औरंगाबाद. स्थापना सप्टेंबर १९८९.
- एन.सी.पी.ए.चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट, मुंबई
- एन.सी. पी.ए.चे गोदरेज सभागृह
- एन.सी.पी.ए.चे टाटा नाट्यगृह
- एन.सी.पी.ए.चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
- एन.सी.पी.ए.चा जमशेदजी भाभा हॉल
- एस.एन.डी.टी. कॉलेज सभागृह, पुणे
- एस.एम. जोशी हॉल, पुणे
- औंधकर नाट्यगृह, बार्शी (बहुधा बंद पडले असावे).
- कर्नाटक संघ (झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई; (आसनसंख्या ७७४)
- कला अकॅडमी, पणजी, गोवा
- कॉकटेल थिएटर, मुंबई
- कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
- कामा हॉल, काळा घोडा, मुंबई
- कालिदास, नाशिक
- कालिदास, मुलुंड, मुंबई; (आसनसंख्या १५८०)
- कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन, मुंबई
- कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव, मुंबई
- काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
- काशीनाथ (मिनी), ठाणे
- काळे सभागृह, पुणे
- कीर्तन केंद्र, संघवी शाळेसमोर, जुहू, मुंबई
- कुंदनलाल सैगल खुले नाट्यगृह, मालाड पूर्व, मुंबई
- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना
- केशवराव भोसले नाट्यगृह (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
- खासबाग कुस्त्यांचे मैदान वजा खुले नाट्यगृह, कोल्हापूर
- गडकरी रंगायतन, ठाणे;(आसनसंख्या ८००)
- गणेश कला केंद्र, पुणे (आसनक्षमता २५००)
- गणेश कला क्रीडा मंच
- गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
- गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
- गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
- गोकुळ तमाशा थिएटर, सांगली
- गोखले सभागृह, पुणे
- ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
- गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीचे नाट्य गृह , औरंगाबाद .
- घाटे नाट्यगृह, सातारा
- घोले रोड(पुणे)च्या आर्ट गॅलरीच्या बिल्डिंगमध्ये असलेले प्रस्तावित नाट्यगृह (आसन क्षमता २२५)
- चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
- ज्योत्स्ना भोळे सभागृह
- चव्हाण नाट्यगृह, अंबरनाथ (ठाणे जिल्हा)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई (आसनसंख्या ९२८)
- चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव (आता पाडून टाकले.)
- छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या ७००)
- छाया तमाशा थिएटर, सोलापूर
- जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
- पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह, घोले रोड (पुणे).
- पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, कॅन्टॉनमेन्ट (पुणे). (आसनसंख्या २२५)
- जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्या २५०)
- जैन संघ, कोथरूड (पुणे)
- जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
- ज्योत्स्ना भोळे रंगमंच, हिराबागेजवळ, पुणे (प्रायोगिक नाटकांसाठी छोटे नाट्यगृह)
- झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
- झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम (मुंबई), (आसनसंख्या ७७४)
- टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट, मुंबई
- टिंबर भवन , यवतमाळ
- टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे) (आसनसंख्या ९००)
- प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली (पश्चिम), मुंबई (बोरीवली नाट्यगृह या नावाने अधिक परिचित)
- तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
- तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
- संत तुकाराम नाट्यमंदिर (प्रचलित नाव सिडको नाट्यगृह), औरंगाबाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यगृह, औरंगाबाद
- तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टॅंक, मुंबई
- तेंडुलकर रेस्टॉरन्ट्स हॉल, मुंबई
- मास्टर दत्ताराम नाट्यगृह, फोंडा, गोवे.
- दमाणी सभागृह (सोलापूर. येथे आता नाटके होत नाहीत.)
- दर्शन हॉल , चिंचवड
- दादासाहेब गायकवाड, नाशिक
- दादासाहेब सरदेशपांडे (खुले?) नाट्यगृह, राजापूर (रत्नागिरी जिल्हा). हे नाट्यगृह बंद पडले आहे?
- दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
- दीनानाथ नाट्यगृहर, विलेपार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
- दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी).
- दीनानाथ सभागृह, पणजी (गोव्याच्या कला अकादमीतला एक रंगमंच)
- देवांग मेहता ऑडिटोरियम, सेनापती बापट रस्ता, पुणे
- पु.ल. देशपांडे नाट्यगृह, आकुर्डी (पुणे) (आसनक्षमता १००० - बांधकाम चालू)
- नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, कोपरगाव (अहमदनगर जिल्हा)
- नटराज नाट्यकला मंडळाचे नाट्यगृह, (बारामती) या नाट्यगृहात २९-४-२००१ रोजी हेमंत एदलाबादकर यांनी ‘तुम्ही आणि तुमचा भाग्यांक’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग सलग २८ तास ३० मिनिटे सादर केला.
- नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
- नॅशनल कॉलेजशेजारचे खुले नाट्यगृह, वांद्रे, मुंबई
- नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
- बॅ. नाथ पै रंगमंच (छोटे नाट्यगृह), पुणे (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
- ॲड. नाना लिमये रंगमंच (अलिबाग) : सहकारी तत्त्वावर उभारलेले नाट्यगृह
- निर्मलकुमार फडकुले नाट्यगृह, सोलापूर
- निळूभाऊ फुले रंगमंदिर (पिंपळे गुरव-नवी सांगवी-पुणे)
- नूतन मराठी विद्यालय, पुणे
- नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
- नेहरू सेंटर, हाजी अली, वरळी, मुंबई
- पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
- पत्रकार भवन, पुणे
- परशुराम सायखेडकर, नाशिक
- पलुस्कर सभागृह, पंचवटी(नाशिक)
- पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
- पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मरीन लाइन्स(मुंबई)
- पाटोळे नाट्यगृह, मलकापूर
- पाटोळे नाट्यगृह, खामगाव
- पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
- पु.ल. देशपांडे सभागृह (पु.ल.देशपांडे कला अकादमी -रविंद्र नाट्य मंदिर),
- पिंपळे गुरव नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड (बांधकाम चालू -आसनसंख्या ५१८)
- पुरंधरे यांचे नाट्यगृह, पंढरपूर
- पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०) (शिवाय एक खुला रंगमंच)
- पै ट्रियाट्रिस्ट हॉल, मडगाव, गोवा
- बॅ. नाथ पै नाट्यमंच, पुणे (प्रायोगिक नाटकांसठी छोटे नाट्यगृह) (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
- पैसाफंड हायस्कूल रंगमंदिर, संगमेश्वर (रत्नागिरी जिल्हा)
- प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली (पश्चिम), मुंबई
- प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरीवली(प), मुंबई
- प्रबोधनकार ठाकरे खुला रंगमंच, शिवडी, मुंबई
- प्रमिलाताई ओक सभागृह(खासगी), अकोला
- प्रियदर्शिनी खुले नाट्यगृह, श्रीरामपूर (अहमदनगर जिल्हा)
- क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल (आसनसंख्या ७००)
- फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे
- फाइन आर्ट्स,चेंबूर, मुंबई
- महात्मा फुले नाट्यगृह, वानवडी (पुणे) (आसनसंख्या ७५० की ८१५?)
- [[सावित्रीबाई फुले[[ नाट्यगृह, डोंबिवली.
- सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (पुणे). (आसनक्षमता ४७५)
- बाकानेर, नागपूर
- बागडे नाट्यगृह, अहमदनगर
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का (पुणे)
- बालगंधर्व खुले नाट्यगृह, जळगाव
- बालगंधर्व, नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, धुळे
- बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज(पुणे) (आसनसंख्या ९९०)
- बालगंधर्व, मिरज
- बालप्रसार, नागपूर
- बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
- बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, पुणे
- बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, कोथरूड, पुणे (आसनसंख्या ३८४)
- बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई); (आसनसंख्या ६१७)
- बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई); (आसनसंख्या११६२)
- बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कोलनी (मुंबई)
- बुरीबेन गोळवाला, घाटकोपर (मुंबई)
- बोरीवली नाट्यगृह, मुंबई
- ब्रह्मानंद, नाशिक
- भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
- भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
- भवभूती रंगमंदिर, गोंदिया
- भाईदास, पार्ले, मुंबई; (आसनसंख्या ११५७)
- भागवत चित्र मंदिर (सोलापूर. आता नाट्यप्रयोग होणे बंद झाले)
- भारत भवन, खुले आणि बंदिस्त नाट्यगृहे, भोपाळ
- भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी, मुंबई; (आसनसंख्या ५००)
- भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
- भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
- पं. भीमसेन जोशी कलामंदिर, औंध, पुणे (आसनसंख्या ५००)
- भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड, पुणे
- मराठी साहित्य परिषद हॉल(माधवराव पटवर्धन सभागृह), पुणे
- मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
- महालक्ष्मी तमाशा थिएटर, बार्शी
- मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
- मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना
- माहीम म्युनिसिपल स्कूल सभागृह, मुम्बई
- माणिक सभागृह, वांद्रे रिक्लेमेशन,मुंबई; (आसनसंख्या ८००)
- मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- मीनाताई ठाकरे, भिवंडी
- मुक्त आकाश रंगमंच, मुंबई विद्यापीठ प्रांगण, कलिना, मुंबई
- मुक्तांगण हायस्कूल हॉल, शिवदर्शन चौक, पुणे
- मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
- मेघदूत खुले नाट्यगृह, दिल्ली
- कवी मोरोपंत नाट्यगृह, बारामती
- म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
- यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; हे नाट्यगृह ११८ बाय १६७ फूट या मापाचे असून त्याची उंची ३४ फूट आहे. आत एक ६७ बाय २६ फुटाची बाल्कनी आहे. नाट्यगृहात एकूण ९२८ बैठक व्यवस्था आहेत. नाट्यगृहाच्या पुढील बाजूस ५६ बाय १९ फुटाचे फॉयर असून त्याचप्रमाणे बाल्कनीतही त्या मापाचे फॉयर आहे. नाट्यगृहाचे स्टेज ६७ बाय २६ फुटाचे आहे. नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस उपहारगृह व ११५ बाय २५ फुटाचे ओपन टेरेस आहे. साऊंड, लाइट आदी सर्वप्रकारच्या आधुनिक सोयी तेथे करण्यात आलेल्या आहेत.
- यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टॅंक रोड, माटुंगा, मुंबई
- रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई (आता हे नाट्यगृह बंदिस्त झाले\बंद झाले!)
- रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन, मुंबई (आसनसंख्या ८११)
- रघुवीर, नागपूर
- रमणबाग, पुणे
- रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई;(आसनसंख्या ९११)
- रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, (पु.ल.देशपांडे कला अकादमी), प्रभादेवी, मुंबई (आसनसंख्या १९९)
- रवींद्र भवन, मडगाव, गोवा
- रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
- रसिक रंजन नाट्यगृह, दापोली (रत्नागिरी जिल्हा)
- राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा
- रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड (पुणे) (आसनसंख्या १२००)
- राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
- रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
- लक्ष्मी नारायण बाग हॉल, शिवाजी पार्क, मुंबई १६
- लक्ष्मीप्रसाद, कोल्हापूर (बंद झाले)
- लक्ष्मीविलास, जळगाव (आता बंद पडले असावे)
- लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
- वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
- वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
- वसंतराव पवार नाट्यगृह, बारामती
- वागळे हॉल, खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई
- क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल (आसनसंख्या ७००)
- विजय तेंडुलकर नाट्यगृह, सहकारनगर (पुणे) गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह
- विजयानंद, धुळे
- विजयानंद, नाशिक
- विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
- विष्णूदास भावे, वाशी, नवी मुंबई (आसनसंख्या ८००)
- वि़ष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली
- वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर, अमरावती
- शांतादुर्गा, कणकवली
- शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर (या नाट्यगृहाचे नाव 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह' असे ठेवण्याची मागणी फेटाळली गेली)
- शाहू नाट्य मंदिर, नंदुरबार
- शाहू महाराज नाट्यगृह, हडपसर (पुणे) (निर्माणाधीन)
- शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
- शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
- शिवाजी मंदिर, दादर, मुंबई; (आसनसंख्या १०३२)
- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, राजापूर (रत्नागिरी जिल्हा) (आसनसंख्या ४५०)
- छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन (सोलापूर)
- श्रीराम, अकोले(विदर्भ)
- षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
- सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृतिभवन, शंकरनगर-अकलूज (जिल्हा सोलापूर)
- संगीत नाट्यगृह, सोलापूर
- सदासुख नाट्यगृह, सांगली (बंद झाले)
- सर्वेश, डोंबिवली
- साई सभागृह , नागपूर
- साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले, मुंबई
- सायखेडकर, नाशिक
- सायंटिफिक हॉल, नागपूर
- सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
- सावित्रीबाई फुले, डोंबिवली
- साक्षी गॅलरी, लोअर परेल, मुंबई
- साहित्य संघ मंदिर, गिरगांव, मुंबई (आसनसंख्या ८००)
- सिडको नाट्यगृह, (नवीन नाव : संत तुकाराम नाट्यगृह), औरंगाबाद
- सुदर्शन रंगमंच, पुणे (प्रायोगिक नाटकांसाठी अहिल्यादेवी प्रशालेजवळचे छोटे नाट्यगह)
- सुरेश भट सभागृह , रेशीमबाग, नागपूर
- सुयोग सोसायटी, मुंबई
- सेन्ट अँड्ऱ्यूज कॉलेज सभागृह, वांद्रे (पश्चिम), मुंबई
- सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई (आसनसंख्या ८१८)
- स्नेहसदन, पुणे
- हनुमान तमाशा थिएटर, लालबाग (बंद झाले)
- हनुमान नाट्यगृह, म्हापसा, गोवा
- हॅपी कॉलनी हॉल, कोथरूड (पुणे)
- हॉर्निमन सर्कल गार्डन,मुंबई (खुले नाट्यगृह)
- हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव, मुंबई;(आसनसंख्या ६४१)
- हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
- हैदरी तमाशा थिएटर, जळगाव
- होमी भाभा सभागृह, नेव्हीनगर, मुंबई; (आसनसंख्या १०३०)
- ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृह, मोर्शी रोड, अमरावती
पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे
[संपादन]- आनंदोद्भव, पुणे
- आर्यभूषण तमाशा थिएटर, पुणे
- किर्लोस्कर, पुणे
- नटराज रंगमंदिर, पुणे
- पूर्णानंद, पुणे. येथे संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी झाला होता.
- बहुरूपी मंदिर, पुणे
- बाजीराव, पुणे
- भानुविलास (आता तेथे भानुविलास चित्रपटगृह आहे), पुणे
- महाराष्ट्रीय मंडळ, पुणे
- ललकार, पुणे
- लक्ष्मीविलास, पुणे
- किबे नाट्यगृह (नंतरचे लिमये नाट्यचित्रमंदिर, आता विजय टॉकीज), पुणे
- वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे
- सरस्वती मंदिर, पुणे
मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे
[संपादन]- ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
- एम्पायर
- एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
- कॉरोनेशन
- केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा (पश्चिम)
- कृष्ण थिएटर
- गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
- गेइटी
- ग्रॅन्ड
- डिलाइल रोड थिएटर
- ताज थिएटर
- दौलत थिएटर, बटाट्याच्या चाळीसमोर, पिला हाउस
- नायगाव थिएटर
- नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड
- न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड
- न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’)
- पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
- प्रिन्सेस
- बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
- बॉम्बे थिएटर, पिला हाउस
- बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
- भांगवाडी थिएटर, काळबादेवी
- रंगमंदिर, दादर (या जागेवर नंतर ’शारदा’ चित्रपटगृह झाले.)
- राणीच्या बागेतले खुले थिएटर
- रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
- रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
- लोकमान्य थिएटर
- वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
- व्हिक्टोरिया थिएटर, ग्रँट रोड
- शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
- सैतान चौकीजवळचे थिएटर
विदर्भातली बंद झालेली नाट्यगृहे
[संपादन]- धनवटे रंग मंदिर, नागपूर
- बोके इंद्रभुवन नाट्यगृह, अमरावती
अन्य गावांतील बंद झालेली नाट्यगृहे
[संपादन]- आनंदी निधान, गांधी मैदानाजवळ, अहमदनगर
- चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव
- दीनानाथ नाट्यगृह, सांगली
- पुरुषोत्तम स्मृती नाट्यगृह, रत्नागिरी
- बागडे थिएटर, चितळे रोड, अहमदनगर
- मेढे यांचे शनिवार नाट्यगृह, कोल्हापूर
- लक्ष्मीप्रसाद नाट्यगह, कोल्हापूर
- शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
- सदासुख, सांगली (हे नाट्यगृह १८८७मध्ये बांधले होते)
- हंसप्रभा, सांगली (हे नाट्यगृह १८९७मध्ये बांधले होते) त्या जागी आता (नवे) बालगंधर्व नाट्यगृह आहे.
- हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
प्रसिद्ध मराठी नाटककार
[संपादन]- शफ़ाअत खान
- प्रा. दत्ता भगत
- जयवंत दळवी
- दिलीप परदेशी
- पु.ल. देशपांडे
- प्रेमानंद गज्वी
- बशीर मोमीन (कवठेकर)
- महेश एलकुंचवार
- डॉ. रंजन दारव्हेकर
- रत्नाकर मतकरी
- वसंत कानेटकर
- विजय तेंडुलकर
- वि. वा. शिरवाडकर
- श्याम मनोहर
- सतीश आळेकर
नाटककार
[संपादन]नाटके लिहिणाऱ्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. प्रसिद्ध स्त्री नाटककारांची संख्या मात्र साठाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणाऱ्या काही लेखिका :
- अनसूया वाघ
- आनंदीबाई किर्लोस्कर
- इंदिराबाई पेंडसे
- इंदुमती देशमुख
- इरावती कर्णिक
- उमाबाई सहस्रबुद्धे
- कमलाबाई टिळक
- कविता नरवणे
- काशीबाई फडके
- कुसुम अभ्यंकर
- कृष्णाबाई मोटे
- गिरिजाबाई माधव केळकर
- चंद्राबाई शिंदे
- ज्योती म्हापसेकर
- ज्योत्स्ना देवधर
- ज्योत्स्ना भोळे
- द्वारका दत्तात्रेय गुप्ते
- नलिनी सुखटणकर
- नीलकांती पाटेकर
- पद्मा गोळे
- भागीरथीबाई वैद्य
- मधुगंधा कुलकर्णी
- मनस्विनी लता रवींद्र
- मनोरमाबाई लेले
- माई वरेरकर
- माधुरी पुरंदरे
- माया पंडित
- मालती तेंडुलकर
- मालती मराठे
- मालतीबाई दांडेकर
- मालतीबाई बेडेकर
- मुक्ताबाई दीक्षित
- योगिनी जोगळेकर
- रचेल गडकर
- लीला चिटणीस
- वनिता देसाई
- वसुंधरा पटवर्धन
- वसुधा पाटील
- विभावरी देशपांडे
- विमल काळे
- विमल घैसास
- शकुंतला परांजपे
- शिरीष पै
- सई परांजपे
- सरिता पदकी
- सुधा साठे
- सुधा करमरकर
- सुमतीबाई धनवटे
- सुषमा देशपांडे
- हिराबाई पेडणेकर
- क्षमाबाई राव
यांशिवाय काही नवोदित लेखिकाही आहेत.
भाषांतरित-रूपांतरित नाटके
[संपादन]- नोबेल पुरस्कारप्राप्त लुइजी पिरांदेल्ली (१८६७ ते १९३६) या इटालियन नाटककाराच्या ’सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ ऑथर’ या नाटकाचे माधव वाटवे यांनी केलेले ’नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ हे मराठी रूपांतर. २५ ऑगस्ट १९६७ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाने या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत सादर केला. ’टीपॉट’ नावाच्या एका नाटक कंपनीनेही हे नाटक २०१४साली रंगमंचावर सादर केले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]आक्षेप घेतलेली नाटके
[संपादन]सरकारने, विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्न केलेली काही नाटके :
- ’आग्ऱ्याहून सुटका’ आणि ’बेबंदशाही’ या नाटकांत शिवाजीला टाळ्या मिळत असल्याने नाटकांवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून नाटकाचे लेखक औंधकर यांनी शिवाजीपेक्षा औरंगजेबाचे महत्त्व वाढवून प्रयोग पुढे चालू ठेवले.
- एक चावट संध्याकाळ (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली)(बोरीवली नाट्यगृहाची बंदी)(मुंबई महापालिकेचीही बंदी)
- संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली. (नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे)
- कुलवधू नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती म्हणून वाद झाले होते.
- गणपतीबाप्पा मोरया (लेखक योगेश सोमण). याच नावाचे वेगळ्या लेखकाचे एक बालनाट्यही आहे, त्यावर आक्षेप नव्हता.
- गांधी विरुद्ध गांधी (लेखक अजित दळवी). गांधीच्या नावाचा तथाकथित दुरुपयोग. आक्षेप टिकला नाही.
- घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात नाना फडणिसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता.
- पती माझे छत्रपती (संजय पवार). छत्रपती या शब्दाने शिवाजीची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर, ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
- जय भीम, जय भारत या नाटकातल्या ’खैरलांजी’, कुत्रे’, ’रमाबाईनगर’ आदी शब्दांना परिनिरीक्षण मंडळाने हरकत घेतली आहे; या शब्दांऐवजी अनुक्रमे वैरांजली, श्वान, मीराबाईनगर असे शब्द वापरावेत अशी त्यांची सूचना आहे.
- बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
- संगीत भातुकलीचा खेळ (लेखक धोंडो रामचंद्र करमरकर ) या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
- मी नथुराम गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी). नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप. नाटकात शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका आहे. या नाटकाचे ८००हून अधिक प्रयोग झाले आहेत.
- यदाकदाचित (संजय पवार). नाटकात देवदेवतांचे विकृत चित्रण आहे हा आक्षेप होता. कुठल्या तरी गावात हिंदू जागरण मंचाने हे नाटक बंद पाडले होते.
- योनीमनीच्या गुजगोष्टी (बोरीवलीच्या नाट्यगृहाची बंदी) (ठाणे महापालिकेचीही बंदी). (कारण उघड आहे.)
- संगीत राष्ट्रोद्धार (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या संहितेच्या प्रती गुप्तपणे वाटल्या गेल्या.)
- वस्त्रहरण (लेखक गंगाराम गवाणकर). महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून.
- विजयतोरणा (या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.)
- शॅंपेन आणि मारुती (लेखक विवेक बेळे) या नाटकाचे नाव बदलून ’माकडाच्या हाती शॅंपेन’ असे करावे लागले. (१९ व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेले सर्वोत्कृष्ट नाटकाचे बक्षीस मिळालेले नाटक).
- शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (लेखक संभाजी (की राजकुमार?) तांगडे-भीमनगर शब्दाबद्दल नांदेड पोलिसांचा आक्षेप)- नाटकाचे परीक्षण {http://artnviews.com} वर वाचता येईल). नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
- सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
- स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
- हे राम नथुराम : (लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शरद पोंक्षे). या नाटकाविरुद्ध कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने करण्यात आली. (१९-१२-२०१६). संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनीनीही औरंगाबादमधील संत तुकाराम नाट्यगृहाबाहेर आणि आत हे राम नथुराम या नाटकाविरुद्ध उग्र निदर्शने केली (२१-१-२०१७). तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने या कार्यकर्त्यांना चोपून काढले. दंगल करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर नाटक पुन्हा सुरू झाले.
परिनिरीक्षण मंडळ
[संपादन]कोणत्याही नाटकाचा प्रयोग करावयाचा असेल तर त्या नाटकाच्या संहितेच्या दोन प्रती. महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाला सादर कराव्या लागतात. या सेन्सॉर बोर्डाचे दोन प्रतिनिधी ही संहिता वाचून त्याविषयीचा अभिप्राय बनवतात. मंडळाच्या अध्यक्षांची सही झाल्यावर एक प्रमाणपत्र आणि डीआरएम क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र किंवा हा क्रमांक नसेल तर नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर करता येत नाही.
मात्र, महाराष्ट्र नाट्य-परिनिरीक्षण मंडळाची स्थापना १९९०मध्ये झाली असल्याने,. जर नाटक इ.स. १९९० पूर्वीचे असेल तर त्याचे परिनिरीक्षण करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही. ते नाटक डीआरएम क्रमांकाशिवाय सादर करता येते.
मराठीतली काही बोल्ड नाटके
[संपादन]- ॲग्रेसिव्ह (लेखक निनाद शरद शेट्ये)
- अवध्य (लेखक चि.त्र्यं. खानोलकर)
- एक चावट मधुचंद्र (लेखक रमेश वारंग)
- एक चावट संध्याकाळ (लेखक अशोक पाटोळे)
- गुपीत योनींच्या गुप्त गोष्टी (लेखिका सोनिया चौधरी, दिग्दर्शक विक्रम पाटील)
- गेली एकवीस वर्षे (धर्मकीर्ती सुमंत)
- चावट शेजारी (लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी)
- त्या चार योनींची गोष्ट (मूळ कथा-Vagina, the Shadow of a Lady; मराठीलेखन दिग्दर्शन नितिनकुमार)
- दोन बायका चावट ऐका (लेखक सुदेश म्हशीलकर, संतोष कोचरेकर)
- नशिल्या मुलीची मदमस्त कहाणी (लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी)
- मात्र रात्र (मूळ इंग्रजी Bradley Hayward's romantic comedy, LEGITIMATE HOOEY; मराठी अनुवाद सागर देशमुख)
- म्युझिक सिस्टिम (दिग्दर्शक विजय केंकरे)
- नाटक नको (लेखक धर्मकीर्ती सुमंत)
- योनीमनीच्या गुजगोष्टी (मूळ इंग्रजी नाटक Vagina Monologues, लेखिका ईव्ह एन्स्लर, मराठी रूपांतर वंदना खरे)
- सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर)
पाचशेहून अधिक प्रयोग झालेली नाटके
[संपादन]नाटकाचे नाव | लेखक | शेवटच्या ज्ञात प्रयोगाची क्रमसंख्या | त्या प्रयोगाची तारीख |
---|---|---|---|
अवघा रंग एकचि झाला | डॉ.मीना नेरूरकर | >३०० | २०१३ |
अश्या बायका तश्या बायका | मधुसूदन घाणेकर | ५०० | मार्च २०१३ |
आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका भक्ती बर्वे) | अशोक पाटोळे | ७५० | ॑॑॑॑॑ |
आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका स्मिता जयकर) | अशोक पाटोळे | ११२ | १३-९-२०१४ |
इथे ओशाळला मृत्यू | वसंत कानेटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
एका लग्नाची गोष्ट | श्रीरंग गोडबोले | १५०६ | ३०-१-२००५ |
संगीत एकच प्याला | राम गणेश गडकरी | ****** | ॑॑॑॑॑ |
कचऱ्या हिंदुस्थानी (एकपात्री) | रमेश थोरात | ७६९ | १२-१०-२०११ |
कट्यार काळजात घुसली | पुरुषोत्तम दारव्हेकर | ****** | ॑॑॑॑॑ |
कथा अकलेच्या कांद्याची | शंकर पाटील | ****** | ॑॑॑॑॑ |
करायला गेलो एक | बाबूराव गोखले | ****** | ॑॑॑॑॑ |
कुलवधू | मो.ग. रांगणेकर | >२००० | ॑॑॑॑॑ |
कुटुंब रंगलंय काव्यात (एकपात्री नाट्यानुभव) | विश्वनाथ श्रीधर तथा विसुभाऊ बापट | २२५० | १७-७-२०११ |
कुर्यात् सदा टिंगलम् | शिवराज गोर्ले | >१२०० | ऑक्टोबर २०११ |
खळखळाट (एकपात्री) | बंडा जोशी | १०० | २२ एप्रिल २०१४ |
गारंबीचा बापू | श्री.ना. पेंडसे | ****** | ॑॑॑॑॑ |
गुंतता हृदय हे | शं.ना. नवरे | ****** | ॑॑॑॑॑ |
गेला माधव कुणीकडे | वसंत सबनीस | १७५० | २३-३-२०१३ |
गोकुळचा चोर | नानासाहेब शिरगोपीकर | ****** | ॑॑॑॑॑ |
गोलमाल | शिवराज गोर्ले | १०० | २-३-२०१३ |
घाशीराम कोतवाल | विजय तेंडुलकर | १८५० | १८-१-२०१२ |
घोटभर पाणी (एकांकिका) | प्रेमानंद गज्वी | ३००१ | २६-५-२०१२ |
चार दिवस प्रेमाचे | रत्नाकर मतकरी | १०२६ | ? |
जाणता राजा | बाबासाहेब पुरंदरे | १२५१ | २७-२-२०१३ |
जांभूळ आख्यान | विठ्ठल उमप | >७०० | २६-११-२०१२ |
ज्याचा त्याचा प्रश्न | अभिराम भडकमकर | >४५० | ? |
झोपी गेलेला जागा झाला | बबन प्रभू | ****** | ॑॑॑॑॑ |
टुरटूर | पुरुषोत्तम बेर्डे | ५४३ | ? |
तरुण तुर्क म्हातारे अर्क | मधुकर तोरडमल | ****** | ॑॑॑॑॑ |
तुझे आहे तुजपाशी | पु.ल.देशपांडे | ****** | ॑॑॑॑॑ |
तो मी नव्हेच | आचार्य प्र.के.अत्रे | >३००० | १४-३-२०१२ |
दिनूच्या सासूबाई राधाबाई | बबन प्रभू | ****** | ॑॑॑॑॑ |
दिलखुलास (एकपात्री) | स्वाती सुरंगळीकर | २५० | २५-५-२०१३ |
दुरिताचे तिमिर जावो | बाळ कोल्हटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
नटसम्राट | वि.वा.शिरवाडकर | ११५ | १९-८-२०१५ |
पंडितराज जगन्नाथ | विद्याधर गोखले | ****** | ॑॑॑॑॑ |
प्रेमा तुझा रंग कसा? | वसंत कानेटकर | ****** | ॑॑॑॑॑ |
ब्रम्हचारी | आचार्य अत्रे | ५०३ | १९८६ |
संगीत भावबंधन | राम गणेश गडकरी | ****** | ॑॑॑॑॑ |
मराठी पाऊल पडते पुढे (मराठमोळ्या गीत-नृत्यांचा कार्यक्रम) | उदय साटम (दिग्दर्शक) | २७०० | ९-१०-२०१२ |
संगीत मानापमान | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | ****** | ॑॑॑॑॑ |
मिस्टर अँड मिसेस | अस्लम परवेझ व निलेश रूपापारा | १११ | २४-८-२०१४ |
मी जोतीराव फुले बोलतोय | ... ? ... | ६८० (?) | २७-६-२०१२ |
मी नथूराम गोडसे बोलतोय | प्रदीप दळवी | ८१७ | जानेवारी २०१६ |
मोरूची मावशी | आचार्य प्र.के.अत्रे | १३३० | १९८५ |
यदा कदाचित | संतोष पवार | ३६०० | इ.स. २००० |
रमाई | प्रभाकर दुपारे | ५०१ | २१-४-२०११ |
रायगडाला जेव्हां जाग येते | वसंत कानेटकर | २५२० | २९-३-२०१५ |
लग्नाची बेडी | आचार्य प्र.के.अत्रे | >५००० | ॑॑॑॑॑ |
लावणी भुलली अभंगाला | जगदीश दळवी | >२००० | ॑॑॑॑॑ |
लोच्या झाला रे | केदार शिंदे | >१००० | या नाटकावरून चित्रपट बनला. |
वऱ्हाड निघालंय लंडनला | लक्ष्मण देशपांडे | >>२००० | ॑॑॑॑॑ |
वस्त्रहरण | गंगाराम गव्हाणकर | ५००० | २१-११-२००९ |
वाटेवरती काचा गं (बाहुली नाट्य) | डाॅ.अनिल बांदिवडेकर | >५०० | ॑॑॑॑॑ |
वाहतो दुर्वांची ही जुडी | बाळ कोल्हटकर | >१००० | ..?.. |
विच्छा माझी पुरी करा | वसंत सबनीस | ****** | ॑॑॑॑॑ |
व्यक्ती आणि वल्ली | पु.ल. देशपांडे | >४५२ | २०१३ |
शंभूराजे | सुरेश चिखले | ३३३ | २१-३-२०१३ |
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला | राजकुमार तांगडे | २२४ | २७-७-२०१३ |
श्रीमंत दामोदरपंत | केदार शिंदे | ३५० | ३५० प्रयोगानंतर नाटकाची सीडी बनली आणि नंतर सिनेमा |
संगीत शाकुंतल | अण्णासाहेब किर्लोस्कर | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत शारदा | गोविंद बल्लाळ देवल | ****** | ॑॑॑॑॑ |
सबकुछ मधुसूदन (इ.स. १९६३पासून सुरू असलेला एकपात्री मनोरंजक कार्यक्रम) | डॉ.मधुसूदन घाणेकर|२०००० | मार्च २०१३ | |
संगीत संशयकल्लोळ | गोविंद बल्लाळ देवल | ****** | ॑॑॑॑॑ |
सही रे सही | केदार शिंदे | >१००० | ॑॑॑॑॑ |
सासूबाईंचं असंच असतं | आचार्य प्र.के.अत्रे | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत सौभद्र | अण्णासाहेब किर्लोस्कर | ****** | ॑॑॑॑॑ |
संगीत स्वयंवर | कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | ****** | ॑॑॑॑॑ |
हसवाफसवी | ;;दिलीप प्रभावळकर]]केदार शिंदे | ७५० | ७५०नंतर प्रयोग थांबवले. |
दुहेरी तिहेरी भूमिका
[संपादन]एकाच नाटकात किंवा एकाच एकपात्रीत अभिनेते एकाहून अधिक भूमिका करत आले आहेत, अशी काही नाटके, व त्यांतील अभिनेत्याचे नाव :
- गंमत जंमत (विविध भूमिका, अरुण नलावडे)
- गंमत जंमत (विविध भूमिका, रसिका ओक)
- गंमत जंमत (विविध भूमिका, सोनाली चेऊलकर)
- चूक भूल द्यावी घ्यावी (तीन भूमिका, राजाभाऊंच्या सासूबाई/राजाभाऊंची मैत्रीण/दाक्षिणात्य शेजारीण, निर्मिती सावंत)
- जस्ट हलकं फुलकं (सहा भूमिका, सागर कारंडे)
- जेव्हा यमाला डुलकी लागते (दोन भूमिका, सुधा करमरकर)
- तो मी नव्हेच
- थरार (२, सतीश पुळेकर)
- बहुरूपी सदा इंगवले (२, प्रशांत दामले)
- बहुरूपी प्रशांत दामले (२, प्रशांत दामले)
- बे दुणे पाच (पाच भूमिका, प्रशांत दामले)
- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (२, हिटलर/हिटलरचा तोतया, पुरुष कलाकार)
- रणांगण (२ किंवा ३, स्त्री कलाकार)
- रथचक्र (दोन, रोहिणी हट्टंगडी)
- व्हॉटस युअर राशी? (हिंदी चित्रपट. १२ भूमिका, प्रियांका चोप्रा)
- शंभु माझा नवसाचा (मराठी चित्रपट, १२ भूमिका, राजेश शृंगारपुरे)
- सही रे सही (तीन, भरत जाधव)
- हलकं फुलकं (विविध भूमिका, रसिका ओक)
- हलकं फुलकं (विविध भूमिका, विजय कदम)
- हसवाफसवी (सहा भूमिका - चिमणराव जोग/प्रिन्स वांटुंग पिन पिन/ नाना पुंजे/
पटेल/ लुमुम्बा/बॉबी मॉड/कृष्णराव हेरंबकर, दिलीप प्रभावळकर)
नाटक या विषयावरील मराठी पुस्तके
[संपादन]- नाट्य निर्मिती (ले.यशवंत केळकर,परिमल प्रकाशन औरगाबाद)
- अॅबसर्ड थिएटर (माणिक कानेड)
- अस्ताई (केशवराव भोळे)
- आताची नाटके (राजीव नाईक)
- Indian English Drama (इंग्रजी, ॲटलांटिक पब्लिशर्स)
- इब्सेन : व्यक्ती व नाटक (अनिरुद्ध कुलकर्णी)
- एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप (डॉ. मधुरा कोरान्ने)
- एका खेळियाने (दिलीप प्रभावळकर) : किमान पाच आवृत्या; प्रभावळकरांच्या भूमिकांवरील लेखसंग्रह.
- ऐतिहासिक मराठी नाटक (भीमराव कुळकर्णी)
- कथा दोन सोंगाड्यांची (सोपान हरिभाऊ खुडे) : गायक दत्ता महाडिक आणि तमासगीर गुलाबराव बोरगावकर यांचे चरित्र)
- कथारूप शेक्सपिअर (अनेक खंड, प्रभाकर देशपांडे साखरेकर)
- कलावंतांच्या सहवासात (वसंत शांताराम देसाई)
- कलेचे कटाक्ष (वसंत शांताराम देसाई)
- कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीची (श्रीराम रानडे)
- किर्लोस्कर आणि देवल (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई))
- कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी (वसंत शांताराम देसाई)
- खाडिलकरांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
- खानोलकरांची नाट्यसृष्टी (डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस)
- खानोलकरांचे नाटक (डॉ. माधवी वैद्य)
- गडकऱ्यांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
- चौकट दिग्दर्शनाची (कुमार सोहोनी)
- 'द थिएटर ऑफ द ॲबसर्ड (डाॅ. सतीश पावडे). या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा २०१८ सालचा ना.गो. नांदापूरकर पुरस्कार मिळाला आहे.
- दलित रंगभूमी आणि नाटक (बबन भाग्यवंत)
- दलित रंगभूमी आणि नाट्यचळवळ (डॉ. मधुकर मोकाशी)
- दळवींची नाटके : एक अंतर्वेध (डॉ. स्वाती कर्वे)
- दहाव्या रांगेतून (वसुंधरा काळे)
- नट, नाटक आणि आपण (त्र्यं.वि. सरदेशमुख)
- नट, नाटक आणि नाटककार (वसंत शांताराम देसाई)
- नाटक : उमल आणि उमज (संपादक डाॅ. मुकुंद करंबेळकर)
- नाटककाराची कला (अनुवादित, मूळ लेखक - जे.बी. प्रीस्टले; मराठी अनुवाद - व.ह. गोळे)
- नाटकवाल्याचे प्रयोग (अतुल पेठे)
- नाट्यकोश (वि.भा. देशपांडे)
- नाट्यलेखन (एक क्ष-किरण): लेखक - श्रीनिवास भणगे
- नाट्याक्षरे (मधुरा कोरान्ने),
- पडद्यामागील किस्से (अरुण धाडीगावकर) :रंगमंचाच्या मागे घडलेले कलावंतांचे आणि नाटककारांचे काही भन्नाट किस्से.
- बातचीत महेश एलकुंचवारांशी (आशिष राजाध्यक्ष, समीक बंडोपाध्याय, संजय आर्वीकर)
- बालगंधर्व : व्यक्ती आणि कला (वसंत शांताराम देसाई)
- ‘बेगम बर्वे' विषयी (रेखा इनामदार साने)
- बोलता...बोलता... (नाट्यविषयक मुलाखती, मधुरा कोरान्ने)
- भरतमुनींचे नाट्यशास्त्र (सरोज देशपांडे)
- भारतीय नाट्यप्रयोगविज्ञान (प्रा. अ.म. जोशी)
- भारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार (अमला शेखर, सरोज देशपांडे, शुभांगी बहुलीकर)
- भारतीय रंगभूमीची परंपरा (डॉ. माया सरदेसाई)
- मखमलीचा पडदा (वसंत शांताराम देसाई)
- मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा (मधुरा कोरान्ने)
- मराठी नाटक आणि रंगभूमी - विसावे शतक (वसंत आबाजी डहाके)
- मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल (श्रीपाद लाटकर)
- महानगरी नाटके (२००० ते २०१०) - नाट्यपरीक्षणे, लेखक - कमलाकर नाडकर्णी
- महाराष्ट्राची लोकनृत्य नाट्यधारा (हिरामण लांजे रमानंद)
- रंगदर्शन (हिंदी नाट्यसमीक्षा, नेमिचन्द्र जैन)
- रंगदर्शन (मौज प्रकाशन) या पुस्तकात काकासाहेब खाडिलकर ते जयंत पवार यांच्यापर्यंतच्या सात नाटकांच्या समीक्षासहित समाजातल्या प्रतिक्रियांची नोंद घेतली आहे.
- रंगदेवतेचे आंग्लरूप : मुंबईतील अ-मराठी रंगभूमी (हिंदी-इंग्रजी नाटकांचा परीक्षणसंग्रह, लेखक - अविनाश कोल्हे)
- रागरंग (वसंत शांताराम देसाई)
- रिंगणनाट्य (सहलेखक राजू इनामदार)
- ललितकलेच्या सहवासा-त (‘ललितकलादर्श नाटक मंडळी’मधील आठवणी, पु.श्री. काळे)
- विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
- विस्मरणात गेलेली नाटके (डॉ. अरविंद वामन कुलकर्णी) (शोधमूलक, विश्लेषणात्मक आणि चिकित्सक नाट्यसमीक्षा असणारा ग्रंथ. या ग्रंथात महात्मा फुले यांच्या ‘तृतीय नेत्र’ (१८५५) नाटकापासून पु. भा. डोंगरे यांच्या ‘संगीत चंद्रहास’(१९०३) नाटकापर्यंतच्या क्रमाने बारा महत्त्वाच्या नाटकांवर विस्तृत असे शोधसमीक्षालेख समाविष्ट आहेत. पद्मगंधा प्रकाशन)
- संगीताने गाजलेली रंगभूमी (न.वि ऊर्फ बाबुराव जोशी)
- संस्कृत नाट्यसृष्टी (गो.के. भट)
- सहा शोकनाट्ये : कमला, राजा इडिपस, एकच प्याला, वेड्याचं घर उन्हात, संध्याछाया, सवाई माधवरावाचा मृत्यू ह्या नाटकांच्या पार्श्वभूमीवर एकूण शोकांतिकांचेच विश्लेषण (शशिकांत लोखंडे)
- स्त्री नाटककारांची नाटके (स्नेहवर्धन प्रकाशन, मधुरा कोरान्ने)
- स्त्री समस्या आणि आजचे नाटक (स्नेहवर्धन प्रकाशन, मधुरा कोरान्ने)
- ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्म-दर्शने (प्रा. मधु पाटील)
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे बशीर मोमीन कवठेकर", ‘सांज महानगरी-मुंबई आवृत्ती', दि. २२ जानेवारी २०१९
- ^ बशीर मोमीन – कवठेकरः कोंबड्या विकण्यापासून जीवनगौरव पुरस्कारापर्यंत Archived 2023-03-15 at the Wayback Machine. "कोलाज- फिचर वेबसाईट", Published on 16-Jan-2019
- ^ आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव- लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना Archived 2020-11-08 at the Wayback Machine. "दै.सामना”, 1-March-2019
- ^ अवलिया लोकसाहित्यिक "दै.सकाळ”, पुणे, 20-Nov-2021
- [१] Archived 2013-03-01 at the Wayback Machine. My Theatre -सुनील चांदूरकर यांचे संकेतस्थळ)
- [२] Archived 2013-10-09 at the Wayback Machine. (Pune Theatre -पुणे थिएटर गाईड)
- [३] Archived 2013-03-25 at the Wayback Machine. (Art n views -प्रदीप वैद्य यांचे संकेतस्थळ)