गंगाराम गवाणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गंगाराम गवाणकर हे एक मराठी-मालवणी लेखक आहेत.

त्यांनी आपले मुंबईतील सुरुवातीचे दिवस स्मशानात काढले, असे त्यांनी त्यांच्या व्हाया वस्त्रहरण या पुस्तकात लिहिले आहे. गंगाराम गवाणकर यांनी १९९८ साली प्रदर्शित झालेल्या जागर या मराठी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत.

वस्त्रहरण[संपादन]

वस्त्रहरण हे गंगाराम गवाणकर यांचे मालवणी भाषेत लिहिलेले नाटक आहे. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवात वस्त्रहरणचा प्रयोग झाला होता. मच्छिंद्र कांबळी यांनी या नाटकात काम केले होते.

या नाटकात महाभारताची टिंगल केली आहे असा आक्षेप घेऊन हे नाटक बंद पाडायचे प्रयत्‍न झाले होते. पु.ल. देशपांडे यांनी उचलून धरल्यामुळे हे नाटक चालू राहिले. या नाटकाचे ५४००हून अधिक प्रयोग झाले आहेत.

नाटके[संपादन]

  • दोघी
  • वनरूम किचन (एक हजारावर प्रयोग)
  • वरपरीक्षा
  • वर भेटू नका
  • वस्त्रहरण (मालवणी भाषेत, ५४००हून अधिक प्रयोग)
  • उषःकाल होता होता (कुटुंबसंस्था आणि मुलांवर होणारे दूरगामी परिणाम)

पुस्तके[संपादन]

  • ऐसपैस (कादंबरी)
  • चित्रांगदा (लेखसंघ्रह, अनुवादित, मूळ लेखक - रवींद्रनाथ टागोर)
  • व्हाया वस्त्रहरण (आत्मकथन)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • ’झी मराठी’ या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कार
  • ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद