मूकनाट्य
Jump to navigation
Jump to search
मूकनाट्य म्हणजे कुठलाही संवाद नसलेले नाटक होय. या प्रकारच्या नाटकामध्ये संगीत, प्रकाशयोजना वापरले असते मात्र कोणत्याही प्रकारचे लिखित किंवा आवाजाच्या स्वरुपातले शब्द वापरता येत नाहीत. संपूर्ण हावभाव करूनच नाटक सादर करतात.
चार्ली चॅप्लीन, कमल हसन, गुफी पेंटल व इतर कलावंतांनी चित्रपटांच्या माध्यमातून मूक अभिनया केला.
इ.स. २०१४ सालापसून पुण्यातील भरत नाट्य मंदिरात ‘ड्रीम्स डू रिॲलिटी’, ‘वाईड विंग्ज मीडिया’, ‘फेरीटेल मीडिया स्तुडिओ’ आणि ‘रंगीत तालीम’ यांच्यातर्फे मौनांतर मूकनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. २०१७ साली झालेल्या स्पर्धेत एम्आय्टीच्या ‘वॉर ॲन्ड पीस’ या नाट्याला पहिला क्रमांक मिळाला. त्यावेळी स्पर्धेम्ध्ये पुण्यातील १४ तर मुंबईतील ३ संघ उतरले होते.
मराठी कलावंतांची प्रसिद्ध मूकनाट्य[संपादन]
- बाकी शून्य
- रूपवेध प्रतिष्ठानच्या वतीने ९ डिसेंबर २०१६ रोजी तन्वीर स्मृतिदिनानिमित्त सादर केलेले विशेष मुलांचे ‘भरारी’ हे मूकनाट्य
- वॉर ॲन्ड पीस
- सो व्हॉट
जागतिक दिन[संपादन]
२२ मार्च हा दिवस जागतिक मूकनाट्य दिन म्हणून पाळला जातो.