Jump to content

भाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संस्कृत भाषेतल्या दहा नाट्यप्रकारांपैकी भाण हा एक प्रकार आहे. ही एकांकी नाट्यरचना असून ती एकच पात्र सादर करीत असे. हे पात्र म्हणजे धूर्त किंवा विट. हा एक तर स्वतःचे अनुभव कथन करी किंवा इतरांच्या अनुभवांचे वर्णन करी. एकाचेच भाष्य असलेल्या ह्या नाट्यप्रकारात बोलण्यावर भर असून त्यात एकाच पात्राच्या उक्ति-प्रयुक्तींच्या रूपाने नाट्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयाचे असे.

मिश्रभाण हा भाणाचाच एक उपप्रकार आहे.

भाण या नाट्यप्रकारात वीररस आणि शृगाररस यांना प्राधान्य असे, हे खाली दिलेल्या भाणांच्या नावांवरून सहज समजून यावे.

  • अनंगब्रह्मविद्याविलास भाण (लेखक वरदार्य)
  • अनंग(सं)जीवन भाण (लेखक वरदाचार्य)
  • अनंगविजय भाण (लेेखक जगन्‍नाथ पंडितकवी)
  • अनंगसर्वस्व भाण (लेखक लक्ष्मीनरसिंह)
  • आनंदतिलक भाण
  • कंदर्पदर्पण भाण-१ (लेखक व्यंकटकवी)
  • कंदर्पदर्पण भाण-२ (लेखक श्रीकंठ)
  • कंदर्पविजय भाण (लेखक धनगुरुवर्य)
  • कामविलास भाण (लेखका व्यंकप्पा)
  • कुसुमबाणविलास भाण (लेखक लीलामधुकर)
  • केरलाभरण भाण (लेखक रामचंद्र दीक्षित)
  • गोपलीलार्णव भाण (लेखक भट्टरंगाचार्यपुत्र गोविंद)
  • चंद्ररेखाविलास भाण
  • पंचबाणविजय भाण (लेखक वाधूलगोत्रोत्पन्न रंगाचार्य)
  • पंचबाणविलास भाण
  • पंचायुधप्रपंचभाण (लेखक त्रिविक्रम पंडित)
  • मदनगोपालविलास भाण (लेखक गुरूराम कवी)
  • मदनभूषण भाण
  • मदनमहोत्सव भाण (लेखक श्रीकंठ ऊर्फ नंजुंद)
  • मदनसंजीवन भाण (लेखक घनश्याम)
  • माधवभूषण भाण (लेखक रंगेनाथ महादेशिक)
  • मालमंगल भाण उर्फ महिषमंगल भाण (लेखक पुरुवनम् महिषमंगलकवी)
  • रसविलास भाण (लेखक चोक्कनाथ)
  • रसिकरंजनभाण (लेखका श्रीनिवासाचार्य)
  • रसिकजन रसोल्लास भाण (लेखक वेदांतदेशिक पुत्र व्यंकट)
  • रससदन भाण
  • रसिकामृत भाण- (लेखक शंकरनारायण)
  • रसोल्लासभाण (लेखक श्रीनिवास वेदान्ताचार्य)
  • वसंततिलक भाण (लेखक अम्मलाचार्य)
  • शारदातिलक भाण (लेखक शंकर)
  • शारदानंदन भाण (लेखक वरदाचार्यपुत्र श्रीनिवास)
  • शृंगारकोश भाण-१ (लेखक अभिनव कालिदास काश्यप)
  • शृंगारकोश भाण-२ (लेखक गीर्वाणेंद्र याचे पिता नीलकंठ दीक्षित)
  • शृंगारचंद्रिका भाण
  • शृंगारजीवन भाण
  • शृंगारतरंगिणी भाण-१ (लेखक रामभद्र)
  • शृंगारतरंगिणी भाण-२ (लेखक सरपूरचा व्यंकटाचार्य)
  • शृंगारतिलक भाण
  • शृंगारदीपक भाण (लेखक विंजीमूर राघवाचार्य)
  • शृंगारपावन भाण (लेखका कृष्णकविपुत्र वैद्यनाथ)
  • शृंगारमंजर ीभाण- अथवा श्रीरंगराज भाण (लेखक जक्कुल व्यंकटेंद्र आणि वीरनाम्बा यांचा पुत्र गोपालराय)
  • शृंगारराजतिलक भाण (लेखका वंदवासी रामपुत्र अविनाशीश्वर)
  • शृंगार शृंगातक भाण (लेखका श्री रंगनाथ)
  • शृंगारसर्वस्व भाण-१ (लेखक आनन्दराघव नाटकाचा कर्ता राजचूडामणि दीक्षित)
  • शृंगारसर्वस्व भाण-२ (लेखक स्वामिमिश्र अथवा स्वामिशास्त्री)
  • शृंगारसुधाकर भाण (लेखक रुक्मिणीपरिणय नाटकाचा कर्ता रामवर्मा युवराज)
  • शृंगारसुधार्णव भाण (लेखक रामचंद्र कोराड)
  • शृंगारस्तबक भाण (लेखका मदुरेचा रहिवाशी नृसिंह)
  • संपतकुमारविलास भाण अथवा माधवभूषण भाण (लेखक रंगेनाथ महादेशिक)
  • सरसकविकुलानंद भाण (लेखक रामचंद्र)
इत्यादी.


.