मनस्विनी लता रवींद्र
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मनस्विनी लता रवींद्र या मराठीतल्या नाटककार, अभिनेत्री, दिग्दर्शक आहेत. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून नाट्यशिक्षण घेतल्यावर त्या मूबईला आल्या. दूरचित्रवाणीवरील ’एका लग्नाची दुसरी गोष्ट‘ या मालिकेचे संवादलेखन मनस्विनी लता रवींद्र यांचे होते. तसेच 'दिल दोस्ती दुनियादारी' ह्या मालिकेसाठी त्यांनी पटकथा-संवाद लेखन केले. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा-माधव' चित्रपट त्यांनीच लिहिला आहे. त्यांनी लिहिलेल्या 'ब्लॉगच्या आरश्यापल्याड' ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
नाटके/ललित लेखसंग्रह
[संपादन]- अमर फोटो स्टुडिओ
- अलविदा
- एकमेकांत
- ब्लॉगच्या आरश्यापल्याड (ललित)
- माझ्या वाटणीचं खरंखुरं
- लखलख चंदेरी
- सिगारेट्स
- डावीकडून चौथी बिल्डींग
दिग्दर्शित नाटके
[संपादन]- बेबी
- मिटली पापणी
- एकमेकात
- लख लख चंदेरी
- कुकूच कू
- बाय द वे मीट वेरा स्टार्क
पटकथा/संवाद लेखन
[संपादन]मनस्विनी लता रवींद्र यांनी पुढील दूरदर्शन मालिकांचे पटकथा/संवाद लेखन केले आहे -
- एका लग्नाची दुसरी गोष्ट
- दिल दोस्ती दुनियादारी
- ती फुलराणी
- बन मस्का
- लेक लाडकी या घरची
- ठिपक्यांची रांगोळी
- मोरांबा
चित्रपट पटकथालेखन
[संपादन]- रमा-माधव
- कच्चा निंबू
- ती सध्या काय करतेय
सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- लंडनच्या राॅयल कोर्ट थिएटरने नाटकांसंबंधीच्या एका कार्यशाळेसाठी सन्मानाने आमंत्रित
- संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कार (२००७)