बारामती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?बारामती
महाराष्ट्र • भारत
—  शहर  —

१८° ०९′ ००″ N, ७४° ३४′ ४८″ E

गुणक: 18°09′N 74°35′E / 18.15°N 74.58°E / 18.15; 74.58
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५३८ मी
जिल्हा पुणे
तालुका/के बारामती
लोकसंख्या ५१,३४२ (२००१)
नगराध्यक्ष
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१३१०२
• +०२११२
• एम. एच. ४२
संकेतस्थळ: baramati.net

गुणक: 18°09′N 74°35′E / 18.15°N 74.58°E / 18.15; 74.58

बारामती हे महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. इतिहासात हे नगर "भीमथडी" या नावाने प्रसिद्ध होते.[ संदर्भ हवा ] कृषी हा बारामतीच्या लोकांचा मुख्य व्यवसाय असून ऊस, द्राक्षे व गहू ही येथील व्यापारी महत्त्वाची पिके आहेत. येथून मध्यपूर्वेत व युरोपात द्राक्षे व साखर निर्यात केली जाते.

इतिहास[संपादन]

बारामती शहर कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

शरद पवारची जन्मभूमी आहे

भूगोल[संपादन]

बारामती तालुका दुष्काळी प्रदेश आहे. येथे पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु निरा डाव्या कालव्यामुळे बारामतीचा काही प्रदेश सिंचनाखाली आल्यामुळे तेथील शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. बारामती शहराला पिण्याचे पाणी याच कालव्यामधून शुद्ध करून दिले जाते. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथील उन्हाळाही कडक असतो. हिवाळ्यामध्ये येथील वातावरण छान असते.

अर्थव्यवस्था[संपादन]

निरा डाव्या कालाव्याच्या सिंचनामुळे बारामती तालुक्यातील पूर्वेकडील भागाने शेती उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. येथे मुख्यत्वे ऊस, गहू, मका इ. चे उत्पन्न घेतले जाते. काही ठिकाणी फळबागही आहेत. येथे पारंपारिक आणि आधुनिक या दोन्हीही प्रकारची शेती केली जाते. येथे ऊस पिकाचे भरघोस उत्पादन होत असून उसापासून साखर तयार करणारे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा भवानीनगर (इंदापूर) येथे स्थित असून बारामती आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यातील उसाचे गाळप या कारखान्यात केले जाते. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा माळेगाव येथे स्थित असून येथे साखरेबरोबर इथेनॉल निर्मितीही केली जाते. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर येथे स्थित आहे. या साखर कारखान्यांमुळे सभासद शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. हे साखर कारखाने येथील अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्याचबरोबर येथे भाजीपाला, फळे इ. चेही उत्पादन घेतले जाते. येथील भाजीपाला पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत पाठविला जातो.

बारामतीचा पश्चिमेकडील भाग कमी पाऊस व सिंचनाच्या सोयीअभावी कोरडवाहू आहे. येथे फक्त पावसाळ्यात ज्वारी व बाजरीचे उत्पादन घेतले जाते. या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माद्यमातून वाहन उद्योग, कापड उद्योग इ. चे कारखाने उभारण्यात आले आहेत. त्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

प्रवास[संपादन]

बारामती मध्ये दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. बारामती महाराष्ट्रातील इतर तालुके व जिल्हे यांना पक्क्या आणि रुंद रस्त्यांनी जोडलेली आहे. बारामती रेल्वेमार्गाने दौंड रेल्वे जंक्शनला जोडलेली आहे. दौंड रेल्वे जंक्शन उत्तर भारत व दक्षिण भारतातील मुख्य शहरांना रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. सध्या बारामती ते दौंड रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. बारामती मध्ये विमानतळ आहे. त्यामुळे बारामती देशातील मुख्य शहरांना हवाईमार्गाने जोडली जाऊ शकते.

शिक्षण[संपादन]

बारामती मध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्यानगरी(विद्या प्रतिष्ठान) तसॆच माळॆगाव यॆथील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शारदाबाई पवार कन्या महाविद्यालय ही महाविद्यालये आहेत. विविध जिल्ह्यातील तसेच परराज्यातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यावयास यॆतात. शिक्षणाच्या बाबतीत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, आरोग्य, संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान, कायदा, मनुष्यबळ विकास, कृषी, शास्त्र, वित्तसहाय्य, ॲनिमेशन , कला, वाणिज्य, डिझायनिंग, पाकशास्त्र, मानव्यशास्त्र, मुक्‍त शिक्षण अभ्यासक्रम यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा सरकारी, खासगी, एनजीओ यांच्याद्वारे उपलब्ध आहेत.