आनंदी निधान
Appearance
आनंदी निधान महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर शहरातील गांधी मैदानाजवळ असलेले, सर्वात जुने नाट्यगृह होते. नगरमध्ये झालेले पहिले नाटक याच नाट्यगृहात झाले होते. त्या नाट्यगृहाचे रूपांतर पुढे चित्रा नावाच्या चित्रपटगृहात झाले. प्रारंभी तेथे काही मूक चित्रपट लागले व पुढे बोलके चित्रपट लागू लागले.