Jump to content

प्रतिष्ठाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रतिष्ठान म्हणजे स्थापन झालेली संस्था. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची प्रतिष्ठान नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था[उदाहरणार्थ १] शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, कारखाना, वाद्यवृंद किंवा फेसबुकवरील वा ब्लॉगस्पॉटवरील संकेतस्थळसुद्धा असू शकते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी स्थापन केलेले इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान हे बहुधा महाराष्ट्रातले प्रसिद्धीत आलेले पहिले प्रतिष्ठान असावे.

महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने

[संपादन]


उदाहरणे

[संपादन]
  1. ^ १) दुकान-उदाहरणार्थ: " सूर्य प्रतिष्ठान या संस्थेची मुंबई शहरात मशीद बंदर, धोबी तलाव, सातरस्ता आदी ठिकाणी खाऊच्या गोळ्या, बिस्किटे, चॉकलेटे, चिवडे, शीत पेये वगैरे वस्तूंची विक्री करणारी दुकाने आहेत.
    २) व्यावसायिक आस्थापना उदाहरणार्थ:अभिजित प्रतिष्ठान ही मुलुंड(पूर्व), मुंबई येथे असलेली एक व्यावसायिक आस्थापना आहे. जन्मपत्रिका तयार करून देणे, कुंडलीवरून भविष्य सांगणे, हस्तसामुद्रिक, वधुवरांच्या पत्रिका पाहून गुणमेलन करणे, जन्मतिथी आणि नक्षत्र-राशीवरून लाभदायक खडे ठरवणे आणि अंगठीसाठी त्यांची विकी करणे, रुद्राक्षांची विक्री, आणि गळ्यात घालण्यासाठी व जपासाठी रुद्राक्षमाळा विकणे हे काम हे प्रतिष्ठान करते.

संदर्भ

[संपादन]