द.ज. सरदेशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
द.ज. सरदेशपांडे
गुरुवर्य दत्तात्रय जगन्नाथ तथा दादासाहेब सरदेशपांडे.jpg
जन्म दत्तात्रय जगन्नाथ सरदेशपांडे
निवासस्थान राजापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे दादासाहेब
नागरिकत्व भारतीय
पेशा शिक्षक
प्रसिद्ध कामे राजापूर या गावात राजापूर हायस्कूलची स्थापना आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे एक संस्थापक
मूळ गाव कोंडगाव, साखरपा (रत्‍नागिरी जिल्हा)
पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार

गुरुवर्य दत्तात्रय जगन्नाथ उर्फ दादासाहेब सरदेशपांडे हे महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यांचे मूळ गाव हे संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव होते. परंतु ते राजापूर या गावात राहत असत.

शिक्षण क्षेत्रातील वाटा[संपादन]

राजापूर या गावातील शिक्षण क्षेत्रात यांचा मोलाचा वाटा होता. राजापूरमधील राजापूर हायस्कूल या विद्यालयाचे ते संस्थापक होते. तसेच देवरुख गावातील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेत यांचा सहभाग होता.

यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजापुरातील नाट्यगृहाला दादासाहेब सरदेशपांडे असे नाव देण्यात आले.