Jump to content

नारायण गोविंद नांदापूरकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ना.गो. नांदापूरकर या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रा. नारायण गोविंद नांदापूरकर (जन्म : १४ सप्टेंबर १९०१; मृत्यू :९ जून १९५९ ) हे एक मराठी कवी आणि पंतकवींच्या काव्याचे व लोकसाहित्याचे अभ्यासक होते. मोरोपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी 'मुक्त-मयूरांची भारते' हा ग्रंथ लिहिला. नांदापूरकर हे उस्मानिया विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते.

ना.गो. नांदापूरकर यांची 'माझी मराठी असे मायभाषा हिच्या कीर्तिचे तेज लोकी चढे, गोडी न राहे सुधेमाजि आता, पळाली सुधा स्वर्गलोकांकडे' ही कविता प्रसिद्ध आहे.

पुरस्कार

[संपादन]

महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका पुस्तकाला ना.गो. नांदापूरकर यांच्या नावाचा एक लाख रुपयाचा पुरस्कार देते. २०१८ सालचा पुरस्कार डाॅ. सतीश पावडे यांच्या 'द थिएटर ऑफ द ॲबसर्ड' या पुस्तकाला मिळाला. २०१५ सालचा पुरस्कार दिलीप धोंगडे यांना मिळाला होता. अहमदनगरमधील प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या आणि पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘लोकनिष्ठ अध्यात्मवाद’ ग्रंथासही ना. गो. नांदापूरकर यांच्या नावाने दिला जाणारा तत्त्वज्ञान-मानसशास्त्र विभागासाठीचा प्रौढवाङ्मयाअंतर्गत एक लाखाचा पुरस्कार प्रदान झाला होता.

नारायण नांदापूरकर यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • फुलारी (अनुवादित, मूळ Gardener, लेखक - रवींद्रनाथ टागोर)
  • मयूर-मुक्तांची भारते (मोरोपंत आणि मुक्तेश्वर यांच्या महाभारतावरील काव्यांचा परामर्श)
  • मऱ्हाटी स्त्री रचित रामकथा
  • मायबोलीची कहाणी (मराठी बोलीभाषांचा इतिहास)
  • स्त्री-गीतसंग्रह भाग १ ते ३ (संपादित)
  • हसू आणि आसू (अनुवादित, मूळ Tears and Laughters, लेखक - खलील जिब्रान)