Jump to content

रोहिणी हट्टंगडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोहिणी हट्टंगडी
रोहिणी हट्टंगडी
जन्म रोहिणी जयदेव हट्टंगडी
११ एप्रिल, १९५५ (1955-04-11) (वय: ६९)
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय 🇮🇳
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट अग्निपथ, गांधी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चार दिवस सासूचे, होणार सून मी ह्या घरची
पती जयदेव हट्टंगडी

रोहिणी जयदेव हट्टंगडी (माहेरच्या रोहिणी अनंत ओक) या रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा'च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या.

बालपण

[संपादन]

रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म ११ एप्रिल १९५५ रोजी दिल्ली येथे झाला. वडिलांचे नाव अनंत मोरेश्वर ओक तर आईचे नाव निर्मला अनंत ओक. त्यांच्या अभिनयाची सुरुवात पुण्याच्या भावे स्कूलपासून झाली. तिथे झालेल्या नाटकांत, अनेक नाट्यस्पर्धांत आणि औद्योगिक आस्थापने आयोजित करीत असलेल्या नाट्यप्रयोगांत त्या भाग घेत राहिल्या. त्यांचे वडील, आई आणि बंधू (रवींद्र ओक) हे तिघेही नट होते. त्या सगळ्यांनीच गावगुंड या मराठी नाटकात भूमिका केली होती.

शिक्षण

[संपादन]

रोहिणी ओक १९७०मध्ये बी.एस्‌सी. झाल्या आणि १९७१मध्ये त्यांची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) या संस्थेत अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी झाली. तीन वर्षाच्या त्या काळात रोहिणी ओकांनी विविध भाषांमधील नाटकांतून कामे केली. प्रेमचंदांच्या 'गोदान'वर आधारित 'होरी' नाटकातील 'धनिया'ची भूमिका, 'इबारगी' या जपानी 'काबुकी' पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका, कर्नाटकातील यक्षगान शैलीतील 'भीष्मविजय'मधील 'अंबे'ची भूमिका 'अंधा युग'मधील 'गांधारी'ची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून 'एका म्हाताऱ्याचा खून' या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. एन.एस.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण करून त्या पुणे येथे आल्या.

वैयक्तिक जीवन

[संपादन]

रोहिणी ओक या २८ मे १९७७ रोजी जयदेव हट्टंगडी यांच्याशी विवाहबद्ध होऊन रोहिणी हट्टंगडी झाल्या. जयदेव हट्टंगडी हे दिल्लीच्या एन.एस.डी.मध्ये दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेत होते.

कारकीर्द

[संपादन]

रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक नाटकांतून आणि चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यांच्या चित्रपटांत सहा तेलुगू चित्रपट आहेत. त्याशिवाय हिंदी-मराठी दूरदर्शन मालिकांतूनही त्या दिसतात. हट्टंगडी दाम्पत्याने 'कलाश्रय' ही नाट्याभ्यास करणारी व प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देणारी संस्था स्थापन केलेली आहे. त्या संस्थेतर्फे त्यांनी 'वाडा भवानी आईचा', 'अपराजिता' (एकपात्री प्रयोग) अशा नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केल्या आहेत.

रोहिणी हट्टंगडी यांची नाटके आणि त्यातील भूमिकेचे नाव

[संपादन]
  • अक्कल धावते घोड्यापुढे (साहेब)
  • अंधेका हाथी (हिंदी)
  • अमे जीविये बेफाम (गुजराती)
  • असा मी काय गुन्हा केला (बालनाट्य)
  • आपण क्लबात भेटलो होतो
  • उद्ध्वस्त धर्मशाला (हिंदी)
  • ऋतुगंध
  • एकच प्याला (गीता)
  • कथा कुणाची व्यथा कुणाची (मुग्धा)
  • कधीतरी कुठेतरी
  • कस्तुरीमृग (पहिले व्यावसायिक नाटक, अंजनी)
  • कळी एकदा फुलली होती
  • खंडोबाचं लगीन (मुरळी)
  • गावगुंड
  • गिद्ध (हिंदी)
  • ग्रेट गॉड ब्राऊन (हिंदी)
  • चांगुणा (चांगुणा)
  • जंगलातला वेताळ (बालनाट्य)
  • जुगलबंदी (गुजराती)
  • टुणटुण नगरी खणखण राजा (बालनाट्य)
  • डंख
  • तीन चोक तेरा
  • दिल्या घरी तू सुखी रहा
  • दिवा जळू दे सारी रात (ताई)
  • प्रेम कुणावरही करावं
  • बिच्छू (हिंदी)
  • बोल बोल म्हणता (रावसाहेब)
  • भ्रमाचा भोपळा (राजा)
  • माणस होवानो माने डंख (गुजराती)
  • मंतरलेलं पाणी (बालनाट्य)
  • मित्राची गोष्ट (सुमित्रा)
  • मी मुख्यमंत्री (सोनिया)
  • मेडिया (मेडिया)
  • यांत्रिकी
  • रथचक्र (थोरली)
  • लपंडाव (रंजना)
  • लफडा सदन (सेक्रेटरी)
  • लोहमत (गुजराती)
  • शांतता! कोर्ट चालू आहे (बेणारे)
  • शितू
  • श्रीमंत (मथू)
  • सर्पनाद (गुजराती)
  • सायसाखर
  • सुंदर मी होणार (बीबीराजे)
  • सुनो जनमेजय (युवती)
  • होरी (हिंदी)
  • नोकराणी (गुजराती)

चित्रपट

[संपादन]
  • अग्निपथ (हिंदी)
  • अजीब दास्तान (हिंदी)
  • अच्छुवेतान्ते वीड्डु (कानडी)
  • अर्थ (हिंदी)
  • गांधी (हिंदी-इंग्रजी)
  • चक्र (हिंदी)
  • डेव्हिड (हिंदी)
  • प्रेमाची गोष्ट
  • मँगो ड्रीम्स (हिंदी)
  • मन वरालु (तेलुगू)
  • माने (कानडी)
  • मुन्नाभाई एम.बी.बी.एस (तमिळ)
  • लेकर हम दीवाना दिल (हिंदी)
  • विनयः एक वादळ (दूरचित्रवाणी चित्रपट)
  • सरकार ३ (हिंदी)
  • सारांश (हिंदी)
  • सीतारामय्या (तेलुगू)

दूरचित्रवाणी मालिका

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]
  • बेस्ट ऑल राउंड स्ट्युडंट पुरस्कार
  • NSDचा बेस्ट ॲक्ट्रेस ॲवॉर्ड
  • महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत 'चांगुणा' या फेडरिको ग्रासिया लार्का यांच्या स्पॅनिश नाटकाच्या मराठी रूपांतरित नाटकात 'चांगुणा' ह्या मध्यवर्ती भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७५)
  • २००९ 'बालगंधर्व पुरस्कार'[]
  • रोहिणीताईंना चार वेळा राज्य नाटय स्पर्धेत रौप्यपदके, प्रमाणपत्रे असे अभिनयाचे पुरस्कार
  • 'कस्तुरीमृग' या व्यावसायिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
  • संगीत नाटक अकादमी ॲवॉर्ड
  • 'पाटी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार
  • 'अर्थ' आणि 'अग्निपथ' या चित्रपटांसाठी फिल्मफेर पुरस्कार वगैरे.
  • ब्रिटिश ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्‌स (बी.ए.एफ.टी.ए.) तर्फे रिचर्ड ॲटनबरोनिर्मित 'गांधी' या चित्रपटातील 'कस्तुरबा' यांच्या भूमिकेसाठी सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
  • बालगंधर्व परिवारातर्फे जीवनगौरव पुरस्कार (जून २०१७)
  • विष्णूदास भावे पुरस्कार (ऑक्टोबर २०१९)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना २०२४ सालचा जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला. १४ जून २०२४ रोजी यशवंतराव चव्हाण संकुल, माटुंगा- माहीम येथे गो. ब. देवल पुरस्कार या समारंभात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.[]

अन्य

[संपादन]

रोहिणी हट्टंगडी या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या ’चारचौघी’ या मान्यताप्राप्त ललित मासिकाच्या संपादिका आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "रोहिणी हट्टंगडी, भरत जाधव यांना 'बालगंधर्व पुरस्कार". 2009-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-20 रोजी पाहिले.
  2. ^ "अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना नाट्य परिषदेचा 'जीवनगौरव'". दैनिक सकाळ. २५ मे २०२४ रोजी पाहिले.