आई रिटायर होतेय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भक्ती बर्वे यांना डोळय़ांसमोर ठेवूनच 'आई रिटायर होतेय' नाटकाची निर्मिती झाली. अशोक पाटोळे यांनी लेखन आणि दिलीप कोल्हटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग १७ ऑगस्ट १९८९ रोजी मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे झाला होता.

आयुष्यभर घरासाठी काबाडकष्ट उपसणाऱ्या आईसाठी सेवानिवृत्तीचे वय नसते. घरातील स्त्रीलाही कधीतरी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त व्हावेसे वाटते. अशाच एका कुटुंबातील आई रिटायर होण्याचे ठरविते आणि त्यानंतर तिच्या जबाबदाऱ्या निभावताना सर्वाचीच दमछाक होते, अशी या नाटकाची कथा आहे. आईच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये भक्ती बर्वे असणाऱ्या या नाटकाचे ७५० प्रयोग झाले.

भक्ती बर्वे यांच्या अपघाती निधनानंतर नाट्य‍अभिनेत्री अभिनेत्री स्मिता जयकर यांनी आईची भूमिका करायला सुरुवात केली, आणि नाटकाचे १०० प्रयोग केले..

दिलीप कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रवि सांभारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचा त्यापुढील प्रयोग नव्या कलाकारांच्या संचात, ८ मार्च २०१४ला झाला. यात आईची भूमिका वीणा फडके यांनी केली होती.. अन्य कलावंत उपेंद्र दाते, रश्मी देव, रुपाली पाथरे, रेणुका भिडे, सुशीला भोसले, आशुतोष नेर्लेकर होते.

हिंदी-गुजराती प्रयोग[संपादन]

'आई रिटायर होतेय' नाटकाचे यश पाहून हे नाटक हिंदी आणि गुजरातीमध्येही रंगभूमीवर आले.. अशोक लाल यांनी हिंदीत अनुवादित केलेल्या 'मॉं रिटायर होती है' या नाटकात प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी आईची मध्यवर्ती भूमिका रंगविली होती, तर अरविंद जोशी यांनी गुजराती रूपांतर केलेल्या 'बा रिटायर थाय छे' या नाटकात पद्माबेन आणि सरिता जोशी यांनी आईची भूमिका साकारली होती. आई जेव्हा रिटायर होते.