प्रशांत दामले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.
प्रशांत दामले
जन्म प्रशांत पुरुषोत्तम दामले
५ एप्रिल, इ.स. १९६१
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी, हिंदी दूरचित्रवाणी
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८३ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके चार दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे
प्रमुख चित्रपट वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन
पुरस्कार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
नाट्यदर्पण
अखिल भारतिय नाट्य पारिषद

प्रशांत पुरुषोत्तम दामले (५ एप्रिल, इ.स. १९६१[१]; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे.

जीवन[संपादन]

मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९८३मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.

पुरस्कार (३२हून अधिक)[संपादन]

  • प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
  • प्रशांत दामले यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कार प्रदान झाला आहे. (२०-१-२०१६)

कार्य[संपादन]

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत (५-१-२०१८) एकूण ११००० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत. ५ जानेवारीला २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.

प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.

प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.

प्रशांत दामले यांची नाटके[संपादन]

  • आम्ही दोघं राजा राणी
  • एका लग्नाची गोष्ट
  • ओळख ना पाळख
  • कार्टी काळजात घुसली (सहअभिनेत्री - तेजश्री प्रधान;.... )
  • गेला माधव कुणीकडे (>१७४६ प्रयोग)
  • चल काही तरीच काय
  • चार दिवस प्रेमाचे (>१०२६ प्रयोग)
  • जादू तेरी नजर
  • टुरटूर
  • नकळत दिसले सारे
  • पाहुणा
  • प्रियतमा
  • प्रीतिसंगम
  • बहुरूपी
  • ब्रह्मचारी
  • बे दुणे पाच (?)
  • माझिया भाऊजींना रीत कळेना
  • मोरूची मावशी
  • लग्नाची बेडी
  • लेकुरे उदंड झाली
  • व्यक्ती आणि वल्ली
  • शूss कुठं बोलायवं नाही
  • श्री तशी सौ
  • संशयकल्लोळ (सहअभिनेता राहुल देशपांडे)
  • साखर खाल्लेला माणूस (सहअभिनेत्री - शुभांगी गोखले; ......)
  • सासू माझी ढाँसू
  • सुंदर मी होणार




चित्रपट[संपादन]

प्रशांत दामले यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट --

  • अक्का
  • आई पाहिजे
  • आत्मविश्वास
  • आनंदाचे झाड
  • आम्ही दोघे राजा राणी
  • इना मिना डिका
  • एकदा पहावं करुन, चित्रपट
  • एक रात्र मंतरलेली
  • खुळ्यांचा बाजार
  • गोळा बेरीज
  • घरंदाज
  • चल गंमत करू
  • चार दिवस सासूचे
  • तू तिथं मी
  • धडकमार
  • पसंत आहे मुलगी
  • पुढचं पाऊल (नवा)
  • फटफजिती
  • बंडलबाज
  • बाप रे बाप
  • मधुचंद्राची रात्र
  • माझा छकुला
  • मुंबई - पुणे - मुंबई (भाग १, २)
  • रेशीमगाठी
  • वाजवा रे वाजवा
  • विधिलिखित
  • वेलकम जिंदगी
  • सगळीकडे बोंबाबोंब
  • सगळे सारखेच
  • सवत माझी लाडकी


हिंदी मालिका[संपादन]

  • चंद्रकांत चिपलुनकर सिढी बम्बावाला

अभिनयाची शाळा[संपादन]

  • पुण्यात रशांत दामले यांची अभिनय शिकवण्याची एक प्रशिक्षण संस्था आहे.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.