केशवराव भोसले नाट्यगृह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

केशवराव भोसले नाट्यगृह ऊर्फ पॅलेस थिएटर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील एक विख्यात नाट्यगृह आहे. हे नाट्यगृह कोल्हापुरातील खासबाग भागात वसले आहे. थिएटरची मालकी सार्वजनिक असून व्यवस्था कोल्हापूर महापालिका पाहते. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन १४ऑक्टोबर १९१५ या दिवशी झाले आणि नूतनीकरण ९मे १९८४ला. प्रेक्षागृहाचे आकारमान ७७' x ४८’ इतके असून रंगमंचाचे २५’ x ३३’ आहे. रंगमंचासमोरचा मोठा दर्शनी पडदा जांभळ्या रंगाच्या मखमली कापडाचा आहे. तो ४४’ x १६’ या आकारमानाचा आहे. नाट्यगृह वातानुकूलित आहे. त्याची आसनसंख्या तळमजल्यावर ६४५ खुर्च्या आणि सज्ज्यामध्ये ३०७ खुर्च्या इतकी आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.