पुरुषोत्तम बेर्डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'क्लोज एनकाउंटर्स' हे पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांचे प्रसिद्ध पुस्तक. व्यक्तिचित्रणे असलेली मराठीतील दोन गाजलेली पुस्तके म्हणजे पु.ल. देशपांडे यांचे 'व्यक्ती आणि वल्ली' आणि जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे'. या दोन्ही पुस्तकांतील व्यक्तिचित्रणांना तोडीस तोड अशी व्यक्तिचित्रणे 'क्लोज एनकाउंटर्स' हे पुस्तक आहे. विशेष म्हणजे या पुस्तकातील सर्व व्यक्ती बेर्डेंना मुंबईच्या कामाठीपुरातील सोळा गल्ल्यांमध्ये भेटल्या आहेत.

पुरुषोत्तम बेर्डे हे मराठी अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे वडील बंधू होत. बेर्डे मुंबईजवळच्या (ठाणे|ठाण्यात]] राहतात.

पुरुषोत्तम बेर्डे हे जेजेमध्ये असताना संस्थेच्या नोटीस बोर्डावर 'बोरीबंदरचा बेरड' या नावाने समीक्षणे लिहीत असत.

पुस्तकाचे पहिले प्रकरण हे नागपाड्याच्या नाक्यावरच्या 'ॲलेक्झांड्रा' या सिनेमागृहाबद्दल आहे. या थिएटरबद्दल अरुण पुराणिक यांनीही एक लेख लिहिला आहे.

नाट्य-चित्र दिग्दर्शक पुरुषोत्तम गजानन बेर्डे[संपादन]

पुरुषोत्तम गजानन बेर्डे हे मराठीतले एक यशस्वी चित्रकार, लेखक, एकांकिकाकार, नाट्यलेखक, नाट्यदिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते, प्रकाशयोजनाकार,वेशभूषाकार आणि सिनेदिग्दर्शक आहेत. 'चौरंग' नावाची त्यांची नाट्यसंस्था आहे.

पुरुषोत्तम बेर्डे यांनी सन १९७५मध्ये मुंबईच्या जे.जे. आर्ट स्कूलमधून डी.जी. आर्ट (Drawing & Painting and Graphic Art) ही अप्लाईड आर्टमधील पदविका घेतली आणि पुढे आठ वर्षांपर्यंत जाहिरात क्षेत्रात काम केले.

सन १९७८मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांना 'या मंडळी सादर करू या' या नाट्यसंस्थेकडून “अलवार डाकू' या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीत करायला मिळाले, आणि त्यांची नाट्यकार्कीर्द सुरू झाली. त्यांनी २०१० सालापर्यंत १० नाटकांचे लेखन, २० नाटकांचे दिग्दर्शन, ६० नाटकांचे संगीत दिग्दर्शन आणि ५ नाटकांची व ९ चित्रपटांची निर्मिती केली आहे.

इंडियन नॅशनल थिएटरने त्यांना सतत तीन वर्षे सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता म्हणून गौरवले आहे.

पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांची नाटके[संपादन]

 • अलवार डाकू (१९७८, लेखन, दिग्दर्शन आणि संगीत)
 • खंडोबाचं लगीन
 • गांधी विरुद्ध सावरकर (लेखन, दिग्ग्दर्शन, नेपथ्य, संगीत)
 • चिरीमिरी
 • जाऊबाई जोरात
 • टुरटूर (१९८३, निर्मिती आणि इतर सर्व), वगैरे
 • मुंबई, मुंबई
 • 'लक्ष्मीकांत बेर्डे' या अभिनेत्यावरील ‘लक्षातला लक्ष्या’ हा बायोथिएट्रिकल ड्रामा.

पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांचे चित्रपट[संपादन]

 • एक फुल चार हाफ (१९९१, दिग्दर्शन)
 • घायल (१९९३, दिग्दर्शन)
 • जमलं हो जमलं (१९९५, दिग्दर्शन)
 • तावीज
 • निशाणी डावा अंगठा (२००९, दिग्दर्शन)
 • भस्म (१९९४, दिग्दर्शन)
 • शिवरायाची सून ताराराणी (१९९३, अभिनय)
 • शेम टु शेम (१९९१, दिग्दर्शन)
 • श्यामची मम्मी (२००८, दिग्दर्शन)
 • हमाल दे धमााल (१९८९, अभिनय व दिग्दर्शन)
 • हाच सुनबाईचा भाऊ (१९९२, दिग्दर्शन)

पुरुषोत्तम गजानन बेर्डे यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

 • 'अलवार' नाटकासाठी राज्य स्तरावरील व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
 • इंडियन नॅशनल थिएटरचा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता म्हणून गैरव
 • 'जाऊबाई जोरात' या नाटकासाठी (सन २०००मध्ये मिळालेले) २७ पुरस्कार
 • 'तावीज' चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्यपुरस्कार आणि भारत सरकारचा पुरस्कार
 • पी सावळाराम पुरस्कार (२०१०)
 • पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ३० वर्षांच्या नाट्यसेवेसाठी नाशिक नाट्य परिषदेचा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्का (२००३)
 • 'भस्म' चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्यपुरस्कार आणि भारत सरकारचा पुरस्कार
 • 'हमाल दे धमाल' चित्रपटासाठी चार राज्य पुरस्कार