भरत जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भरत जाधव
जन्म भरत जाधव
मुंबई, महाराष्ट्र, भारत
इतर नावे भरत्या
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट नाटक
भाषा मराठी
प्रमुख नाटके सही रे सही, श्रींमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच
प्रमुख चित्रपट गलगले निघाले, साडे माडे तीन, मुक्काम पोस्ट लंडन, नामदार मुख्यमंत्री गंप्या गावडे, जत्रा, खबरदार, पछाडलेला
प्रमुख टीव्ही कार्यक्रम आली लहर केला कहर.
पत्नी सरिता भरत जाधव
धर्म बौद्ध धर्म

[१]भरत जाधव हा मराठी नाटक आणि चित्रपटामधला एक कलाकार (अभिनेता) आहे. व्यावसायिक मराठी चित्रपटांत भरत एक विनोदी कलाकार आहे. "सही रे सही" हे नाटक त्याने केलेल्या नाटकांपैकी एक आहे. "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", आणि "आमच्यासारखे आम्हीच" ही त्याची इतर नाटके.

त्याने आपली कारकीर्दीची सुरुवात शाहीर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८५मधे केली.

कारकीर्द[संपादन]

भरत जाधवच्या वेबसाईटनुसार त्याने ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५००हून अधिक नाट्यप्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे.[२]

सही रे सही[संपादन]

सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.[३]

‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले. गुजराथी नाटकात शर्मन जोशी याने काम केले होते. या गुजराथी नाटकाचे २० महिन्यात ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे ३५० प्रयोग होणे हे गुजराथी रंगभूमीवर गेल्या १० वर्षात प्रथम घडले होते.

याच नाटकाचे 'हम ले गये, तुम रह गये' या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरी याने काम केले होते.


.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

 • खतरनाक (२०००)
 • खबरदार (२००५)
 • गलगले निघाले (२००८)
 • गोंद्या मारतंय तंगडी (२००८)
 • चालू नवरा भोळी बायको (२००६)
 • जत्रा (२००६)
 • डावपेच (२०११)
 • नवर्‍याची कमाल बायकोची धमाल (२००४)
 • नाना मामा (२००६)
 • नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
 • पछाडलेला (२००५)
 • प्राण जाएॅं पर शान न जाएॅं (हिन्दी, २००३)
 • बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
 • बाप रे बाप (२००३)
 • माझा नवरा तुझी बायको (२००६)
 • मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
 • शिक्षणाच्या आयचा घो (२०१०)
 • सरीवर सरी (२००५)
 • साडे माडे तीन (२००८)
 • हाऊस फूल (२००४)

नाटक कारकीर्द[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ चिपळूणकर, आसावरी. विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. मुंबई: साप्ताहिक विवेक ( हिन्दुस्थान प्र्काशन संस्था ).
 2. ^ "Planet Powai Bio". 2006-10-25 रोजी पाहिले.
 3. ^ "भरत जाधव यांचा 'नाट्यसंपदा'चा अंक-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-10-17 रोजी पाहिले.

[१] [२]

बाह्य दुवे[संपादन]

 1. ^ http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5079336057569729322&SectionId=13&SectionName=%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0&NewsDate=20150507&Provider=-&NewsTitle=%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5%20%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4
 2. ^ http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5292109309134414118&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&NewsDate=20150118&Provider=%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5&NewsTitle=%27%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A5%80%27%E0%A4%A8%E0%A4%82%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A6%E0%A4%BE%20(%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5)