बण्डा जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंडा जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

बंडा जोशी तथा बण्डा जोशी हे मराठीताले एक हास्यकलावंत आणि आकाशवाणी निवेदक आहेत. त्यांचे पूर्ण नाव बण्डा ऊर्फ भालचंद्र दत्तात्रय जोशी असून हे मूळचे कोल्हापूरचे आहेत.

नोकरी[संपादन]

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर प्रादेशिक बातम्या देणारे एक भालचंद्र जोशी होते, म्हणून जेव्हा बंडा जोशी यांना त्याच केंद्रावर नोकरी लागली तेव्हा त्यांना आपल्या नावातले ’भालचंद्र’ गाळावे लागले. बंडा जोशी पुणे केंद्रावरून सुप्रभात नावाचा कार्यक्रम करीत.

एकपात्री नाटक[संपादन]

बंडा जोशी हे जेव्हा एकपात्रीचा प्रयोग करतात तेव्हा त्यात त्यांच्या कविताही ते म्हणून दाखवतात. ’हास्यपंचमी’ आणि हास्यखळखळाट’ ही त्यांच्या एकपात्री प्रयोगांची नावे आहेत.

बंडा जोशी हे ’आम्ही एकपात्री’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत.

पुस्तके[संपादन]

  • खळखळाट (हास्यकविता संग्रह)

पुरस्कार[संपादन]

  • माधव मनोहर पुरस्कार (२००९)
  • सुखकर्ता पुरस्कार (२०१४)