अविनाश कोल्हे
प्रा. अविनाश राजाराम कोल्हे हे एक मराठी लेखक आहेत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
यांचा जन्म पाचोरा येथे २ एप्रिल १९५७ रोजी झाला. त्यांनी बीए.सी ही पदवी १९७८ मध्ये पुणे विद्यापीठ, पुणे येथुन पूर्ण केली. एम. बी. ए. १९८० मध्ये केले. एल.एल.बी ची पदवी १९८३ मध्ये त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी बी.ए. (१९९१) व एम.ए. राज्यशास्त्र (१९९३) या पदव्या संपादन केल्या. ते २०१७ सालच्या एप्रिल महिन्यात मुंबईतील डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. भारताचे पंतप्रधान डाॅ. मनमोहनसिंग यांच्या चरित्राखेरीज आणखीही काही पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. ‘चीनमधील मुस्लिम समाजातील अलगतेची भावना’ या विषयावर त्यांचे संशोेधन सुरू आहे.
प्रकाशित साहित्य
[संपादन]- अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग : प्रशासक ते पंतप्रधान ... एक वाटचाल (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ??)
- अल्बर्ट आईनस्टाईन : निवडक लेखन (अनुवादित, मूळ इंग्रजी, संपादक - जिम ग्रीन)
- गोपाळ गणेश आगरकर (चरित्र)
- चौकट वाटोळी (कादंबरी)
- भारताची फाळणी (इतिहास, अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - अनिता इंदरसिंह)
- रंगदेवतेचे आंग्लरूप : मुंबईतील अ-मराठी रंगभूमी (हिंदी-इंग्रजी नाटकांचा परीक्षणसंग्रह)
- सेकंड इनिंग (दोन दीर्घकथा)
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार - उत्कृष्ट कथासंग्रह 'सेकंड इनिंग'- २०१७
- वर्धा येथील 'दाते पुरस्कार' - चौकट वाटोळी (कादंबरी), जानेवारी २०१७
संदर्भ https://moresangita.blogspot.com/2020/01/blog-post_9.html