जयंत पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जयंत पवार हे एक मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. तेच नाटक नंतर निर्माते संतोष कोचरेकर यांनी कल्पना कोठारी आणि उदय कुलकर्णी यांस सहनिर्माता म्हणून घेऊन आपल्या ‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे व्यावसायिक रंगभूमीवर आणले.

२०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.

जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला.

जयंत पवार यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

  • अधांतर
  • काय डेंजर वारा सुटलाय
  • टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन
  • दरवेशी (एकांकिका)
  • पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
  • फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
  • माझे घर
  • होड्या (एकांकिका)

पहा : नाट्यसमीक्षक