डिसेंबर ११
Appearance
<< | डिसेंबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४४ वा किंवा लीप वर्षात ३४५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले.
- १९३० - सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४६ - युनिसेफची स्थापना
- १९६७ - कोयनानगर येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
- १९७२ - अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
- १९९४ - राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरून रशियन फौजांनी चेचन्यामध्ये प्रवेश केला.
- २००१ - चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मधे प्रवेश
- २०१३ - परस्परसंमतीने सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले सम/विषमलिंगी शरीरसंबंध कायदेशीर ठरवणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा २००९ सालचा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला.
जन्म
[संपादन]- १८८२ - सुब्रम्हण्य भारती, तामिळ साहित्यिक
- १८९२ - अयोध्या नाथ खोसला, स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ - १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ - १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ - १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६), पद्मविभूषण (१९७७)
- १८९९ - पु. य. देशपांडे, मराठी कादंबरीकार.
- १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) .
- १९१५ - मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक.
- १९२२ - मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल.
- १९२५ - राजा मंगळवेढेकर, बालसाहित्यकार
- १९२९ - सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३१ - भगवान श्री रजनीश
- १९३५ - प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती
- १९४२ - आनंद शंकर भारतीयय संगीतकार
- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रॅंडमास्टर.
मृत्यू
[संपादन]- १७८३ - रघुनाथराव पेशवे.
- १९८७ - गुरुनाथ आबाजी कुलकर्णी तथा जी. ए. कुलकर्णी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक.
- १९९८ - रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी.
- २००१ - रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक.
- २००२ - नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ज्ञ.
- २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न व रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
- २०१२ - पं. रवी शंकर, भारतरत्न पुरस्कृत भारतीय सतारवादक व संगीतकार.
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - (डिसेंबर महिना)