रिश्टर मापनपद्धत
Jump to navigation
Jump to search
रिश्टर मापनपद्धत किंवा रिख्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या उर्जेचे प्रमाण मोजण्याची पद्धत आहे. रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढतं तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते. म्हणजे सात रिश्टर स्केलच्या धक्कयानं जी ऊर्जा बाहेर पडते ती सहा रिश्टर स्केलच्या धक्क्याच्या दहा पट जास्त असते आणि पाच रिश्टर स्केल धक्क्याच्या शंभर पट जास्त असते. भूजचा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता, तर लातूरचा भूकंप ६.३ रिश्टर स्केलचा होता. २०११ साली जपान मध्ये झालेला भूकंप ९ रिश्टर स्केलचा होता. भूकंप मॅग्नीटय़ूड (क्षमता) आणि इन्टेन्सिटी (तीव्रता) अशा दोन मानकात मोजला जातो.