"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११: ओळ ११:
==रचना==
==रचना==
[[File:Prime Minister Narendra Modi visits birthplace of Dr. Babasaheb Ambedkar in Mhow.jpg|thumb|right|पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या [[रमाबाई आंबेडकर|रमाईंच्या]] पुतळ्यांना अभिवादन करताना]]
[[File:Prime Minister Narendra Modi visits birthplace of Dr. Babasaheb Ambedkar in Mhow.jpg|thumb|right|पंतप्रधान [[नरेंद्र मोदी]] भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या [[रमाबाई आंबेडकर|रमाईंच्या]] पुतळ्यांना अभिवादन करताना]]

महूच्या जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे आहे. स्मारकाच्या समोर प्रवेशद्वाराजवळ बाबासाहेबांचा एक उंच पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. स्मारकाच्या समोर व टोकावर [[पंचशील ध्वज]] ([[बौद्ध ध्वज]]) लावलेले आहेत. स्मारकाच्या आतमध्ये बाबासाहेबांचा जीवनपट दर्शवणारी तैलचित्रे लावण्यात आली आहे. तसेच बाबासाहेब व [[रमाबाई आंबेडकर]] यांचे पुतळेही यात आहेत.


==कार्यक्रम==
==कार्यक्रम==

१८:४५, २३ मे २०१८ ची आवृत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी महू येथील भीम जन्मभूमी स्मारकापुढील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करताना

भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेशातील महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता.[१] येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले.[२] स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले.[३]

दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व इंदौर येथून २० किलोमीटरच्या अंतरावर महू आहे. या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता २०१६ मध्ये १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते.[४][५] २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महू ला भेटी देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.[६]

इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली व नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम केल्यानंतर त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू इथे नोकरी निमित्त वास्तव्यास राहिले. कारण महू हे 'मिलीटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर' होते. महूच्या काली पलटन भागात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. आपल्या अस्पृश्यता निर्मुलन कार्य, भारतीय संविधान निर्मिती व सामूहिक बौद्ध धम्म दीक्षा व इतर कार्यांमुळे बाबासाहेब आंबेडकर जागतिक पटलावर एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागते. अस्पृश्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी अस्पृश्यांसाठी एक पवित्र भूमी बनली व या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. या जन्मभूूमीचे दर्शन घेण्याकरिता आंबेडकरांचे अनुयायी येऊ लागले.[७]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष भंते संघशील यांनी २७ मार्च १९९१ रोजी समितीच्या बैठक आयोजित केली, तेथे निश्चित करण्यात आले होते, की स्मारकाचे भूमीपूजन करण्याकरता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना आमंत्रित केले जाईल, ज्याची सूचना मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जन्मभूमीवर स्मारकाच्या बांधणीच्या नकाशे वास्तुशिल्पकार ईडी निमगडे यांनी तयार केले. व जयंती उत्सवाची तयारी सुरु करण्यात आली. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश आणण्याकरिता भंतेजी मुंबई गेले शासनाकडून दहा हजार रूपये अनुदान घेऊन अस्थिकलश घेतला. मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे घनःश्याम तळवटकर आणि न्यायमूर्ती आर.आर. भोले यांच्याशी भेट घेतली. भंतेजी बाबासाहेबांचा अस्थिकलश घेऊन १२ एप्रिल १९९१ ला महूला आणला. भूमीपूजनाच्या कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक होते त्या काळात जिल्हाधिकारी अय्यर आणि एस.पी. माकूल यांनी बदोबस्त केला. १४ एप्रिल १९९१ या बाबासाहेबांच्या १०० वी स्वर्ण जयंतीदिनी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले, त्यांच्याबरोबर अटलबिहारी वाजपेयी आणि मंत्री भेरूलाल पाटीदार व भन्ते धर्मशील होते.[२] पुढे भव्य भीम जन्मभूमी स्मारक बनवले गेले व १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी त्याचे लोकार्पण केले गेले.[३]

रचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी भीम जन्मभूमी स्मारकाच्या आतील बाबासाहेबांच्या रमाईंच्या पुतळ्यांना अभिवादन करताना

महूच्या जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे आहे. स्मारकाच्या समोर प्रवेशद्वाराजवळ बाबासाहेबांचा एक उंच पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे. स्मारकाच्या समोर व टोकावर पंचशील ध्वज (बौद्ध ध्वज) लावलेले आहेत. स्मारकाच्या आतमध्ये बाबासाहेबांचा जीवनपट दर्शवणारी तैलचित्रे लावण्यात आली आहे. तसेच बाबासाहेब व रमाबाई आंबेडकर यांचे पुतळेही यात आहेत.

कार्यक्रम

मध्य प्रदेश सरकार महूमध्ये आंबेडकर जयंतीला दरवर्षी 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.[८]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Bharat Ratna Dr. B. R. Ambedkar Smarak, Mhow Cantonment | Directorate General Defence Estates". www.dgde.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-23 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Indore News in Hindi – आंबेडकर स्मारक की आधारशीला रखने महू आए थे पूर्व मुख्यमंत्री पटवा". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2018-05-23 रोजी पाहिले.
  3. ^ a b "महू में बनेगा आम्बेडकर स्मारक". फॉरवर्ड प्रेस (हिंदी भाषेत). 2015-01-01. 2018-05-23 रोजी पाहिले.
  4. ^ "प्रधानमंत्री मोदी ने महू में डॉ बाबासाहेब अम्बेडकर के जन्म स्थान का दौरा किया". www.narendramodi.in. 2018-05-23 रोजी पाहिले.
  5. ^ "महू : बर्तन साफ करने वाली मां का बेटा पीएम बन पाया, तो उसका श्रेय बाबासाहेब को जाता है..." NDTVIndia. 2018-05-23 रोजी पाहिले.
  6. ^ "बाबासाहेब की जन्मस्थली पर राष्ट्रपति के रूप में आना मेरा सौभाग्य: रामनाथ कोविंद– News18 हिंदी". News18 India. 2018-05-23 रोजी पाहिले.
  7. ^ "https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=Zc1ZAXs1gyI=". www.mahanews.gov.in. 2018-05-23 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  8. ^ "आम्बेडकर जयंती पर महू के स्मारक पहुंचने वाले कोविंद पहले राष्ट्रपति". m.hindi.webdunia.com. 2018-05-23 रोजी पाहिले.