"भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१: ओळ ३१:
== बौद्ध धर्मशास्त्र ==
== बौद्ध धर्मशास्त्र ==
डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली सर्व पुस्तकांचे आपले एक विशिष्ट महत्व आहे परंतु त्यातही सर्वात महत्वपूर्ण स्थान ‘द बुद्धा अँड हिज धम्म’ चे आहे. जर या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हटले गेले तरी ती अतिश्योक्ती ठरणार नाही. हा एक विशाल ग्रंथ आहे, ज्यामध्ये बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. या ग्रंथाची भाषा ओजस्वी व सारगर्भित आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. सर्वप्रथम, त्यांनी [[हीनयान]] आणि [[महायान]] यामध्ये विभागलेल्या बौद्धधर्माला कोणतेही महत्त्व दिले नाही. बौद्ध धर्म, तथागत बुद्धांचा धर्म एकच आहे. तत्त्वज्ञान विषयक व्याख्या भिन्न असू शकतात. धर्माच्या रूपात बौद्ध धर्म एकच आहे. दोन बौद्ध धर्म असणे संभव नाही.
डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली सर्व पुस्तकांचे आपले एक विशिष्ट महत्व आहे परंतु त्यातही सर्वात महत्वपूर्ण स्थान ‘द बुद्धा अँड हिज धम्म’ चे आहे. जर या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हटले गेले तरी ती अतिश्योक्ती ठरणार नाही. हा एक विशाल ग्रंथ आहे, ज्यामध्ये बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. या ग्रंथाची भाषा ओजस्वी व सारगर्भित आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. सर्वप्रथम, त्यांनी [[हीनयान]] आणि [[महायान]] यामध्ये विभागलेल्या बौद्धधर्माला कोणतेही महत्त्व दिले नाही. बौद्ध धर्म, तथागत बुद्धांचा धर्म एकच आहे. तत्त्वज्ञान विषयक व्याख्या भिन्न असू शकतात. धर्माच्या रूपात बौद्ध धर्म एकच आहे. दोन बौद्ध धर्म असणे संभव नाही.

== इतिहास ==
डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक लिहण्याच्या उद्देश समजावून सांगताना:


== चार प्रश्न ==
== चार प्रश्न ==

१९:४३, २९ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

बुद्ध आणि त्यांचा धम्म
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The Buddha and His Dhamma
भाषा इंग्रजी
देश भारत
साहित्य प्रकार धर्मशास्त्र
प्रकाशन संस्था सिद्धार्थ महाविद्यालय प्रकाशन, मुंबई
प्रथमावृत्ती इ.स. १९५७
विषय भारतीय बौद्धांचा धर्मग्रंथ
पृष्ठसंख्या ५९९

बुद्ध आणि त्यांचा धम्म (इंग्रजी: The Buddha and His Dhamma) हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध ग्रंथ आहे. हा ग्रंथ मूळ इंग्रजीत लिहिला गेलेला असून तो डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतर इ स. १९५७ मध्ये पहिल्यादा प्रकाशित झाला. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे.

इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. इंग्रजीत लिहिलेला हा ग्रंथ हिंदी, गुजराती, तेलगु, तमिळ, मराठी, मल्याळम आणि कन्नड यासारख्या बऱ्याच भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला आहे. डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनी या ग्रंथाचा अनुवाद हिंदीपंजाबी भाषेत तर घन:श्याम तळवटकर, म. भि. चिटणीस आणि शां. शं. रेगे या तिघांनी मराठी भाषेत केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असे सांगितले होते की, हा ग्रंथ त्या तीन पुस्तकांपैकी एक आहे, जे बौद्ध धर्माच्या योग्य समस्यांसाठी एक संच तयार करेल. इतर पुस्तके आहेत: (१) बुद्ध आणि कार्ल मार्क्स; आणि (२) प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रति-क्रांती.

बौद्ध धर्मशास्त्र

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली सर्व पुस्तकांचे आपले एक विशिष्ट महत्व आहे परंतु त्यातही सर्वात महत्वपूर्ण स्थान ‘द बुद्धा अँड हिज धम्म’ चे आहे. जर या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हटले गेले तरी ती अतिश्योक्ती ठरणार नाही. हा एक विशाल ग्रंथ आहे, ज्यामध्ये बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. या ग्रंथाची भाषा ओजस्वी व सारगर्भित आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. सर्वप्रथम, त्यांनी हीनयान आणि महायान यामध्ये विभागलेल्या बौद्धधर्माला कोणतेही महत्त्व दिले नाही. बौद्ध धर्म, तथागत बुद्धांचा धर्म एकच आहे. तत्त्वज्ञान विषयक व्याख्या भिन्न असू शकतात. धर्माच्या रूपात बौद्ध धर्म एकच आहे. दोन बौद्ध धर्म असणे संभव नाही.

इतिहास

डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तक लिहण्याच्या उद्देश समजावून सांगताना:

चार प्रश्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या परिचयामध्ये चार प्रश्‍न उपस्थित केलेले आहेत.

त्यापैकी एका प्रश्‍नात ते म्हणतात की, “बौद्ध धम्म निराशावादी आहे काय? या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दुःख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुद्ध म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुद्धांच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का?” डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात की, “भगवान बुद्ध दुसऱ्या आर्यसत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. म्हणूनच त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुद्धांचा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल?”

ग्रंथ निर्मीती

  • १४ सप्टेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना `The Buddha And His Dhamma` या अनमोल ग्रंथाची टंक लिखित प्रत भेट दिली होती. आणि हा ग्रंथ सरकार तर्फे छापण्यात यावा अशी सूचना केली, परंतु सरकार तर्फे लाखो रुपये कुंभमेळ्यासाठी देणार्या नेहरुने ग्रंथ छापणे ही खर्चिक बाब आहे म्हणून छापण्याचे नाकारले होते.

बुध्द धम्माच्या बाबतीत सुध्दाबाबासाहेबांचे तर मॅट्रीक पासूनच वाचन सुरू केले होते. त्यांनी जगातील बुध्द धम्माचे जे उपलब्ध साहित्य होते त्रिपीठकासह ते सर्व वाचून काढले होते. त्यांचे चिंतन मनन करुन व त्या सर्वांचा अर्क काढून एक शुध्द ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची, तब्बेतीची काळजी न घेताजो अनमोल ग्रंथ लिहिला व जो आपला जीव की प्राण असलेला ग्रंथआहे तो म्हणजे `बुध्द आणि त्यांचा धम्म` होय.बाबासाहेबांनी लिहीलेल्या अनेक अप्रतीम ग्रंथांपैकी ही त्यांची शेवटची रचना होती.हा ग्रंथ लिहीतांना त्यांच्या समोर संपूर्ण त्रिपिटक होतं. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक. प्रत्येक पिट्कात आणखी १०-१२ ग्रंथ तसेच या सर्व ग्रंथावर आधारीत अनेक अर्थ कथा होत्या, अनेक प्रकारचेबुध्द चरित्र संबंधित साहित्य होतं. बुध्दांसंबंधी जगत जेवढे म्हणून महत्वाचे साहित्य उपलब्ध होते या सर्व वाड्मयातुन त्यांना एक अशा ग्रंथाची रचना करायची होती ज्यात संपूर्ण बुध्द चरित्र त्याची शिकवण समाविष्ट होईल आणि त्याची भाषा सर्वसामान्यांनासमजायला सोपी असेल.हा ग्रंथ एकुण आठ काण्डात विभागला आहे. प्रत्येक काण्डात ७-८ भाग आहेत. प्रथम काण्ड बुध्दजीवन कथेनी व्याप्त आहे.

  • उर्वरित काण्डात धम्म दीक्षा, त्यांच आंदोलन, धर्म-धम्म, धर्म-अधर्म आणि त्यांच्या समकालीन विचारंबद्दल लिहीण्यात आले आहे. "जे विचार बुध्दी संगत आहेत, जे विचार तर्क संगत आहेत तेच बुध्द विचारआहेत" अशी बुध्द विचारांची अतिशय सोपी आणि समर्पक व्याख्या बाबसाहेबांनी या ग्रंथात मांडली आहे.दि.५ डिसेंबर १९५६ या दिवशी"Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाची प्रस्तावना लिहून पूर्ण केली.मूळ इंग्रजी ग्रंथ सिध्दार्थ कॉलेज पब्लीकेशन मुंबई यांनी १९५७ मध्ये प्रकाशित केला होता."Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाचे सर्व प्रथम इंग्रजी मधून हिंदी भाषेत अनुवाद डॉ. भदंत आनंद कौसल्यायनयांनी केले. सिध्दार्थ प्रकाशन मुंबई यांनी ते १९६१ मध्ये प्रकाशीत केले. त्याचे सर्वाधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्या कडे होते.त्यानंतर "Buddha And His Dhamma" या अनमोल ग्रंथाचे इंग्रजी किंवा हिंदी भाषेमधून सर्व प्रथम मराठी भाषांतर सुध्दा सिध्दार्थ प्रकाशन मुंबई यांनीच प्रकाशीत केले. त्याचे सर्वाधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई यांच्याकडेच होते.आता मात्र हा "Buddha And His Dhamma" अनमोल ग्रंथ भारतातीलआणि जगातील अनेक प्रकाशाकांकडून व भारतातील आणिजगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरीत झाला आहे, होत आहे.

हेही पहा

संदर्भ आणि नोंदी