"एकादशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हेही पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[हिंदू]] [[पंचांग|पंचांगाप्रमाणे]] महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत)प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. |
एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणार्या पक्षातला अकरावा दिवस आहे. [[हिंदू]] [[पंचांग|पंचांगाप्रमाणे]] महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत) प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. |
||
कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात जर लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या असतील तर दुसरीला नाव असते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्लपक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्णपक्षातल्या एकादशीचे आहे). :- |
कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात जर लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या असतील तर दुसरीला नाव असते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्लपक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्णपक्षातल्या एकादशीचे आहे). :- |
०६:४२, २७ मे २०१६ ची आवृत्ती
एकादशी हा हिंदु पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणार्या पक्षातला अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत) प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात.
कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात जर लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या असतील तर दुसरीला नाव असते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्लपक्षातल्या, तर दुसरे कृ्ष्णपक्षातल्या एकादशीचे आहे). :-
वैदिक मास | पालक देव | शुक्लपक्षाची एकादशी | कृष्णपक्षाची एकादशी |
---|---|---|---|
चैत्र (मार्च–एप्रिल) | विष्णु | कामदा | वरूथिनी |
वैशाख (एप्रिल–मे) | मधुसूदन | मोहिनी | अपरा |
ज्येष्ठ (मे–जून) | त्रिविक्रम | निर्जला | योगिनी |
आषाढ (जून–जुलै) | वामन | शयनी | कामिका |
श्रावण (जुलै-ऑगस्ट) | श्रीधर | पुत्रदा | अजा |
भाद्रपद (ऑगस्ट–सप्टेंबर) | हृषीकेश | परिवर्तिनी | इंदिरा |
आश्विन (सप्टेंबर–ऑक्टोबर) | पद्मनाभ | पाशांकुशा | रमा |
कार्तिक (ऑक्टोबर–नोव्हेंबर) | दामोदर | प्रबोधिनी | उत्पत्ती |
मार्गशीर्ष (नोव्हेंबर–डिसेंबर) | केशव | मोक्षदा | सफला |
पौष (डिसेंबर–जानेवारी) | नारायण | पुत्रदा | षट्तिला |
माघ (जानेवारी–फेब्रुवारी) | माधव | जया | विजया |
फाल्गुन (फेब्रुवारी–मार्च) | गोविंद | आमलकी | पापमोचिनी |
अधिक (३ वर्षांत एकदा) | पुरुषोत्तम | कमला | कमला |
- चैत्र - कामदा, वरूथिनी
- वैशाख - मोहिनी, अपरा
- ज्येष्ठ - निर्जला, योगिनी
- आषाढ - शयनी, कामिका
- श्रावण - पुत्रदा, अजा
- भाद्रपद - परिवर्तिनी, इंदिरा
- आश्विन - पाशांकुशा, रमा
- कार्तिक - प्रबोधिनी, उत्पत्ती
- मार्गशीर्ष - मोक्षदा, सफला
- पौष - पुत्रदा, षट्तिला
- माघ - जया, विजया
- फाल्गुन - आमलकी, पापमोचनी
अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते.
एकादशीचे धार्मिक महत्त्व
आषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी असे म्हणायची रूढी आहे.
आषाढी एकादशी
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला, शेषशायी भगवान श्री विष्णु झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला चातुर्मास संपतो. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात.
आषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणाऱ्या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात.
एकादशीची व्रते व उपवास
एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.
१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..
२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.
३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.
४. एकादश्या जर दोन असतील दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.
५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.
६. पहिल्या दिवशी येणार्या (स्मार्त) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.
हेही पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |