द्वितीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

द्वितीया ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी आली तर तिला शुक्ल द्वितीया आणि पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आली तर वद्य द्वितीया म्हणतात. अमावास्येनंतर आलेल्या प्रतिपदेला जर चंद्रदर्शन झाले नाही, तर ते द्वितीयेला नक्की होते, आणि नवा मुसलमानी महिना सुरू होतो. काही ठरावीक महिन्यातल्या चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ईद असते.

द्वितीया (आणि सप्तमी/द्वादशीला) भद्रा तिथी म्हणतात.

काही महत्त्वाच्या द्वितीया[संपादन]

  • चैत्र शुक्ल द्वितीया - सिंधारा दूज/दोज/दौज
  • चैत्र वद्य द्वितीया - आसों दोज/आशा दूज
  • वैशाख वद्य द्वितीया - नारद जयंती
  • आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
  • कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)
  • फाल्गुन वद्य द्वितीया - तुकाराम बीज


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.