Jump to content

आषाढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

आषाढ हा हिंदू पंचांगाप्रमाणे आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षातला चौथा महिना आहे. सूर्य जेव्हा १६ जुलैच्या सुमारास कर्क राशीत प्रवेश करतो, तेव्हा हिंदू पंचांगातील आषाढ सुरू असतो[]. भारतीय सरकारी पंचांगाप्रमाणे २२ जून ते २२ जुलै या काळात आषाढ महिना असतो.

नावाचे कारण

[संपादन]

आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे.[] या महिन्याला 'शुचि' असेही म्हणले जाते.[]

आषाढ महिन्यातील महत्त्वाचे दिवस

[संपादन]
  • आषाढ शुक्ल प्रतिपदा : (१). कालिदास जयंती. (२). या दिवशी एका गुप्त नवरात्राची सुरुवात होते. (दुसरे गुप्त नवरात्र माघ महिन्यात असते.).
  • आषाढ़ शुक्ल द्वितीया  : रथयात्रा प्रारंभ (ओरिसा)[]
  • आषाढ शुक्ल नवमी : कांदे नवमी[] भडली नवमी.
  • आषाढ शुद्ध एकादशी : शयनी एकादशी- देवशयनी एकादशी-पंढरपूर यात्रा-चातुर्मास प्रारंभ.
  • आषाढ शुद्ध द्वादशी : वासुदेव द्वादशी
  • आषाढ पौर्णिमा : गुरुपौर्णिमा-व्यासपौर्णिमा.
  • आषाढ कृष्ण पंचमी : मौना पंचमी
  • आषाढ वद्य एकादशी : कामिका एकादशी
  • अमावास्या- दिव्याची आवस[]
  • कोकिलाव्रत : ज्यावर्षी अधिक आषाढ असतो, त्या वर्षी निज पौर्णिमेपासून पुढे एक महिना.
  • अधिक आषाढ महिन्यातल्या दोनही एकादशींचे नाव ‘कमला‘ असते. (पर्यायी नावे - शुक्ल एकादशीचे नाव-पद्मिनी एकादशी, कृष्ण एकादशीचे परम एकादशी)

अपवाद

[संपादन]
  • साधारणपणे दर १९ वर्षांनी अधिक आषाढ येतो (अपवाद आहेत!). विसाव्या शतकात पहिल्यांदा सन १९१२मध्ये अधिक आषाढ आला होता. त्यानंतरचे अधिक आषाढ सन १९३१, १९५०, १९६९, १९९६, २०१५, २०३४, २०५३ या साली आले होते/येतील.


  • जगन्नाथपुरी येथील यात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला सुरू होते. त्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात असावा अशी अपेक्षा असते, परंतु कधीकधी चंद्र पुष्यच्या ऐवजी पुनर्वसू, आर्द्रा किंवा आश्लेषा नक्षत्रातही असू शकतो. असे झाले तरी रथयात्रा मात्र शुक्ल द्वितीयेलाच सुरू होते.



संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२०००). भारतीय संस्कृती कोश खंड १. भारतीय संस्कृतिकोश मंडळ.
  2. ^ "Kande Navami 2020: आषाढी एकादशी आधी का साजरी केली जाते कांदा नवमी? पहा कांद्याच्या पाच झटपट रेसिपी (Watch Video) | 🍔LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2020-06-29. 2022-07-23 रोजी पाहिले.
  3. ^ "दीप अमावस्या : जाणून घ्या महत्व, माहिती आणि पूजा विधीबद्दल". Loksatta. 2022-07-23 रोजी पाहिले.