अष्टमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अष्टमी 
चांद्रमासातील पंधरवड्याच्या आठवा दिवस
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारदिन
ह्याचा भागहिंदू दिनदर्शिका
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
अष्टमी (ne); অষ্টমী (bn); அட்டமி (ta); આઠમ (gu); Ashtami (en); अष्टमी (hi); అష్టమి (te); ಅಸ್ಟೆಮಿ (tcy); Аштами (ru); अष्टमी (mr); ಅಷ್ಟಮಿ (kn); ଅଷ୍ଟମୀ (or); Ashtami (en-gb); Ashtami (en-ca); अष्टमी (sa); अष्टमि (new) eighth day of the lunar fortnight (en); चांद्रमासातील पंधरवड्याच्या आठवा दिवस (mr); 8-е лунные сутки в индийской астрологии (ru) आठें (hi); அஷ்டமி (ta); Ashtami (or)

अष्टमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही पौर्णिमेनंतरच्या आणि अमावस्येनंतरच्या साधारणपणे आठव्या दिवशी असते. पौर्णिमेनंतरची अष्टमी ही वद्य अष्टमी असते, त्या अष्टमीला कालाष्टमी हे नाव आहे. अमावस्येनंतर येणारी शुक्ल अष्टमी ही दुर्गाष्टमी असते. सूर्यापासूनचे चंद्रापर्यंतचे कोनांअंतर (पृथ्वी-सूर्य सरळ रेषेने पृथ्वी-चंद्र रेषेशी पृथ्वीजवळ केलेल्या कोनाचे मोजमाप) जेव्हा ८५ ते ९६ अंश असते तेव्हा शुक्ल पक्षातली अष्टमी (First Quarter Phase), आणि जेव्हा ते २६५ ते २७६ अंश असते तेव्हा वद्य पक्षातली अष्टमी (Third Quarter Phase) असते.[ संदर्भ हवा ]

अष्टम्यांची काही खास नावे[संपादन]

 • अशोकाष्टमी - चैत्र शुक्ल अष्टमी
 • कराष्टमी - आश्विन वद्य अष्टमी
 • कालभैरव जयंती/भैरवाष्टमी - कार्तिक वद्य अष्टमी
 • कालाष्टमी - कोणत्याही महिन्यातली वद्य अष्टमी
 • गोपाष्टमी/गोपालाष्टमी - कार्तिक शुक्ल अष्टमी
 • जन्माष्टमी/गोकुळ अष्टमी - श्रावण वद्य अष्टमी
 • जानकी जयंती (सीता अष्टमी) - माघ वद्य अष्टमी
 • त्रिलोचन अष्टमी - ज्येष्ठ शुक्ल अष्टमी
 • दुर्गाष्टमी - कोणत्याही महिन्यात येणारी शुक्ल अष्टमी
 • बुधाष्टमी - बुधवारी येणारी अष्टमी
 • भीमाष्टमी - पौ़ष शुक्ल अष्टमी
 • भैरवाष्टमी/कालभैरव अष्टमी - कार्तिक कृष्ण अष्टमी
 • महाष्टमी - आश्विन शुक्ल अष्टमी
 • राधाष्टमी - भाद्रपद शुक्ल अष्टमी
 • शीतलाष्टमी/शाकाष्टका - फाल्गुन वद्य अष्टमी. या दिवशी आठ शाकभाज्या ब्राह्मणाला दान करतात.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.