वसंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसंत ऋतूत उगविलेली फुले
वसंत ऋतुत पळसाला आलेला बहर

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसंताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिंदू महिने वेगळेवेगळे आहेत.

मात्र, वसंत पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसंतोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते.


वसंत हे वासुदेव बळबवंत पटवर्धन या मराठी कवीने घेतलेले टोपणनावदेखील आहे.


हेही पहा[संपादन]


ऋतू
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर